किडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते ? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

किडनी म्हणजेच मूत्रपिंड आपल्या शरीरामधील आणि आपल्या पचनक्रियेमधील एक महत्त्वाचा भाग असतो. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे तुमच्या मुत्रपिंडाला हानी पोहोचू शकते. आपण आपले मूत्र जरी जास्त काळ थांबवून ठेवत असाल, तर ही सवय देखील तुम्हाला भारी पडू शकते. त्यामुळे किडनीची नेहमीच काळजी घेलती पाहिजे. पण तुम्हाला हे माहीत आहे का ? की जर एखाद्या माणसाची किडनी खराब असेल, तर दुसऱ्या माणसाची किडनी त्याच्यामध्ये कशी फिट होते. चला तर मग जाणून घेऊया, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल..

 

Kidney Transplant.Inmarathi
thehealthsite.com

भाजपचे जेष्ठ नेते आणि भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चार दिवसांच्या आधी संपूर्ण देशाला सांगितले होते की, ते किडनीच्या समस्यांशी सामना करत आहे. यानंतर रविवारी अशी बातमी आली की, केंद्रीय अर्थमंत्रीना एम्समध्ये डायलिसीवर ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा ही ट्रान्सप्लांट सर्जरी रविवारी होणार होती, पण अरुण जेटली यांना डायबिटीज असल्यामुळे त्यामध्ये उशीर होत आहे. जेटली यांना किडनी देण्यासाठी एक व्यक्ती देखील मिळाली आहे, पण त्याची ओळख सिक्रेट ठेवण्यात आलेली आहे.

 

Kidney Transplant.Inmarathi1
wp.com

किडनीच्या जबाबदाऱ्या

माणसाच्या शरीरामध्ये दोन किडनी असतात, हे सगळ्यानांच माहित आहे आणि त्यातील एक खराब झाली किंवा काढण्यात आली, तरीदेखील त्याचे काम चालू शकते. असे मानले जाते की, किडनी ही पोटाच्या जवळ असते, पण खरेतर किडनी आतड्यांच्या खाली आणि पोटाच्या पाठीमागच्या बाजूस असते.

प्रत्येक किडनी ही चार किंवा पाच इंचाची असते. या किडनींचे मुख्य काम रक्ताची सफाई करणे म्हणजेच एखाद्या जाळीसारखे काम करत असते. या किडनी वेस्टला दूर करतात, तसेच शरीरातील फ्लूड संबंधित संतुलन बनवण्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रोलाईट्सचा एक योग्य स्तर बनवून ठेवते.

 

Kidney Transplant.Inmarathi2
assettype.com

नेफ्रोन काय असतात ?

रक्त किडनीमध्ये पोहोचते, तेव्हा वेस्ट दूर होते आणि गरज पडल्यावर मीठ, पाणी आणि मिनरल्सचा स्तर एडजस्ट होतो. वेस्ट म्हणजेच गरज नसलेला अन्नाचा भाग मूत्रामध्ये बदलतो आणि शरीरातून बाहेर पडून जातो. असे देखील कधी – कधी होऊ शकते की, किडनी फक्त १० टक्के काम करत आहे आणि तुमचे शरीर त्याबद्दल तुम्हाला कोणतेही लक्षण दाखवत नसेल. अशावेळी कितीतरी वेळा किडनीचे गंभीर इन्फेक्शन आई किडनी खराब होण्याच्या समस्यांविषयी खूप वेळेनंतर आपल्याला माहिती पडते.

प्रत्येक किडनीमध्ये लाखो फिल्टर असतात, ज्यांना नेफ्रोन असे म्हटले जाते. जर रक्त किडनीमध्ये जाणे बंद झाले, तर त्याचा तो भाग काम करायचे बंद करू शकते. यामुळे किडनी फेल होऊ शकते.

 

Kidney Transplant.Inmarathi4
tmgrup.com

 

किडनी ट्रान्सप्लांट काय असते आणि ते कसे होते ?

किडनी ट्रान्सप्लांट त्या प्रक्रियेचे नाव आहे, ज्यामध्ये एका मनुष्याची किडनी काढून दुसऱ्याच्या शरीरामध्ये टाकली जाते, ज्याच्या किडनीने काम करणे बंद केलेले असते किंवा त्याची किडनी खराब होणार असते.

साधारणपणे क्रोनिक किडनी डिसीज किंवा किडनी फेल होते, तेव्हा ट्रान्सप्लांट करणे गरजेचे असते. अरुण जेटली यांच्या बाबतीत हे ऑपरेशन करण्याच्या अगोदर डायलिसीस होत आहे. ही खरेतर रक्त साफ करण्याची एक प्रक्रिया आहे, जी किडनी ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर गरजेची असते. पण यामध्ये काही समस्या देखील येतात आणि याला वेळ देखील लागतो.

 

Kidney Transplant.Inmarathi5
wp.com

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाच्या नेफ्रोलोजी डिपार्टमेंटच्या डॉ. डी. एस. राणा यांच्यानुसार, या प्रक्रियेमध्ये अशा एका माणसाचे असणे खूप गरजेचे आहे, ज्याच्या दोन्ही किडनी निरोगी आहेत. असाच माणूस डोनर असू शकतो.

डॉ. डी. एस. राणा यांनी  सांगितले की, “ साधारणपणे किडनी दान करणारा माणूस हा ओळखीचा असतो, पण प्रत्येकवेळी असे असणे गरजेचे नाही. या व्यतिरिक्त हे देखील तेवढेच गरजेचे आहे की, तो स्वत: च्या इच्छेने असे करत आहे.” “किडनी ट्रान्सप्लांटमध्ये रुग्ण आणि डोनरचा रक्तगट सारखा असणे, कधीही चांगले असते. नाहीतर किडनी दान करणाऱ्या माणसाचा रक्तगट ओ असणे गरजेचे आहे, कारण ‘ओ’ रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप म्हटले जाते. तसेच, दोन्ही लोकांचे ब्लड मॅच न करता देखील किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते.”

 

Kidney Transplant.Inmarathi3
youtube.com

पुढे डॉ. राणा म्हणाले की, “ किडनी ट्रान्सप्लांट करण्याच्या प्रक्रियेचे ऑपरेशन दोन ते चार तास चालते आणि जशी किडनी काम करायला सुरुवात करते, तसेच रुग्णाची रिकव्हरी सुरु व्हायला लागते आणि डोनरला देखील चार – पाच दिवसांमध्ये सामान्यपणे डिस्चार्ज दिला जातो. पण कधी – कधी किडनी रिजेक्शनचा देखील धोका असतो.”

अशाप्रकारे किडनी फेल झालेल्या माणसांमध्ये दुसऱ्या माणसाची निरोगी किडनी ऑपरेशनच्या माध्यमातून ट्रान्सप्लांट करण्यात येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?