तुमच्या तणावाचे मुख्य कारण तुम्हाला माहित आहे का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आधिच्या तुलनेत आजच्या आधुनिक काळात आपल्याकडे सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. आज आपल्याकडे आपल्या गरजेच्या सर्व वस्तु आहेत, तरी देखील आज आपण सुखी-समाधानी नाही. आणि ह्याचं कारण म्हणजे आधुनिक वस्तुंचा अति वापर. जसे की फेसबुक… आज आपण ह्या फेसबुकच्या अगदी आहारी गेलो आहोत. आपण आपला वेळ हा गरज नसतानाही ह्या फेसबुकवर घालवत असतो. म्हणजे जो वेळ आपण कुठल्या चांगल्या आणि आपल्याला उपयोगी पडेल अश्या कामात घालवु शकतो तो आपण ह्या फेसबुकवर वाया घालतो.

InMarathi Android App

 

userscontent2.emaze.com

पण कधी तुम्ही विचार केला की, आपण जो एवढा वेळ देतो ह्या फेसबुकला त्याचा आपल्याला काय फायदा होत असेलं? तर ह्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही उलट नुकसानच होतं. आपल्याला भलेही फेसबुकवर आपला वेळ घालवायला आवडत असेल, पण हा फेसबुकच तुमच्या जीवनातील तणावाचे मुख्य कारण आहे.

 

business-stress-marathipizza

होय… ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील क्वीन्सलॅण्ड विद्यापिठात झालेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे.
ह्या रिसर्च नुसार जर तुम्ही फेसबुकचा वापर करणे सोडलं तर तुमचं जीवन हे तणावमुक्त होऊ शकतं.

 

facebook-inmarathi
fm.cnbc.com

School of Psychology चे प्राध्यापक Prof. Eric Vanman ह्यांच्या नेतृत्वात हि रिसर्च करण्यात ई. ह्या रिसर्च मध्ये असे दिसून आले की, जर तुम्ही फेसबुकचा वापर कमी करत असाल किंवा फेसबुकचा वापरच करत नसाल तर तुमच्यातील Stress Hormone Cortisol हे कमी होतात. विद्यापीठाने केलेल्या अध्ययनात एकुन१३८ लोकांचा समावेश करण्यात आला होता ज्यांच्यावर ही रिसर्च केली गेली. ह्या लोकांना दोन गटांत विभाजित केल्या गेले.

 

facebook-depression-marathipizza000

ह्यापैकी एका गटाला ५ दिवस फेसबुक पासून दूर राहायला सांगितले तर दुसर्या गटाला नेहेमीप्रमाणे फेसबुकचा वापर करायला सांगितले. ह्यापैकी ज्या लोकांना फेसबुक न वापरण्यास सांगितले होते त्यांच्यातील Stress Hormone Cortisol हे कमी झाल्याचे दिसून आले. ह्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, फेसबुकच्या अतिवापराने आपला मेंदू आणि रोगप्रतिकार प्रक्रिया अशक्त होते. त्यासोबतच ह्याने आपलं वजन वाढतं आणि मन देखील नेहेमी दुःखी राहत.

 

Stress free life Tips.inmarathi8
huffingtonpost.com

प्राध्यापक Vanman ह्यांच्या मते फेसबुकचा वापर न करणाऱ्या लोकांमध्ये शारीरिकदृष्ट्या सुधारणा दिसून आली तसेच ते आधीच्या तुलनेत अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले.

तर शोधकर्त्यांच्यामते WhatsApp, Twitter, Instagram इत्यादी सोशल मिडियापासून दूर राहून देखील तुम्ही तुमचा तणाव कमी करू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *