पंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आज भारतातील स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. काही क्षेत्रांमध्ये तर त्यांनी पुरुषांपेक्षा देखील उंच झेप घेतली आहे. त्यामुळे स्त्रियांना कधीही कमी लेखणे चुकीचे आहे. डब्लूडब्लूई आज जगातील सर्वात प्रसिद्ध असा रेसलिंग शो आहे. जगभरातील तरुणाई या शोसाठी खूप वेडी आहे. भारतामध्ये देखील या शो चे खूप चाहते आहेत. डब्लूडब्लूईचा तो झगमगाट भारतीय युथला आपल्याकडे आकर्षित करत आहे. या डब्लूडब्लूई शो मध्ये खूपच कमी भारतीय रेसलर आहेत आणि होऊन गेले आहेत.

 

Kavita Devi.Inmarathi
wwe.com

अशावेळी जर एखादी भारतीय रेसलर व्यक्ती या डब्लूडब्लूईच्या रिंगमध्ये उतरली, तर काही वेगळाच उत्साह प्रेक्षकांमध्ये निर्माण होतो. ‘द ग्रेट खली’ या भारतीय रेसलरने या शोमध्ये खूप नाव कमावले आहे. पण आजकाल खलीपेक्षा जास्त चर्चेमध्ये एक भारतीय स्त्री आहे आणि या स्त्रीला ट्रेनिंग देणारा ‘द ग्रेट खली’च आहे. त्याचबरोबर या स्त्रीची खास गोष्ट म्हणजे ही पंजाबी ड्रेस घालून रेसलिंग रिंगमध्ये उतरते आणि भल्याभल्यांना धूळ चारते. चला तर मग जाणून घेऊया, या लेडी रेसलरबददल…

डब्लूडब्लूईच्या रिंगमध्ये उतरलेल्या या भारतीय स्त्रीचे नाव कविता देवी आहे. कविता देवीचा जन्म १५ मार्च १९८३ रोजी झाला. १५ ऑक्टोबर २०१७ ला डब्लूडब्लूईने तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे, असे डब्लूडब्लूईने जाहीर केले आहे. भारताच्या हरियाणामधील कविता देवी डब्लूडब्लूईच्या रिंगमध्ये पारंपारिक पंजाबी ड्रेस घालून उतरली होती आणि यामुळे ती सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. जर तुम्ही विचार करत असाल की, फक्त आपल्या कपड्यांमुळेच कविता देवी इंटरनेटवर प्रसिद्ध आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तिच्या रेसलिंग मूव्ह्स आणि ताकद तिला सर्वांपेक्षा वेगळे बनवते.

 

Kavita Devi.Inmarathi1
indiatimes.com

डब्लूडब्लूई कडून पहिल्यांदाच फक्त स्त्रियांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘मए यंग क्लासिक’ मध्ये कविता देवी न्यूझीलँडच्या डकोटा कई विरुद्ध रिंगमध्ये उतरली होती. कविताने डकोटा कईला रिंगमध्ये असे काही उचलून आपटले कि, तेथील सर्व दर्शक प्रभावित झाले.

डब्लूडब्लूईमध्ये महिला रेसलर्स आपल्या बोल्ड वेस्टर्न कपड्यांसाठी ओळखल्या जातात. पण कविता देवीने वेस्टर्न कपडे न घालता, पंजाबी ड्रेसमध्येच धमाल केली. डब्लूडब्लूईच्या प्रेक्षकांना कविताचा हा पारंपारिक अंदाज खूप पसंत आला.  पहिल्यांदाच एखादी स्त्री डब्लूडब्लूईमध्ये पंजाबी ड्रेसमध्ये लढली आहे.

 

Kavita Devi.Inmarathi2
indiatvnews.com

कविताच्या एवढ्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ‘मए यंग क्लासिक टूर्नामेंट’ मध्ये पहिल्याच राउंडला पराभवाचा सामना करावा लागला. कविता भलेही सामना हरली असेल, पण डब्लूडब्लूईच्या प्रेक्षकांचे मन तिने जिंकून घेतले आणि आपली एक छाप देखील डब्लूडब्लूईमध्ये सोडली. भारतीय फॅन्सना आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये कविता खूप काही करून दाखवेल.

डब्लूडब्लूईचे प्रवक्ते म्हणाले की, “कविताला आम्ही आमच्या विकासात्मक यंत्रणेमध्ये भर्ती करणार आहोत. तिथे त्यांना अजून काही वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देण्यात येईल. काही काळानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खेळामध्ये विविधता पाहण्यास मिळेल. आम्हाला खात्री आहे की, कविता भविष्यकाळात प्रेरणादायी डब्लूडब्लूईच्या सुपरस्टार बनतील.”

 

Kavita Devi.Inmarathi3
sportskeeda.com

याचवर्षी कविता देवीने डब्लूडब्लूईच्या दुबई ट्रायआउटमध्ये आपली छाप सोडली होती. दुबईमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच त्यांना ‘मए यंग क्लासिक टूर्नामेंट’मध्ये स्थान मिळाले होते. ‘द ग्रेट खली’ नावाने प्रसिद्ध असलेला दलीप सिंग राणाने डब्लूडब्लूईमध्ये खूप नाव कमावले आहे.

भारतीय रेसलर्सना डब्लूडब्लूईसाठी तयार करण्यासाठी खली पंजाबमध्ये एक रेसलिंग प्रमोशन अँड ट्रेनिंग अॅकॅडमी चालवतात. कविताने देखील प्रोफेशनल रेसलिंगचे डावपेच याच ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये शिकली आहे. खलीच्या या ट्रेनिंग अॅकॅडमीमधून अजून असेच काही भारतीय रेसलर तयार होतील अशी सर्वांना आशा आहे.

 

Kavita Devi.Inmarathi4
intoday.in

डब्लूडब्लूईमधून प्रोफेशनल रेसलिंगमध्ये आलेली कविता वेटलिफ्टिंगमध्ये पदक देखील जिंकली आहे. २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या साउथ आशियाई गेम्समध्ये स्त्रियांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ७५ किलोच्या गटामध्ये कविता देवीने देशाचे नाव सोन्याचे पदक जिंकून गौरविले होते, आता डब्लूडब्लूईच्या रिंगमध्ये भारतीय प्रेक्षकांचे मन मोहून घेताना दिसून येणार आहे.

अशा या कविता देवीने भारतीय स्त्रियांसाठी आणि रेसलरसाठी एक नवीन प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?