भारतीयांना माहिती नसलेलं असंही एक “कामसूत्र”…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सेक्स या विषयाकडे प्रत्येक देशात वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. लोकांच्या मानसिकतेवर त्या विशिष्ट समाजची सेक्स या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अवलंबून असते. अनेक देशांमध्ये सेक्सच्या संबंधित नियम देखील खूप कडक आहेत. यामध्ये काही अरब देशांचा देखील समावेश आहे.

कामसूत्र हा चित्रपट काही लोकांना माहित असेल. हा चित्रपट एका खूप चर्चेत असलेल्या ‘कामसूत्र’ या पुस्तकावर आधारित आहे.  हे पुस्तक भारतामध्ये लिहिण्यात आलेले आहे.

 

The arab country sex culture.Inmarathi
amazon.com

संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेल्या या ग्रंथाला संपूर्ण जगामध्ये यौन संबंधावरचे साहित्याच्या दृष्टीने सर्वात चांगले पुस्तक म्हणून ओळखले जाते.


सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टनने कामसूत्राला इंग्रजीमध्ये रूपांतरित केले आहे. याचे अजूनही काही इतर भाषांमध्ये भाषांतरित केलेल्या प्रती जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. पण आज आपण कामसूत्राविषयी नाही, तर अरब देशांतील सेक्स साहित्यांविषयी जाणून घेणार आहोत.

हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल की, सेक्सवर आधारित साहित्य, तेही अरब देशांमध्ये! जिथे सेक्सविषयीचे कायदे आणि नियम खूप कडक आहेत.

कामसूत्राचे भाषांतर करणारे सर रिचर्ड फ्रांसिस बर्टननेच एका अरबी पुस्तकाचे देखील भाषांतर केले होते. या पुस्तकाचे नाव होते, ‘द परफ्यूमड गार्डन’. खरेतर हे मूळ अरबी पुस्तकाचे भाषांतर नव्हते.

 

The arab country sex culture.Inmarathi1
shopify.com

बर्टनने याला फ्रेंच भाषेमधून इंग्रजीमध्ये भाषांतरीत केले. या पुस्तकाला पंधराव्या शतकामध्ये अरब देश ट्युनिशियाच्या शेख नफजोईने लिहिले होते. या पुस्तकामध्ये शारीरिक संबंध बनवण्याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले आहे.


स्त्रियांचा आत्मविश्वास 

कामसूत्र हे पुस्तक स्त्रियांच्या अधिकारांवर जास्त जोर देते. या पुस्तकानुसार सेक्सचा अधिकार फक्त पुरुषांचाच नाही, तर यामध्ये स्त्रियांचा देखील तेवढाच सहभाग आहे. त्यामुळे स्त्रियांच्या या अधिकाराला दुर्लक्षित करता येऊ शकत नाही.

‘द परफ्यूमड गार्डन’ मध्ये शारीरिक संबंधांचा आनंद एका वेगळ्या पातळीवर घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या पुस्तकात गोष्टींच्या आधाराने सेक्स करण्याचे वेगवेगळे प्रकार सांगण्यात आलेले आहेत.

 

The arab country sex culture.Inmarathi2
bbci.co.uk

मनोरंजनच मनोरंजन 

यातील गोष्टी तशाच रंजकपणे लिहिण्यात आलेल्या आहेत, ज्याप्रकारे अलिफ – लैला लिहिण्यात आली होती, जी मनोरंजनाने भरलेली होती. ‘द परफ्यूमड गार्डन’ मध्ये समलैंगिकतेवर खूप खुलून चर्चा करण्यात आलेली आहे.

बर्टनने भाषांतरित केलेल्या प्रतीमध्ये २१ चॅप्टर फक्त समलैंगिकतेवर लिहिण्यात आलेले आहेत.

खूप लोकांचे म्हणणे आहे की, बर्टन या पुस्तकाचा दूसरा भाग ‘द सेंटेड गार्डन’ या नावाने लिहणार होते. पण याच्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या बहुतेक काम केलेल्या पुस्तकांना त्यांची पत्नी इजाबेल हिने जाळून टाकले.


 

The arab country sex culture.Inmarathi3
cloudfront.net

धार्मिक मान्यता 

अरबी साहित्यचे जाणकार सारा इर्विग यांचे म्हणणे आहे की,

“आज भलेही अरब देशांमध्ये सेक्सविषयी देखील रोखले जाते. पण एक काळ असा होता की, जेव्हा अरब देशांमध्ये सेक्सविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांना धार्मिक मान्यता प्राप्त होती. असे मानले जात होते की, ही  पुस्तके माणसाला शारीरिक संबंध बनवण्याची योग्य तालीम देतात.”

एवढेच नाही तर या ग्रंथाला देवाचे वरदान मानले जात होते. पण आज अरब देशांमध्ये सेक्सविषयी बोलणे देखील गुन्हा मनाला जातो. असे नाही की, हे लोक सेक्स करत नाहीत किंवा सेक्सची इच्छा ठेवत नाहीत. पण ते या विषयावर बोलणे टाळतात. त्यांच्या दृष्टीने या विषयावर बोलणे, हे तिसऱ्या वेगळ्याच जगाविषयी बोलण्यासारखे आहे.

अशावेळी ‘द परफ्यूमड गार्डन’ सारख्या पुस्तकांना राक्षसी पुस्तकांसारखे पाहिले जाते. एकीकडे असे म्हटले जाते की, अरब देशांमध्ये सेक्सविषयी बोलणे गुन्हा आहे. तर दुसरीकडे असेही आहे की उघड बोलता येत नसले तरी हा विषय लोकांना तितकाच महत्वाचा वाटतो.


 

The arab country sex culture.Inmarathi4

cloudfront.net

लोक भले या विषयावर काहीही बोलायला घाबरतात. पण प्रत्येक काळामध्ये अरबी लोक शारीरिक संबंधाची भरपूर इच्छा ठेवणारे होते. बर्टननेच भाषांतरित केलेल्या अरबी साहित्यांत ‘अलिफ लैला’ ची गोष्ट देखील समाविष्ट आहे.

अरबी देशांतील समाज 

आता अरबी स्त्रियांनी देखील या प्रकारचे साहित्य लिहिण्यामध्ये आपले हात पुढे सरसावले आहेत. २००५ मध्ये ‘नज्मा’ नावाने एक पुस्तक लिहिण्यात आले होते. अरब इतिहासामध्ये शारीरिक संबंधांवर एखाद्या स्त्रीने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. यानंतर अजूनही काही पुस्तके समोर आली.

मोरक्कोच्या मोहम्मद चौकरीने तर आपल्या पुस्तकामध्ये वेश्यांविषयी आणि यौन रोगांविषयी चर्चा केली आहे. सीरियाची स्कॉलर आणि लेखिका सल्वा नईमी हिने सुद्धा अनेक पुस्तके लिहिली. थोडक्यात, अरब देशातही शारीरिक संबंधांवर भरपूर साहित्यनिर्मिती झाली आहे.


अरबी समाजामध्ये सेक्स सर्वात जास्त आनंदाची गोष्ट मानली जाते.

 

The arab country sex culture.Inmarathi5
critictoo.com

यावरून हे समजते की, अरब देशांमध्ये आता सेक्सविषयी जरी खूप कठोर नियम आणि कायदे असले, तरीदेखील  इतिहासामध्ये आणि कदाचित आताही ते सेक्सचे तेवढेच चाहते आहेत. धर्माधिष्ठित समाजव्यवस्था अस्तित्वात असल्याने त्याची उघड वाच्यता होत नाही एवढेच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतीयांना माहिती नसलेलं असंही एक “कामसूत्र”…!

  • May 16, 2019 at 1:25 pm
    Permalink

    Very interested any problem sex.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?