' “कबीर सिंग” कसा आहे? पाहावा की पाहू नये? हे वाचून ठरवा.. – InMarathi

“कबीर सिंग” कसा आहे? पाहावा की पाहू नये? हे वाचून ठरवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : जय काळे 

===

सध्या मनोरंजक चित्रपटाच्या नावाखाली जे काहीही दाखवण्यात येत आहे अशा या फेज मध्ये एक रिमेक का होईना बॉलीवुड चाहत्यांना आनंद देऊन जातोय.

कोणत्याही एखाद्या सुंदर चित्रपट कलाकृतीसाठी दिग्दर्शन, लेखन, संगीत, अभिनय आणि छायाचित्रण या बाबी महत्वाच्या असतात. आणि याच सगळ्याची उत्तम सांगड घालत आपल्या  समोर आलाय ‘कबीर सिंग’.

दिगदर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सर्वप्रथम हा चित्रपट तेलगु भाषेत चित्रित केला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.

यानंतर हाच चित्रपट हिंदीत करण्याची त्यांची इच्छा होती, त्यांना विचारण्यात आल्यास त्यांनी सांगितलं की या भूमिकेसाठी त्यांच्या नजरेत फक्त एकच अभिनेता होता आणि तो म्हणजे शाहिद कपुर.

 

India.com

शाहिद कपुर हा एक अतिशय उत्तम अभिनेता असुन बाकीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत नेहमी अंडररेटेड राहिला. ‘जब वी मेट’, ‘उडता पंजाब’, ‘कमीने’ अश्या चित्रपटातुन त्याने नेहमीच स्वतःला सिद्ध केलंय.

वेग वेगळ्या भुमिका करताना कधीच कुठेही कमी पडू देत नाही आणि त्या भुमिकेला पूर्णपणे न्याय देतो. जेव्हा कबीर सिंग ही स्क्रिप्ट त्याने वाचली तेव्हा लगेच तो ही भुमिका करायला तयार झाला.

‘कबीर सिंग’ चे कथानक हे अगदी सामान्य वाटत असले तरी ते मांडण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे तो सर्वांच्या पसंतीस पडतोय.

यामध्ये एखादं पात्र हे कसं डिझाइन व्हायला हवं याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

कबीर सिंग ही रागावर नियंत्रण नसलेला पण तत्वांशी एकनिष्ठ असलेली व्यक्ती दाखवलीय जो वैद्यकीय शिक्षण घेत त्यात नेहमी सरस असुन मैदानी खेळात इंटरेस्ट असणारी असा आहे.

कॉलेजमध्ये सिनिअर असल्यामुळे सर्वांवर नेहमी वचक ठेवुन मित्रांमध्ये तेवढाच जिग्री असणारं अस हे पात्र आहे.

 

kabir sing inmarathi
Hindustan Times

खेळादरम्यान स्लेजिंगला बळी पडुन रागावर नियंत्रण नसल्याने भांडण करतो आणि त्यामुळे त्याच्यावर अगदी कॉलेज सोडण्याची वेळ येते. या दरम्यान त्याचा एक डायलॉग सर्वांच्या पसंतीस पडलाय-

“I am not a Rebel without a cause”.

हे सगळं झाल्यावर मग चित्रपटात नायिकेची एन्ट्री होते. कायरा अडवाणी ने ‘प्रीती’ ही भुमिका उत्तम रित्या साकारली आहे.

अतिशय शांत, अभ्यासु थोडी भित्री, कॉलेज मध्ये नवीन ऍडमिशन असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं जस होतं अगदी तशीच अवस्था तिची दाखवलीये.

ती कबीर ला दिसते, दिसताच क्षणी तो प्रेमात पडतो अगदी लव ऍट फर्स्ट साईट आणि तो त्याचा कॉलेज सोडण्याचा निर्णय बदलतो.

या सिन दरम्यान बॅकग्राऊंड म्युसिक संथ पणे चालू असतं आणि त्यांची नजरानजर होते. कुठेही ओव्हर न दाखवता शांतपणे हा सिन घडवून आणल्यामुळे प्रेक्षक पण या सिनच्या प्रेमात पडू शकतात.

यानंतर कबीर चा प्रीती वरचा जबरदस्ती वाटणारं पण नकळत तिलाही स्पेस देणार असं एक रिलेशनशिप सुरू होतं.

 

kiara kabir inmarathi
Scroll.in

या सगळ्यात प्रीती हे काय होतंय, काय चाललंय काहीच कळत नाहीये पण आवडतंय हे सगळं आणि कुठेतरी कबीर मुळे तिला एका प्रकारचं सौरक्षण मिळतंय अस तिला जाणवत असतं आणि यामुळे तीही त्याच्या या जबरदस्तीच्या अप्रोच मध्ये मिसळून जाते.

यामध्ये दाखवलेला सगळ्यात उत्कृष्ट भाग म्हणजे प्रीतीची त्या नात्यात इनव्हॉल्व होण्याची प्रोसेस दाखवली आहे.

कबीर देखील तिला कम्फर्टेबल करत असतो आणि या रिलेशनशिप च्या रेअलिस्टिक प्रोसेस मुळे कथेला बहार येते.

यानंतर बऱ्याच गोष्टी अशाही दाखविल्या आहेत ज्या सामान्य मनाला पटत नाहीत. जसे की तो तिला (प्रीतीला) पायाला लागलंय म्हणून लेडीज हॉस्टेल मधुन बॉईज हॉस्टेल मध्ये त्याच्याच रूम मध्ये शिफ्ट करतो.

हे थोडं पटत नाही मनाला पण एंटरटेनमेंट फिल्म आहे ना, म्हणून मग हे चालून गेलं.. कारण सलमान जर रॉकेट लाऊंचर घेऊन अचूक निशाणा साधत चार चाकी गाड्या उडवू शकतो तर हे त्यापुढे अगदीच सामान्य आहे. पण मुळतः हे शक्य नसतं.

पण यादरम्यान त्यांच्यातील प्रेम संबंध अजून घट्ट होताना दिसतात.

मग यात प्रेमामुळे त्यांच्या अभ्यासावर कुठेही परिणाम होताना दिसत नाही, ही एक महत्वाची गोष्ट दाखवलीये की प्रेम, मैत्री आणि एकंदरीत कॉलेज लाईफ जगताना मेन फोकस ढळू द्यायचा नाही आणि हे कबीर या पात्राकडून शिकण्यासारखच आहे.

 

singh inmarathi
mynation.com

तो फायनल इयरला आणि प्रीती फर्स्ट इयरला असल्याने तो लवकर पासआउट होऊन पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाण्याच्या विचारात असतो.

यामुळे त्या दोघात अंतर येणार याची देखील दोघांना जाणीव असते, पण तो देखील सांभाळून सगळं नीट होऊ शकतं हे यातुन दाखवण्यात आलंय.

बऱ्याच वर्ष्याच्या या यशस्वी रिलेशनशिप नंतर लग्नाची मागणी घालण्यासाठी म्हणून जेव्हा कबीर तिच्या घरी जातो तेव्हा प्रीतीचे वडील त्या दोघांना किस करताना पाहतात आणि भयंकर चिडून कबिरच्या श्रीमुखात भडकवुन त्याचा अपमान करतात.

कबीर समजावण्याचा प्रयत्न करतो पण स्वभावी रागीट असल्यामुळे तोही चिडुन निघुन जातो. या सर्वात दोघांच्याही घरी त्या दोघांबद्दल त्यांच्या घरी समजतं.

याप्रकरणामुळे संतप्त तिचे वडील तीचं दुसरीकडे लग्न लावून देतात आणि यामुळे कबीर वर भयंकर परिणाम होतो. जो कबीर कमी व्यसनी होता तो व्यसनात वाहून जातो. यात त्याचे मित्र बऱ्याच वेळा काळजी घेतात आणि सांभाळतात.

घरातून बाहेर हाकलुन दिलं जातं. पण कबीर यातून बाहेर येत नाही. यानंतर तो शल्यचिकित्सक म्हणजेच सर्जन होतो. त्यातही तो नेहमी नशेत ऑपरेशन करणार पण सगळ्या स्टाफचा आणि पेशंटचा आवडता असा दाखवलाय.

 

kabeer singh inmarathi
Deccan Chronicle

त्यानंतर तो शारीरिक गरजा पुर्ण करण्यासाठी बऱ्याच मुलींशी शारीरिक संबंध ठेवतो. यातुन सेक्स हा विषय ऑब्जेक्टिव्ह दाखवला आहे. जे की फिल्म मधुन आधुनिकता आणि सत्यता दाखवतं.

याच दरम्यान तो एक ऑपरेशन नशेत केल्याच्या केस मध्ये अडकतो आणि त्यात त्याचे ५ वर्षांसाठी लायसेन्स जप्त होते.

पण मग आयुष्यात एक अशी गोष्ट घडते जिथे माणुस बदलतो, त्याच्या आजीला देवाज्ञा होते जिच्यावर त्याचा सगळ्यात जास्त जीव असतो. आणि यामुळे तो घरी परततो आणि सगळं पहिल्यापासुन सुरू करतो.

आणि तेव्हा त्याला परत प्रीती दिसते पण ती प्रेगनंट असते. तो याही गोष्टीला मान्य करून परत तिला लग्नासाठी विचारायला जातो आणि ती सर्व प्रकार सांगते आणि ते बाळ हे कबीरचं आहे हे पटवून देते.

तिच्या प्रेग्नंट असल्याचा त्याच्या प्रेमावर काहीच फरक पडत नाही आणि यातुन मॅच्युअर प्रेम कसं असतं हे स्पष्ट केलंय. ते परत एकत्र येतात. आणि अश्याप्रकारे एकंदरीत हॅपी एन्ड होतो.

 

kabir inmarathi
Hitmoviedialogues

फिल्म मध्ये बऱ्याच गोष्टी या न पटणाऱ्या वाटतील पण एंटरटेनमेंट फिल्म अश्याच असाव्या असं म्हणायला हरकत नाही. कारण यात रिऍलिटी चेक आणि एंटरटेनमेंट दोन्हीची सांगड आहे.

तरुणांना आकर्षित करणारा हा चित्रपट आहे. पण तरुणांनी यातुन काय घ्यायचं आणि काय नाही हे देखील चित्रपटात स्पष्ट केलेलं नाही. या ठिकाणी सिनेमा कमी पडतो.

याचं संगीत हे वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी दिले असुन ते एकानेच कोणीतरी केलंय अस भासतं, जे की सध्याच्या युथ मध्ये खूप फेमस आहे.

अर्थात चित्रपटाच्या यशाचे कारण कोणी एक व्यक्ती नसतो तर पुर्ण युनिट असतं आणि जर म्होरक्या जर योग्य असेल तर सगळा संघ एकजुटीने चांगल काम करतोच.

संदीप रेड्डी वांगाच्या रूपाने बॉलीवुड ला एक उत्तम दिगदर्शक मिळाल्याचं भासतंय आणि आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अजुन वाढल्या आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?