' “जंगल जंगल बात चली है” – नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियांका चोप्राची ! – InMarathi

“जंगल जंगल बात चली है” – नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियांका चोप्राची !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपल्या सर्वांचा – especially ८० आणि ९० च्या दशकात जन्मलेल्यांचा आवडता मोगली नव्याने समोर येतोय. चकचकीत हॉलीवूड चित्रपट – The Jungle Book मधून.

jungle-book-hindi-marathipizza

 

हा चित्रपट हिंदीमधे सुद्धा येतोय. फक्त इतर हॉलीवूड चित्रपटांच्या हिंदी आवृत्तीमधे आणि “ह्या” चित्रपटात २ मोठे फरक आहेत.

पहिला फरक आहे, पार्श्वसंगीताच्या दर्जाचा.

इतर चित्रपट जेव्हा हिंदी किंवा इतर भाषांमधे रिलीज होतात तेव्हा पार्श्वसंगीताच्या दर्जावर बराच फरक पडतो. Quality बरीच खराब होते. पण जंगल बुकचे ट्रेलर बघून (ऐकून!) लक्षात येतं की पार्श्वसंगीत तितकंच सकस ठेवल्या गेलंय.

दुसरा मोठा फरक आहे – पात्रांना दिले गेलेले आवाज.

मूळ इंग्रजी चित्रपटात विवीध पात्रांना मोठ्या मोठ्या actors ने आवाज दिलाय. आता हे हॉलीवूड animation चित्रपटांबद्दल काही विशेष नाही. पण – झकास गोष्ट ही – की हिंदी चित्रपटातसुद्धा “दिग्गज” कलाकारांनी आवाज दिले आहेत.

कोणी ?

jungle-book-hindi-marathipizza

 

कोणत्या actor ने कुठल्या पात्राला आवाज दिलाय, हे तुम्ही ट्रेलर बघूनच जाणून घ्या… 😀 …फक्त एक गोष्ट सांगितल्याशिवाय रहावत नाही –

शेरखानला आवाज दिलाय – खुद्द नाना पाटेकरांनी…!

त्यांच्या भरदार आवाजात शेरखानचे डायलॉग ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असणारे…!

एवढंच नाही, एके काळी प्रचंड गाजलेलं “जंगल जंगल बात चली है पता चला है” हे गाणं सुद्धा रिमेक केलं गेलंय.

गुलजार आणि विशाल भारद्वाजनी सोबत काम करून ह्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

पुढे देत आहोत The Jungle Book चे दोन ट्रेलर आणि आपलं आवडतं नव्या रुपातलं गाणं…

Enjoy…!

 

 

 

 

दे धमाल…!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?