एटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


जस-जश्या मानवाच्या गरजा वाढतात तस-तश्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांतून तो असे काही शोध लावतो ज्यामुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर आणि सुखद बनते. याच गरजेतून आज जगात एवढे जास्त शोध लावले गेले आहेत.

एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रागेत उभे राहावे लागत होते, पण त्यानंतर आला एटीएम… या मशीनने माणसांना कधीही कुठेही पैसे काढण्याची  मुभा  दिली.

ज्यामुळे जर कधी बँकेला सुट्टी असली किंवा आपण बँकेपर्यंत जाण्यात असमर्थ असलो तर आपण या मशीनद्वारे पैसे काढू शकतो.

आजच्या या आधुनिक युगात जवळपास सर्वच कामे ही मशीनद्वारेच केली जातात. या मशीन आपले जीवन सोयीस्कर करण्यास मदत करत आहेत. त्यातच एटीएम मशीन तर मानवी इतिहासात सर्वात उपयोगी आणि सोयीस्कर मशीन ठरली.

आज आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पैश्याची गरज भासली तर आपण या मशीनचा वापर करतो. त्यासाठी आपल्याला आता बँकेत जायची गरज भासत नाही.

 

atm-inmarathi03
malwarebytes.com

पण काय तुम्ही कधी विचार केला आहे की, या एटीएम मशीनचा शोध कसा लागला असेल आणि तो कोणी लावला असेल? पहिल्यांदा या मशीनचा वापर कुठे झाला असेल? पहिली एटीएम मशीन ही कशी दिसत असेल?

तुमच्या मनात कधी असे प्रश्न आलेत…? आज आम्ही याच सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन आलो आहोत..


 

John Shepherd-Barron01-inmarathi
marketwatch.com

जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला लंडनच्या बार्कलेज बँकेने केला होता,

या मशीनचा शोध स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन यांनी लावला होता.

 

John Shepherd-Barron-inmarathierd
gazabpost.com

तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, जॉन शेफर्ड यांचा जन्म भारतात झाला होता. २३ जून १९२५ साली मेघालय येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते, त्याचं नाव विलफ्रिड बॅरन होते. जॉन यांच्या जन्मावेळी ते चिटगाव पोर्ट कमिश्नरेट चे चीफ इंजिनीअर होते.

 


John Shepherd-Barron-inmarathi02
telegraph.co.uk

एटीएम मशीनची कल्पना जॉन शेफर्ड यांना कशी सुचली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे.

एकदा जॉन पैसे काढण्यासाठी बँकेत गेले पण बँकेत पोहोचताच बँक बंद झाली, तेव्हा जॉन यांना वाटले की, काश अशी एखादी मशीन असती ज्यातून आपण हवे तेव्हा पैसे काढू शकलो असतो.

 

John Shepherd-Barron-inmarathi04
marketwatch.com

मग काय त्यांना जशी ही कल्पना सुचली त्यांनी या मशीनला बनविण्याचे काम सुरु केले. त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीने अखेर त्यांच्या या कल्पनेने मूर्त रूप घेतले आणि जगात एटीएम मशीनचा जन्म झाला. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या एका शाखेत लावण्यात आली.

 

hsbc-atm-inmarathi
gazabpost.com

भारतात सर्वात पहिली एटीएममशीन १९८७ मध्ये लागली. हे पहिले एटीएम हाँगकाँग अॅण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावली होती.

या एटीएम मशीनचा शोध लावून जॉन शेफर्ड यांनी सर्व मानवजातीचे कल्याण केले आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.. पण आज जॉन शेफर्ड आपल्यात नाही. एटीएम मशीनच्या या शोधकर्त्याचा १५ मे २०१० साली मृत्यू झाला…


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
3 thoughts on “एटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?