भारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात अशी कितीतरी देवीची मंदिरे आहेत जी इतरांपेक्षा खूपच वेगळी आहेत. त्यांना प्रत्येकाला काही इतिहास आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे. आपल्या सह गतकाळातील आठवणी साठवून ही मंदिरे आजही पाय रोवून उभी आहेत याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.

असेच एक देवीचे मंदिर आहे राजस्थानमध्ये! ह्या मंदिराचे नाव आहे जीण माता मंदिर!

 

jeen mata temple rajasthan 3 InMarathi

जयपूरपासून १२० किमी अंतरावर वसलेल्या ह्या मंदिराबद्दल सर्वात विचित्र म्हणा किंवा खास म्हणा अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे  येथे देवी भक्तांच्या हातात प्रसादाच्या रूपाने दारू प्राशन करते.

ह्या मंदिराबद्दल एक अशीही गोष्ट रूढ आहे की, जीण मातेचे मंदिर तोडण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने सैनिक पाठवले होते, परंतु त्याला हे मंदिर पाडण्यात त्याला काही यश आले नाही.

aurangzeb InMarathi

असे म्हणतात की, हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी एकदा हल्ला करण्याची आज्ञा दिली. त्याच्या सैनिकांना पाहून गावकरी प्रचंड घाबरून गेले. त्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप मनधरणी केली, त्यांची हरएक प्रकारे विनवणी केली.

परंतु, बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नाही हे पाहिल्यावर गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन देवीची आराधना केली आणि अहो आश्चर्यम जणू देवीने त्यांची आराधना ऐकली.

मंदिर तोडायला आलेल्या सैनिकांवर अचानक मधमाशांच्या झुंडीने हल्ला चढविला. घाबरलेल्या सैनिकांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने तेथून पळ काढला. असे म्हणतात की, दरम्यानच्या काळात औरंगजेबाआजारी पडला. त्याला कोणीतरी समजावले की देवीच्या अवकृपेमुळे हि परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. आजार काही केल्या कमी होत नव्हता.

honey-bee-inmarathi

 

शेवटी नाईलाजाने कट्टर इस्लाम मानणारा हा बादशहा देवीची माफी मागायला मंदिरात पोहोचला. त्याने जीण मातेची मनापासून माफी मागितली आणि मंदिरातील दिवा अखंड तेवत राहण्यासाठी दर महिन्याला सव्वा मण तेल अर्पण करण्याचं वचन बोलून दाखवलं.

काही दिवसांतच बादशाह ठणठणीत झाला आणि म्हणतात तेव्हापासूनच मुघल बादशहाची या मंदिरावर श्रद्धा जडली. आता हि गोष्ट किती खरी आणि किती खोटी याबद्दल मात्र ठोस पुरावे नाहीत.

 

aurangzeb 2 InMarathi

 

मंदिराबद्दल अजून एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी की, जीण मातेचा जन्म घांघू गावातील एका चौहान वंशाच्या राजा घंघ यांच्या घरी झाला. मातेचा हर्ष नावाचा एक मोठा बंधू होता. दोन्ही भावंडांचा एकमेकांवर जीव होता. जीण मातेला शक्तीचे आणि हर्ष याला भगवान शंकराचे रूप मानले जाते.

एकदा जीण माता आपल्या वहिनीसह पाणी भरण्यासाठी सरोवराकाठी गेली होती. तेव्हा दोघांत यावरून वाद झाला की, हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो? दोघींनी अशी पैज लावली की जिच्यावर डोक्यावरील घडा हर्ष अगोदर उतरवेल, त्यावरून हे स्पष्ट होईल की हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो.

jeen mata temple rajasthan InMarathi

 

यानंतर दोघीही हर्षसमोर आल्या. हर्षने सर्वात आधी आपल्या पत्नीच्या डोक्यावरील मडके उतरवले आणि ही पैज जीण माता हरली. यामुळे नाराज होऊन जीण माता अरावलीच्या पर्वतरांगेतील काजल शिखरावर बसली आणि घोर तप करू लागली.

हर्ष समजूत घालायला गेला, परंतु जीण माता परतली नाही आणि देवाच्या तपामध्ये लीन राहिली. बहिणीची समजूत काढण्यासाठी हर्षही भैरव तपस्येमध्ये लीन झाला. आता या दोघांची तपोभूमी जीणमाता धाम आणि हर्षनाथ भैरवाच्या रूपात प्रसिद्ध आहे.

bhairav nath temple harh mountain InMarathi

 

ह्या जीण माता मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध ते नवमीपर्यंत दोन यात्रा असतात. दरम्यानच्या काळात भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.

jeen mata temple rajasthan 2 InMarathi

 

केवळ राजस्थानातीलच नाही तर संपूर्ण भारतातील भाविकांमध्ये जीण मातेबद्दल अपार श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात येथे रात्री जागरण करण्याची आणी दान देण्याची प्रथा आहे.

अजून एक विशेष आकर्षण म्हणजे ह्या मंदिरात बाराही महिने दिवा अखंड तेवत असतो.

तर मग कधी राजस्थानच्या ह्या भागात गेलात की ह्या विशेष मंदिराला नक्की भेट द्या..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?