' ना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत! – InMarathi

ना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : विजय डोळे

===

‘जन-गण-मन’ हे आपलं राष्ट्रगीत… शाळेत असताना आपण ते रोज म्हणत असायचो, पण जसं आपली शाळा सुटते तसं आपण राष्ट्रगीत हे फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे याच दिवशी म्हणत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की, आपल्या देशात असं एक गाव आहे तेथे रोज राष्ट्रगीत म्हटलं जात. कोणतं आहे हे गाव आपण जाणून घेऊ…

cloudfront.net

हे गाव आहे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यातील करिमनगर जिल्ह्यातील. ‘जमिकुंटा’ असं या गावाचं नाव. या उपक्रमास कोणताही शासकीय आदेश नाही किंवा कुणाची ऑर्डरही नाही. हा स्तुत्य उपक्रम पोलीस निरीक्षक पी. प्रशांत रेड्डी यांच्या संकल्पनेतून व शहरवासीयांच्या सहकार्याने साकारला आहे.

सकाळच्या वेळी ७.५४ वाजले की, ५२ सेकंदासाठी संपूर्ण जमिकुंटा शहर थांबतं. येथे रोज सकाळी राष्ट्रगीताचं सामूहिक गायन होतं. शहरातील महत्त्वाच्या १६ ठिकाणी असलेल्या ध्वनिक्षेपकांवरून ते वाजवलं जातं. हजारो लोक या उपक्रमात सहभाग घेतात.

jammikuta-marathipizza02
hindustantimes.com

मग रस्त्यावरील परिवहन सेवेच्या बस, स्कूल बस, शाळेत जाणाऱ्या मुलांची गर्दी, पादचारी, मोटरसायकली, कारची वर्दळ, विक्रेते हे ही याला अपवाद नाहीत. विशेष म्हणजे नागरिक स्वतःहून या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अशा या अफलातून उपक्रमाचं कौतुक होणार नसेल तर नवलंच.

या शहरातील या उपक्रमाविषयी पोलीस निरीक्षक पी. प्रशांत रेड्डी यांनी बोलताना सांगितले की,

१६ ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरुवात झाली. देशभक्तीचं दर्शन या उपक्रमातून घडतंय. याला कारणही असंच होतं. गेल्या वर्षभरापासून मी येथील लोकांशी संवाद साधत आहे. या शहरातील ९० टक्के लोक राष्ट्रगीत गाऊ शकत नसल्याचं आढळून आलं. देशभक्ती जागृत करणं हाच केवळ या उपक्रमाचा हेतू नसून आपलं राष्ट्रगीत सर्वांनाच म्हणता यावं व देशासाठी आपणही काही करावं या जबाबदारीची जाणीव लोकांना व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.

jammikuta-marathipizza03
hindustantimes.com

या उपक्रमाला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुकाची थापही मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?