मिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का? जाणून घ्या ‘सत्य’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पूर्वीच्या काळी राजा – महाराजा, श्रीमंत असामी चांदीच्या आणि सोन्याच्या भांड्यामध्ये अन्न खात असत, हि गोष्ट त्या काळी मोठी रॉयल समजली जाई.

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हि गोष्ट केवळ दिखावा म्हणून केली जात नसे, तर त्यामागे एक मोठे शास्त्रीय कारण देखील होते. चांदी आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टमला मजबूत बनवते.

यामुळे शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती मिळते आणि सोने मेंदूला चालना देते. त्यामुळे आजही अनेक घरांत जेव्हा छोट्या मुलांना पहिल्यांदा पाणी पाजले जाते, तेव्हा चांदीचे ग्लास आणि चमच्याचा उपयोग केला जातो.

Gold-and-Silver-Utensils-marathipizza
quran-o-sunnat.com

आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या मिठाईवरती देखील चांदीच्या वर्खाचा उपयोग केला जातो. असे मानले जाते की, जास्त गोड खाणे आपल्या शरीराला हानिकारक असते. त्यामुळे यामध्ये चांदीचा वर्ख लावला असल्यास समतोल बनून राहतो.

पण खरच हा चांदीचा वर्ख तुमच्यासाठी फायद्याचा असतो. का? चला मग आज जाणून घेऊया की, हा चांदीचा वर्ख तुमच्यासाठी किती सुरक्षित आहे.

sweets-marathpizza01
i2.wp.com

सध्या प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ केली जाते हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे चांदी आणि सोन्यासारख्या धातूंमध्ये सुद्धा भेसळ असते. चांदीच्या वर्खाची शुद्धता त्याच्या उत्पादनावर अवलंबून असते.

असे निदर्शनास आले आहे की, कित्येक उत्पादक चांदीऐवजी अॅल्युमिनीयमच्या वर्खाचा वापर करतात. त्याव्यतिरिक्त हा वर्ख तयार करताना स्वच्छतेची योग्य ती काळजीही घेतली जात नाही.

अश्या परीस्थितीमध्ये जर तुम्ही खोट्या चांदीने सजवलेली मिठाई खात असाल तर तुम्ही लक्षात घ्या की, ती तुमच्या आरोग्याला नक्कीच घातक आहे.

कोणतीही वस्तू गरजेपेक्षा जास्त सेवन करणे शरीरासाठी वाईटच असते, त्यामुळे जर तुम्ही एका चिमटीपेक्षा जास्त चांदीचे सेवन करत असाल तर हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ही चांदी हळूहळू तुमच्या शरीरामध्ये जमा होऊ लागते आणि विषारी रसायने निर्माण करते, परिणामी तुम्ही आजारी पडू शकता. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये जखम होणे, पोटामध्ये दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

sweets-marathpizza02
wikimedia.org

म्हणजेच काय, तर चांदीचा वर्ख हा जर भेसळयुक्त नसेल आणि त्याचे मर्यादेत सेवन केले तर शरीराला त्याचा अपय होणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?