' गौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धात खरंच काही संबंध आहे? फरक आणि सत्य जाणून घ्या! – InMarathi

गौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धात खरंच काही संबंध आहे? फरक आणि सत्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘बुद्ध’…  हे काही नाव नाही…ती तर ज्ञानाची उपाधी आहे… ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे.

संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.

 

buddha-statue-bodh-gaya InMarathi

 

गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. एका राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा बुद्धांनी सर्व सुख सोयींचा त्याग केला आणि ते आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांचे जीवन आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. तर अश्या या महान गौतम बुद्धांशी बरेच जण लाफिंग बुद्धाची तुलना करतात.

अनेकांना वाटतं कि गौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा काहीतरी संबंध आहे. पण हे असत्य आहे.

 

laughing buddha inmarathi
india tv

 

हे लाफिंग बुद्धा कोण? हा नेमका प्रकार काय? आणि लोकं गौतम बुद्ध आणि यांच्यात नेमकं नावाशिवाय खरच आणखीन काही साम्य शोधतात का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत!

तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी, किंवा कार मध्ये एका माणसाचा पुतळा पाहिला असेल, जो तब्येतीने चांगलाच जाड आहे, पण गौतम बुद्ध सारखे त्याने सुद्धा डोळे मिटून घेतले आहेत, आणि एक सुंदर हास्य त्याच्या चेहेऱ्यावर आहे!

त्याला म्हणतात लाफिंग बुद्धा! आणि ही मूर्ती तुम्हाला वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात मिळते! आज आपण नेमके त्याच्याविषयीच जाणून घेणार आहोत!

 

laughing buddha 2 inmarathi
times of india

 

चीनी इतिहासानुसार, Liang साम्राज्याचा कालखंडात बुदाई नावाचे एक चान भिक्षु होते. त्यांचे खरे नाव Quicei होते, पण सर्व त्यांना बुदाई सुद्धा म्हणत असत.

ते नेहमी हसत आणि खुश राहत असतं, त्यामुळे त्याने लाफिंग बुद्धा म्हटले जाऊ लागले.

भगवान बुद्धांसारखेच बुदाई सुद्धा गावोगाव फिरून, मुलांना मिठाई आणि खेळणी वाटत असे. सँताक्लॉज सारखाच त्यांच्याकडे एक मोठी झोळी असायची,

ज्याला ते आपल्या पाठीवर टांगून चालत असत. त्यांची झोळी कधीही खाली नसायची. गरजू लोकांसाठी नेहमी त्यामध्ये काही ना काही असायचे.

बुदाईच्या जीवनाचे एकच उद्धिष्ट होते,ते म्हणजे लोकांमध्ये सुख वाटणे. याच कारणामुळे बुदाईला ‘पू-ताई’ सुद्धा म्हटले जाते असे.

 

laughing-buddha-marathipizza02
bmstores.co.uk

 

लाफिंग बुद्धाला मैत्रेया (Maitreya),म्हणजे भविष्यातील बुद्धाचे प्रतिक देखील मानले जाते. असा समज आहे की, लाफिंग बुद्धा भविष्यात मैत्रेयाच्या रुपात जन्म घेणार आणि बुदाई त्यांचेच अवतार होते.

बुदाईचे हास्य एवढे मनमोहक होते की, कोणीही त्यांना बघून स्मित न करता राहू शकत नसे.

जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपले मरण जवळ आले आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या साथीदारांना अशी सूचना दिली की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीराला अग्नी द्यावा.

त्यांची ही इच्छा ऐकून त्यांच्या भिक्षु साथीदारांना आश्चर्य वाटले, कारण झेन मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीराचे अग्नी संस्कार करण्यास परवानगी नव्हती, परंतु त्यांनी बुदाईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला.

जेव्हा बुदाईच्या शरीराला अग्नी देण्यात आला, तेव्हा दुसऱ्याच क्षणी चितेतून फटाके फुटण्यास सुरुवात झाली.

फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी पाहून सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि बुदाईच्या जाण्याचे दु:ख थोडे कमी झाले. बुदाईनी जाता-जाता सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले.

 

budai inmarathi
trip advisor

 

भगवान बुद्धांनी अध्यात्मिक ज्ञान हाच अंतिम सुख मिळवण्याचा मार्ग आहे सांगितले होते, पण बुदाईने हा संदेश दिला की, दुसऱ्यांना सुख वाटून सुद्धा सुख मिळते.

जपान मध्ये Ho-Tei देवाला अर्थात याच लाफिंग बुद्धाला Good Luck आणणाऱ्या सात देवांपैकी एक मानले जातात.

फेंगशुईनुसार कुठे ठेवावी लाफिंग बुद्धाची मूर्ती?

लाफिंग बुद्धाला ‘बुद्धा ऑफ वेल्थ’ सुद्ध म्हटले जाते. लोकांचा हा विश्वास आहे की लाफिंग बुद्धाला घरी ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते.

फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजाच्या बरोबर विरुद्ध दिशेला ठेवला पाहिजे. लाफिंग बुद्धाला अश्या जागेवर ठेवले पाहिजे जिथून तुम्ही नेहमी त्यांना पाहू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?