एकदाचं प्राचीन कोडं सुटलं! अंडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी – शास्त्रज्ञांनी उलगडलं उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अंड आधी आलं की कोंबडी?

हा प्रश्न कित्येक दशकांपासून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे. ह्या एका प्रश्नावर कित्येक चर्चासत्रे आजवर रंगलीत. पण अजूनही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काही सापडलं नाही. ह्यासारखाच आणखी एक प्रश्न आहे, ज्यावरून शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये नेहेमी मतभेद होत असतात.

 

eggs-inmarathi
mnn.com

एक वर्ग म्हणतो की अंडी ही शाकाहारी आहेत तर दूसरा म्हणतो ती मांसाहारी आहेत. जे लोक अंडी मांसाहारी मानतात त्यांच्या समज आहे की, कोंबडी ही मांसाहारी असते म्हणून तिने दिलेलं अंडही मांसाहारी असतं.

तर काहींच्या मते अंडीमधून कोंबडीच पिल्लू बाहेर येतं म्हणून ती मांसाहारी आहे. तर हिला शाकाहारी समजणाऱ्या लोकांच्या मते, जर गाईने दिलेलं दुध शाकाहारी आहे तर कोंबडीने दिलेलं अंड मांसाहारी का?

 

eggs-inmarathi04
livestrong.com

म्हणून आता ह्यावर वैज्ञानिकांनी आपले तर्क-वितर्क लावून अखेर एक उत्तर शोधून काढलं आहे.

आधी ज्या लोकांना असं वाटत की अंड्यातून पिल्लू बाहेर येते म्हणून ते मांसाहारात मोडल्या जावे, त्या लोकांनी सर्वात आधी हे जाणून घेणे गरजेचं आहे की, कोंबडी अंडी कश्या प्रकारे देते.

तर कोंबडी दर एक ते दीड दिवसांत अंडी देते. पण ह्यासाठी तिला कोंबड्याच्या संपर्कात यायची काहीही गरज नसते. कोंबड्याच्या संपर्कात न येता देखील ती अंडी देऊ शकते.

 

eggs-inmarathi03
mnn.com

कोंबड्याच्या संपर्कात न येता कोंबडी जी अंडी देते त्यातून पिल्लू नाही येत. शास्त्रीय भाषेत ह्याला अनफर्टिलाइज्ड एग असे म्हणतात. आणि ही अंडी शाकाहारी असतात.

 

eggs-inmarathi02
livestrong.com

तर कोंबडी जी अंडी कोंबड्याच्या संपर्कात येऊन देते त्याला मांसाहारी मानले जाते. ह्या अंडींमध्ये गॅमीट सेल असतात, ज्यातून पिलांची उत्पत्ती होते. आणि हे मांसाहारी असतात.

 

eggs-inmarathi05
agriculturewire.com

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्या अंडींमधून पिलं यायची शक्यता असते ती अंडी शेतकरी विकत नाहीत, जेणेकरून कोंबड्यांची संख्या वाढून त्यांच्या व्यवसायात भर पडेल.

त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, अंडी ही मांसाहारी नाही तर शाकाहारी असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “एकदाचं प्राचीन कोडं सुटलं! अंडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी – शास्त्रज्ञांनी उलगडलं उत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?