भारतात 5G फोन्स येताहेत खरे, पण 5G म्हणजे नेमकं काय आणि ते खरंच आवश्यक आहे का? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सॅमसंग, क्वालकम, मिडियाटेक, व्हीवो, अप्पो आणि वनप्लस यासारख्या मोबाईल कंपन्यांनी २०१९ पर्यंत 5G फोन बाजारपेठेत दाखल होतील अशी घोषणा देखील केली आहे.

काय आहे 5G फोन? भारत खरच या नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यास सज्ज आहे का? सेल्युलर फोनच्या बदलत चाललेल्या प्रवासात भारत नेमके कुठे उभा आहे? इतक्यातच आपलयाला 5G फोन वापरण्याची गरज आहे का?

तुम्ही या बदलासाठी सज्ज असा अगर नसा पण 5G फोन भारतात लवकरच येत आहेत.

 

5G inmarathi
Digital Trends

या वर्षात तुमच्या कानात 5G फोन हा शब्द सतत गुंजत राहणार आहे. सेल्युलर फोनच्या या नेक्स्ट जनरेशन बद्दल आत्ता तुम्हाला बरेच काही ऐकायला मिळेल.

मोबाईल क्षेत्रातील बड्याबड्या कंपन्या हा फोन बाजारपेठेत आणण्याच्या स्पर्धेत उतरल्या देखील. परंतु, भारतात ही सेवा किती प्रमाणात पोचेल, कशी पोचेल, याबद्दल आपल्याला काही चर्चा तरी नक्कीच करायला हवी.

सतत काही न काही बदलत असलेल्या सध्याचा काळात मोठा परिणाम होईल आणि फार चर्चा होईल असा बदल म्हणजे 5G तंत्रज्ञान!

5G तंत्रज्ञान असलेले मोबाईल फोन्स २०१९ च्या शेवटी किंवा २०२० च्या सुरुवाती पर्यंत बाजारपेठेत दाखल होताहेत. मागील प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान देशात फारच वेगाने दाखल होत आहे.

 

5g-network-speeds. inmarathi
PhoneArena

सेल्युलर फोनच्या तंत्रज्ञानाच्या विकासातील पाचवा टप्पा म्हणजे 5G तंत्रज्ञान, यामुळे मोबाईलवरील डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगचा स्पीड वाढणार असून, सोबतच नेटवर्क कनेक्ट होण्याचा स्पीड देखील वाढणार आहे.

5G तंत्रज्ञान आल्यानंतर डाऊनलोडिंगचा स्पीड १Gbps ने वाढणार आहे.

जे सध्याच्या स्पीडच्या शंभरपट अधिक असेल. सरळसाध्या भाषेत सांगायचे झाल्यास, 5G मुळे अव्हेंजर्स किंवा इनफिनीटी वॉरचे एचडी व्हर्जन डाऊनलोड करण्यास तुम्हाला अगदी काही सेकंदाचा कालावधी पुरेसा आहे. तुम्ही जर हे चित्रपट ऑनलाईन पाहणार असाल तर नेट वरील बफर टाईम अगदी कमी असेल.

5G मुळे फ्रीक्वेन्सी वाढणार असल्याने नेटवर्क कंजेशन सारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

जागतिक बाजार पेठेत सध्या लॉंच होणार्या सर्व मोबाईलमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे. येत्या वर्षात 5G तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 5G फिल्ड ट्रायल सुरु आहे.

 

5g internet inmarathi
Tech.in

२०१९ मध्येच यासाठीच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाची कामे पार पडतील. २०२० पर्यंत बाजारपेठेत विक्रीसाठी हे फोन तयार असतील.

या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वागतासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचा व्यवहार होण्याची शक्यता आहे.

टेलिकॉम ऑपरेटिंग कंपन्यांची ब्रँडविड्थ वाढवल्यानंतर जे 5G फोनच्या स्पीडसाठी आवश्यक असणार आहे, आम्ही लगेचच भारतात हा फोन लॉंच करणार आहोत, अशी माहिती व्हीवोचे भारतातील संचालक निपुण मार्या यांनी दिली.

रिलायन्सला देखील २०१९-२० पर्यंत 5G सिस्टीम तयार होईल अशी अशा आहे.

अमेरिका आणि काही प्रमुख देशांसह, चीन आणि जपान देखील २०१९ मध्ये 5G च्या स्वगातासाठी सज्ज आहेत. भारतातील बाजारपेठ आकारमानाने मोठी असल्याने, 5G तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी स्पेक्ट्रम लिलाव लवकरात लवकर पार पडले पाहिजेत.

नवे तंत्रज्ञान वापरण्यासाठी नवा मोबाईल हँडसेट घेणे गरजेचे आहे का? तर हो. जेंव्हा 3G चे 4G मध्ये अपग्रेडेशन झाले तेंव्हा ग्राहकांना चांगल्या स्पीडची सेवा अनुभवण्यासाठी 4G सीम आणि 4G हँडसेट घ्यावे लागले होते.

 

4g handset inamarthi
TelecomLive

आत्ताही अजून चांगल्या स्पीडची सेवा अनुभवण्यासाठी सीम आणि फोन दोन्ही बदलावे लागतील. सॅमसंग, क्वालकम, मिडियाटेक, व्हीवो, अप्पो आणि वनप्लस, मोटोरोला सारख्या सर्व कंपन्या बाजारात 5G हँडसेट लवकरात लवकर आणि कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या तयारीला लागल्या आहेत.

टेलिकॉम कंपन्यांकडे 5G सेवा उपलब्ध होईपर्यंत २०२० साल उजाडणार आहे.

खरे तर सर्व प्रगत तंत्रज्ञान भारतात उशिराने पोहोचते अशी परंपरा आहे. अजूनही आपण 4G नेटवर्कच्या ऑफरसाठी झगडत आहोत. खरेतर भारतातील 4G नेटवर्कचा स्पीड अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे.

त्यामुळे येत्या वर्षात काही फात मोठा बदल पाहायला मिळेल याची अशा धूसरच आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण मंडळाने (ट्राय) 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. दरम्यान, भारतात २०२२ पर्यंत 5G तंत्रज्ञान पूर्णतः अवलंबले जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भारतात 4G तंत्रज्ञानाचा प्रभाव गेल्या दोन वर्षात वाढला आहे. त्यामुळे 5G तंत्रज्ञान किती लवकर प्रभाव पडू शकेल याबद्दल शंकाच आहे. भारतात एअरटेल आणि आयडियाने 4G सेवा सर्वात आधी आणली तरी, रिलायंसने जिओ लॉंच केल्यानंतरचा भारतात 4Gचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.

सरकारद्वारे चालवल्या जाणार्या BSNL कंपनीने अगदी काही महिन्यापूर्वी 4G सेवा सुरु केली आहे. फक्त BSNLच नाही तर भारतातील इतर ब्रॉडबँड कंपन्यांना देखील अजून चांगली 4G सेवा देता आलेली नाही.

नेटवर्क कंजेशन, कॉल ड्रॉप, स्लो कनेक्टीव्हिटी सारख्या समस्या अजूनही आहेतच.

 

bsnl 4g inmarathi
Himachal Dastak

अजूनही डाऊनलोडींग किंवा अपलोडींग स्पीड खर्या अर्थाने 4G दर्जाचा नाहीये. हा विषय झाला स्पेक्ट्रमचा. भारतातील चीप तयार करणाऱ्या कंपन्यांची अवस्था याहून फारशी वेगळी नाही.

मिडियाटेकचे सीएफओ डेव्हिड को यांच्या मते, “5G तंत्रज्ञान आणणे हे काही एकहाती काम नाही त्यासाठी पूर्ण सिस्टीम तयार व्हायला हवी, पूर्ण सिस्टीम जेंव्हा उभी राहील तेंव्हा नक्कीच आम्ही देखील 5G हँडसेट आणण्यास सज्ज असू”.

स्मार्टफोनमध्ये 5G तंत्रज्ञान वापरण्यासाठी या तंत्रज्ञानाला साजेशी चीप स्मार्टफोन मध्ये असणे गरजेचे आहे. स्मार्टफोन कंपन्यां 5G तंत्रज्ञान असलेले मॉडेल आणण्यात किती उत्सुक आहेत, हा आत्ता खरा प्रश्न आहे.

 

apple 4g inmarathi
Currys

अॅपलचे उदाहरण घेतल्यास, ही कंपनी 5G मॉडेल अनन्यास फारशी सज्ज झालेली दिसत नाही. कारण, त्यांच्या लेटेस्ट आयफोनला अजिबात चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

काही महिन्यांपूर्वीच गुगलने देखील 3 pixel लॉंच केला आहे, गुगल आत्ता 4pixel लॉंच करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे गुगल लवकरात लवकर 5G हँडसेट आणेल याची शक्यता कमी आहे.

 

smartphone shop inmarathi
justdial.com

मात्र क्वालकम चीप वापरणाऱ्या सॅमसंग, वनप्लस, मोटोरोल यासारख्या कंपन्या वर्षभरात आपले नवीन 5G हँडसेट बाजारात आणतील अशी अशा आहे.

भारत सज्ज असो किंवा नसो 5G लवकरच लॉंच होणार आहे, आत्ता! क्वाल्कम आणि त्यांचे इतर सहकारी यासाठी आवश्यक असणारा पाया कसा उभारतात हे जाणणे नजीकच्या भविष्यात जास्त गरजेचे आहे, जे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?