नव्याने तयार होणाऱ्या ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आजवर आपण मुलींची पार्टी, लेडीज नाईट, किटी पार्टी ह्याबाबत एकले असेल. पण आज आपण लेडीज बीच बद्दल जाणून घेणार आहोत. एक असं आयलंड तयार होणार आहे जिथे केवळ मुलीच जाऊ शकतात.

म्हणजे जगातील असे एक ठिकाण जिथे पुरूषांचं नाही तर महिलांचं वर्चस्व आहे. येथे पुरुषांच्या जाण्यावर चक्क बॅन आहे.

 

supershe_island-inmarathi05
kimneder.com

हे आयलंड फिनलंडच्या बाल्टिक समुद्राजवळ आहे. ह्या आयलंडच नाव Super-She आयलंड आहे. हे आयलंड ह्यावर्षीच्या उन्हाळ्यात सुरु होणार आहे.

 

Super-she-inmarathi
supersheisland.com

हे आयलंड अमेरिकेच्या एक यशस्वी बिज़नेसवूमन क्रिस्टीना रॉथ ह्यांची शोधाचे फलित आहे. क्रिस्टीना यांना अनेक दिवसांपासून एका अश्या ठिकाणाचा शोध होता, जिथे केवळ आणि केवळ महिला स्वतंत्रपणे मजा करू शकतील.

आपले सर्व टेन्शन विसरून आपल्या जीवनातील काही क्षण स्वतःसाठी जगतील.

supershe_island-inmarathi02
instagram

ही बाब क्रिस्टीनाच्या मनात तेव्हा आली जेव्हा त्या कॅलीफोर्निया च्या कालाबसास येथील आश्रमात सुट्ट्या घालवत होत्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, तेथील महिलांचे लक्ष हे स्वतःपेक्षा जास्त तिथल्या पुरुषांवर होते.

 

supershe_island-inmarathi01
instagram

क्रिस्टीना ह्यांनी सांगितले की, त्यांच रिसोर्ट उघडण्यामागील मूळ हेतू पुरुषांविरोधी नाही. पण सध्या हे रिसोर्ट केवळ महिलांसाठीच आहे.

 

supershe_island-inmarathi07
news.com.au

क्रिस्टीनाने ८.४ एकर क्षेत्रफळ असलेले हे आयलंड सप्टेंबर २०१७ साली विकत घेतले होते. सध्या येथे बांधकाम सुरु आहे. ह्या रिसोर्ट मध्ये ४ कॅबीन असतील जिथे स्पा, सौना बाथ ह्यासोबतच इतरही काही सुविधा असतील.

 

supershe_island-inmarathi04
supersheisland.com

अश्याप्रकारे केवळ महिलांकरिता असलेले हे एक वेगळे आयलंड असणार आहे. जिथे महिला स्वतःच्या मर्जीने स्वतःसाठी काही वेळ घालवू शकतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?