बर्गे साहेबांच्या पुढाकाराने पुण्याच्या वेश्यावस्तीत पहिल्यांदा दिवाळी साजरी झाली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एटीएस पथकाची धाडसी कारवाई तर आपण सर्वांनीच पहिली आहे. बेडर, क्रूर, अमानवी गुन्हेगारांशी भिडण ही तशी साधी गोष्ट अजिबात नाही. यासाठी गरजेचं असतं अमाप धाडस, निधडी छाती आणि न्याय बुद्धी.

InMarathi Android App

ज्या पोलिश अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगिरीच दर्शन आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून झालं, त्याच पोलीस पथकातील एक महत्वाचं नाव म्हणजे, पुणे एटीएसचे प्रमुख भानुप्रताप बर्गे!

१९ एन्काऊंटर करणाऱ्या भानुप्रताप बर्गे यांचा हा चित्तथरारक प्रवास वाचल्यावर या रिअल टाईम हिरो बद्दलचा आदर शतपटीने वाढतो.

असे अधिकारी आज आपल्यात आहेत म्हणून समाजात शांतता नांदते आहे. सामान्य माणसांना देखील आज पोलीस अधिकाऱ्यांचा आधार वाटतो आहे. गुन्हेगारांना कर्दनकाळ वाटणारे हे अधिकारी सामान्य माणसांना मात्र आपले मसीहा वाटतात.

 

UP-police-inmarathi
indiatoday.com

भानूप्रताप याचं मूळ गांव सातारा जिल्ह्यातील कोरेगांव. त्यांचे शिक्षण मात्र पुणे आणि परिसरातील भागामध्येच झाले. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएची पदवी संपादन केली आणि त्यानंतर एमबीएला प्रवेश घेतला.

सोबतच ते एमपीएससीची सुद्धा तयारी करत होते. एमबीएच्या पहिल्या वर्षातच म्हणजे १९८५ साली त्यांची पीएसआयपदी निवड देखील झाली.

बर्गे साहेबांना देशसेवेचा वारसा त्यांच्या आजोबाकडून मिळाला. त्यांचे आजोबा आर्मीमध्ये होते त्यानतंर त्यांच्या वडिलांनी देखील काही काळ लष्करात सेवा बजावली.

त्यांतर एक वर्ष त्यांनी नाशिकमध्ये ट्रेनिंग घेतले आणि ट्रेनिंग नंतर त्यांचे पोस्टिंग डोंगरी येथे झाले. डोंगरी हा मुस्लीम बहुल प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागात दाउद इब्राहीम पासून ते हाजी मस्तान पर्यंतच्या सर्व बदनाम गुंडांचा इथे वावर असायचा.

आपल्या दहशतीने संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या या कुप्रसिद्ध गुंडांच्या प्रत्येक केस मध्ये बर्गे यांनी जबाबदार भूमिका निभावली आहे.

ऑगस्ट २००९ साली त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. खलिस्तानी अतिरेक्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची नात आणि धीरूभाई अंबानी यांच्या अपहरणाचा कट रचला होता.

 

bhanupratap barge inmarathi
Insgain.com

भानुप्रताप बर्गे यांनी तो कात उधळून लावत त्या अतिरेक्यांना अटक देखील केली होती. एटीएसचे सिंघम द रिअल हिरो म्हणून ओळखल्या जाणार्या या अधिकाऱ्यांना जवळपास ४०० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Survivals Club Membership हा दहशतवाद विरोधी कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय पोलीस अधिकारी आहेत.

आपल्या या यशाचं आणि कर्तृत्वाच सर्व श्रेय त्यांचे आजोबा, आई-वडील आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांना देतात.

१९९१ साली मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या शूटआऊट ही घटना मुंबईच्या गुन्हेगारी विश्वासासाठी प्रचंड धक्कादायक होता. या गोळीबारात माया डोळस आणि दिलीप बुवा सारख्या कुप्रसिद्ध गुंडांसह ७ जणांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते.

भानुप्रताप बर्गे देखील त्यावेळी पोलिसांच्या या टीमचे एक सदस्य होते. या चकमकीत जेंव्हा दिलीप बुवाने बचावासाठी पोलिसांवर गोळ्या झाडल्या तेंव्हा एक गोळी बर्गे सरांच्या उजव्या हाताला घासून गेली ज्यामुळे ते जखमी झाले.

पण, तशाही परिस्थतीत अतिरिक्त कुमक येईपर्यंत तब्बल ४० मिनिटे, त्यांनी नेटाने खिंड लढवली. ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ हा हिंदी सिनेमा याच घटनेवर बेतलेला आहे.

कर्तबगार एटीएस अधिकारी या भूमिकेतून त्यांनी अनेक दहशतवादी कृत्यांचाही छडा लावला. पुण्यात एटीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर एका १६ वर्षीय युवतीची आयसीसच्या तावडीतून सुटका करण्यात ते यशस्वी झाले.

 

barge inmarathi
YouTube

ही युवती इसीसच्या तत्वज्ञानाने प्रभावित झाली असून, ती इंटरनेटच्या माध्यामातून इसीसच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आली होती आणि पुढील प्रशिक्षणासाठी तिला सिरीयाला बोलावण्यात आले होते. पण, बर्गे सरांनी अतिशय कुशलतेने आणि चातुर्याने ही केस हाताळली आणि त्या मुलीची मुलतत्ववादाच्या प्रभावातून सुटका केली.

यानंतर इसीसकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या.

पुण्याला बर्गे सरांची बदली झाली तेंव्हा ते ४६ वर्षांचे होते. पुण्यात आल्यानंतर ही त्यांनी अनेक धाडसी मोहिमा राबवल्या. पुण्यातील गणेश मारणे गँगच्या अनेक गुंडांना त्यांनी अटक केली.

आयएसआयचा हस्तक असल्याचा संशय असणारा, विशाल्कुमार उपाध्याय, बाळ्या वाघिरे गँगचे गुंड आणि खतरनाक गुन्हेगार परश्या जाधव यांना देखील गजाआड डांबण्याचे धाडस त्यांनी केले.

दहशतवादी आणि गुन्हेगारांशी कठोरपणे आणि निर्दयतेने वागणाऱ्या या माणसात माणुसकी आणि संवेदनेचाही अमोघ झरा आहे. दरवर्षी पुण्यातील वेश्यावस्तीत आणि किन्नर समाजात दिवाळी साजरी करण्यासाठी ते पुढाकार घेतात. अनेक मुलीना वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडण्यास देखील त्यांनी सहाय्य केले आहे.

समाजातल्या एका अत्यंत वंचित घटकाला माणुसकीची आणि सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून बर्गे सरांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

सध्याचा तरुणाईला आणि त्यातही विशेषतः मुलीना स्वसरंक्षण करण्याचे बळ मिळावे, आयुष्यात अनेकदा वाईट प्रसंगातून जाण्याची वेळ येते अशावेळी आपले धैर्य आणि आत्मविश्वास कसा टिकवून ठेवावा यासंबधी मार्गदर्शन करत असतात.

त्यांच्यामुळे अनेक रोडरोमियोना चांगलाच चाप बसला असून अशा मस्तवाल रोमियोंशी दोन हात करण्याचे धाडस मुलींमध्ये वाढत आहे.

 

bhanupratap inmarathi
india.com

आजोबा लष्करात असल्याने देशप्रेमाचा आणि देशसेवेचा वारसा त्यांना पिढीजातच मिळाला आहे, आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी तो सिद्ध देखील केला आहे.

आजच्या तरूणाईला देखील ते हाच संदेश आहे की, आपल्या देशाची उज्जवल परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करा, जिथे अन्याय दिसत असेल त्याविरोधात आवाज उठवा आणि समाजातील कोणत्याही समस्येवर कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.

तसेच, करिअरकडे पाहताना फक्त पैसे मिळवणे किंवा घर चालवण्यासाठी कमावणे एवढ्याच मर्यादित दृष्टीकोनातून न पाहता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. यामुळे तुम्हाला काम केल्याचे समाधान मिळेल आणि आयुष्यात यशस्वी व्हाल.

“देशसेवा करणे हेच माझे ध्येय होते आणि त्यासाठी मी पोलीस क्षेत्र निवडले, कारण मला त्याची आवड होती आणि म्हणून या क्षेत्रात मला चांगले नाव कमावता आले,” असे ते सांगतात.

आजच्या काळात तत्वांशी तडजोड करणारे अनेक अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. पण, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही देश आणि देशवासीय यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे बर्गे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी म्हणजे वाळवंटातील ओअॅसिस आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *