दैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

या टेकनॉलॉजिच्या युगात आज आपण खूप प्रगती केली आहे. नवनवीन प्रयोग करून निरनिराळे शोध लावून आपण आपले जीवन अधिक सुखकर केले. ज्यामुळे जीवन जगणे सोपे आणि आणखीन आनंददायी झाले. माणसाने नेहमी स्वतःला प्रगतिशील ठेवले आणि आजही तो निरनिराळे प्रयोग करतच असतो. पण काही शोध असेही आहेत जे सामान्य माणसांसाठी नव्हते लावले गेले तरी त्या शोधांचा सर्वात जास्त उपयोग आता सामान्य माणूसच करतो… हो असेही काही शोध आहेत जे जगातील विविध सैन्यदलाने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी लावले होते. पण आज तेच शोध आपण आपल्या सोयीकरिता वापरतो… चला तर मग जाणून घेऊ या ते शोध आणि त्यांचा तेव्हाच आणि आजचा उपयोग….

१.  एअरक्राफ्ट ट्रॅकिंग रडार

tracking-radar-marathipizza
wikimedia.org

१९३० साली रॉयल एर फोर्स, युनायटेड किंगडमद्वारे ‘एअरक्राफ्ट ट्रॅकिंग रडार’चा शोध लावण्यात आला आणि वापर करण्यात आला. हा शोध हवाई संरक्षण प्रणालीला प्रारंभिक दिशानिर्देश चेतावणी  देण्यासाठी करण्यात आला होता. आता याचा उपयोग एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केला जातो.

 

२. वॉकी-टॉकी

Walkie-talkie-marathipizza
radioreference.com

१९३० मधेच डोनाल्ड हिंग्स आणि अल्फ्रेड जे. ग्रॉस या दोन कॅनेडियन्सनी याचा शोध लावला. याचा उपयोग लष्करात पोर्टेबल टू-वे रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम म्हणून होत होता. आज याचा उपयोग  व्यवसाय, सार्वजनिक सुरक्षितता, समुद्र, amateur radio आणि सीबी रेडिओसाठी होतो.

 

३. नाईट व्हिजन

night vision-marathipizza
gad.ru

१९३९-१९४० साला दरम्यान नाईट व्हिजनचा शोध लावला गेला. याचा शोध अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांनी लावला असून ते त्याचा उपयोग कमी प्रकाश असताना चांगल्या व्हिसिबिलीटीसाठी करत असत. आता याचा उपयोग लो लाईट फोटोग्राफी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पळत ठेवण्यासाठी केला जातो.

 

४. डक्ट टेप

Duct-tape-marathipizza
wikipedia.org

१९४२ साली युनायटेड स्टेट्समध्ये शोधण्यात आलेले हे डक्ट टेप मूळतः दारुगोळ्याचे केस सील करण्यासाठी हे वापरले जात होते, परंतु आता हे मल्टिपर्पज गोष्टींसाठी वापरले जात आहे.

 

५. बॅलेस्टिक मिसाईल

ballistic missiles-marathipizza
gizmodo.com

१९४० साली या बॅलिस्टिक मिसाईलचा शोध लावण्यात आला. याचा उपयोग मूळतः नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियनद्वारा लांब पल्ल्याच्या आक्रमणात केला जात होता. आता हे अंतराळ संशोधनात, दळणवळणाच्या प्रक्षेपण, हवामान आणि ग्लोबल पोजिशनिंग सॅटेलाईट इत्यादी उद्देशांसाठी वापरले जात आहे.

 

६. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी

Nuclear-energy-marathipizza
wonderfulengineering.com

न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी शोध हा १९४० साली लागला. मोठ्या प्रमाणावर विध्वंसासाठी  युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि कॅनडायांनी या नुक्लिअर वेपनचा वापर केला. परंतु आता याचा उपयोग नागरिकांच्या फायद्यासाठी तसेच अणुऊर्जेकरिता केला जातो.

 

७. जेट इंजिन

jet engine-marathipizza
wikipedia.org

जेट इंजिनचाही शोध १९४० साली रॉयल एर फोर्स व नाझी जर्मनीद्वारे लावला गेला. याचा उपयोग जेट फ्लायर आणि जेट बॉम्बर्स म्हणून करण्यात आला होता. तर आता हा शोध सर्व प्रवासी एअरलाइन्समध्ये वापरला जातो.

 

८. डिजिटल फोटोग्राफी

digital photography-marathipizza
thecamerasite.net

डिजिटल फोटोग्राफीचा शोध १९६० साली अमेरिका आणि सोव्हियत युनिअनने लष्करी गरजांना लक्षात ठेऊन केला होता. डिजिटल फोटोग्राफीचा वापर स्पाय सॅटेलाईटसाठी केला गेला. आता हाच शोध आता कॅमेरा म्हणून मोठ्या प्रमाणात लोक वापरतात.

 

९. इंटरनेट

Internet-marathipizza
juniorinventors.com

इंटरनेटचा शोध १९६० मध्ये लावण्यात आला. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्स यांनी लष्करी कारणासाठी विश्वसनीय संगणक नेटवर्किंग म्हणून याचा शोध लावला आणि वापर केला. ब्रिटिश वैज्ञानिक टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाईड वेबच्या शोधाची नेमणूक केली आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्सची आजवरची व्यापक उपलब्धता आजही आहे.

 

१०. सॅटेलाईट नॅव्हिगेशन

satellite navigation-marathipizza
google.com

१९७० साली युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियनद्वारा शोध आणि वापरलेले, सॅटेलाईट नेव्हिगेशन हे मूलतः nuclear weapons force multiplier आणि नॅव्हिगेशनद्वारे लढाऊ अचूकतेसाठी वापरण्यात आले होते. हा शोध आता नॅव्हिगेशनसाठी आणि वैयक्तिक ट्रॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.

बघितलत… हे शोध जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो ते खरे आपल्यासाठी नव्हतेच… पण त्यामुळे आज आपलं जीवन आणखीन सोपं झालाय… यासाठी या सैन्यांना धन्यवाद नक्की द्यायला हवा…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?