रूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लहान मुलांच्या खेळण्यात तुम्ही तो कापडात कापूस घालून बनवलेला गुबगुबीत दिसणारा बहुला पहिला असेल. हं ! तोच तो.. टेडी बेअर. लहान मुलांचे खेळण्याचे विश्व या टेडी बेअरशिवाय पूर्ण झाल्याचे तुम्ही क्वचितच अनुभवले असेल. कित्येक जण तर मोठे झाल्यावर देखील आपलं हे लहानपणीचं खेळणं अगदी जीव लावून जपून ठेवतात.

पण कधी असा प्रश्न पडलाय का तुम्हाला, की या खेळण्याचं नाव टेडी बियर का पडलं असेल? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, टेडी बियरचे नावं हे अमेरिकेचे २६ वे राष्ट्रपती थियोडोर रूजवेल्ट यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. आणि ह्यामागील कारणही तेवढंच रंजक आहे. मिसिसिपी शिकार यात्रेदरम्यान रूजवेल्ट यांनी एका अस्वलाला मारण्यास नकार दिला होता. ही गोष्ट १९०२ सालची आहे.

अमेरिकेतील खाणीत काम करणाऱ्या कामगारांनी अधिक वेतन आणि कामाचे तास कमी करण्यासाठी तसेच सुरक्षित कार्यक्षेत्र मिळावे ह्यांसारख्या मागण्यांसाठी स्ट्राईक केली होती. जवळपास दीड लाखाहून अधिक खाण कामगार स्ट्राईकवर गेले होते.

 

teddy-bear-name-story-inmarathi
pocketfullofwanderlust.com

ह्यामुळे अमेरिकत कोळश्याची टंचाई भासू लागली. तर दुसरीकडे खाण मालकांनी देखील कामगारांशी चर्चा करण्याचं टाळल्याने ही स्ट्राईक खूप दिवस चालली. पण देशात कोळश्याची कमतरता बघता तेव्हाचे राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी ह्यात हस्तक्षेप केला. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर ही स्ट्राईक मागे घेण्यात आली.

 

teddy-bear-name-story-inmarathi01
wikimedia.org

ह्यादरम्यान राष्ट्रपती रुझवेल्ट ह्यांना खूप मानसिक तणाव सहन करावा लागला होता. म्हणून त्यांनी काही दिवस सुट्ट्यांवर जायचा विचार केला. त्यांनी मिसिसिपी चे गव्हर्नर अॅण्र्ड्यू एच लोन्गीनो ह्यांचा सुट्टीवर जाण्याचा प्रस्ताव मान्य केला. ह्यालाच मिसिसिपी शिकार यात्रा असे नावं देण्यात आले.

 

teddy-bear-name-story-inmarathi02
teddyrooseveltlive.files.wordpress.com

ह्यासाठी मिसिसिपीत शिकारसाठी कॅम्प लावण्यात आले. राष्ट्रपतीच्या ह्या टीममध्ये मोठ्या प्रमाणात घोडे, शिकारी कुत्री आणि काही लोकांव्यतिरिक्त काही पत्रकार देखील सामील होते.

कॅम्पच्या पहिल्याच दिवशी रूजवेल्ट आणि त्यांच्या टीमला कुठेही अस्वल दिसला नाही. दुसर्या दिवशी जवळपास २३५ पाउंडचा एक मोठा अस्वल त्यांना दिसला. ह्या अस्वलाला पकडून त्याला झाडाला बांधण्यात आले, जेणेकरून राष्ट्रपती रूजवेल्ट त्यावर गोळी चालवून त्याची शिकार करू शकतील.

 

teddy-bear-name-story-inmarathi03
wikimedia.org

पण रूजवेल्ट ह्यांनी जेव्हा त्या असहाय अस्वलाला असे झाडाशी बांधलेले बघितले तेव्हा ते म्हणाले की,

“मी शिकारीसाठी संपूर्ण अमेरिकेत फिरलो आणि मला अभिमान आहे की, मी एक शिकारी आहे. पण एका वृद्ध आणि हतबल अस्वलाची हत्या करून मला माझा अभिमान वाटणार नाही. आणि तेही एका अश्या अस्वलाची हत्या जो झाडाला बांधलेला आहे.”

 

teddy-bear-name-story-inmarathi04
tobysimkin.com

ही घटना अमेरिकेच्या वर्तमान पत्रांची मुख्य बातमी बनली. १७ नोव्हेंबर १९०२ ला अमेरिकेच्या दि वॉशिंग्टन पोस्ट मध्ये हे कार्टून छापून आले होते.

 

teddy-bear-name-story-inmarathi05
i.pinimg.com

ह्यावरून प्रभावित होत न्युयोर्क येथील एक दुकान चालविणाऱ्या मॉरीस मिसोम नावाच्या व्यक्तीने एक अस्वलाचं खेळणं बनवलं आणि त्याला राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांना समर्पित केलं. ह्या खेळण्याला खुद्द राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी प्रमाणित केल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांनी मॉरिसला ह्या खेळण्याच टेडी असं उपनाव ठेवण्याची परवनागी देखील दिली.

ह्यानंतर टेडी बियर हा संपूर्ण अमेरिकेत हिट झाला. ज्यानंतर मॉरिस कॅण्डी विकण्याचा आपला धंदा सोडून पूर्णपणे टेडी बियर बनविण्याच्या बिझनेस मध्ये उतरला.

 

teddy-bear-name-story-inmarathi07
lilbabycakes.com

तर मग कळलं ह्या तुमच्या आवडच्या टेडी बियरचा जन्म कसा झाला आणि त्याला हे नावं कसं पडलं ?

ह्यामुळे राष्ट्रपती रूजवेल्ट हे जरी आज ह्या जगात नसले तरी ह्यांना समर्पित हा टेडी बियर कित्येक वर्षांपासून आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत आपल्याला त्यांचे स्मरण करवून देत राहिल…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?