ब्लूटूथ ला हे नाव कसं पडलं? मोबाईल, लॅपटॉप च्या ऑन-ऑफ चं चिन्ह कसं तयार झालं? वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

ब्लूटूथ, मोबाईल आणि लॅपटॉप ही तर आपल्या रोजच्या जीवनाची साधने आणि तिन्हीही अतिशय उपयुक्त बरं का! पण कधी कधी होतं काय, अश्या रोजच्या, आपल्या नेहमी जवळ असणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते, म्हणजे आपल्याला त्यांचा पुरेपुरे वापर करता येतो, मात्र त्यांच्या मागे दडलेली रंजक माहिती मात्र माहित नसते. आज आम्ही तुम्हाला ब्लूटूथ, मोबाईल आणि लॅपटॉप या तिन्ही उपकरणांशी निगडीत एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.

सर्वप्रथम जाणून घेऊया ब्लूटूथ ला हे नाव कसं पडलं?

वायरलेस डाटा शेअरींग ची गरज भासल्यावर त्यावर संशोधन सुरु झाले आणि 1994 मध्ये Ericsson कंपनीने blue tooth चा शोध लावला. या तंत्रज्ञानावर काम करणारा Jim Kardach त्यावेळी The Long Ships हे पुस्तक वाचत होता आणि त्यात त्याने वायकिंग राजा Harald Bluetooth याच्या बद्दल वाचलं. या राजाने डेन्मार्कचे एकिकरण केले होते म्हणुन एकमेकांना जोडणाऱ्या तंत्रज्ञानाचे नाव Harald Bluetooth वर असावे असे त्याला वाटले.

kingharoldbluetoth-marathipizza
ancientpages.com

Blue thooth चा लोगो bind rune आहे म्हणजे जोडाक्षर आहे H आणि B चे. ( हि लीपी थॉरचे वडील ओडीन यांनी मानवाला दिली अशी दंतकथा आहे )

bluetooth-mararthipizza01
bnn.lv

 

हे झालं ब्लूटूथ चं, आता पाहूया मोबाईल, लॅपटॉप च्या ऑन-ऑफ चं चिन्ह कसं तयार झालं?

ब्लूटूथ प्रमाणेच गंमत कंप्युटर, मोबाईल वर असणाऱ्या पॉवर on/off च्या चिन्हाची आहे. वर्तुळाला भेदुन जाणारी उभी रेष असं ते चिन्ह आपण बघितले आहे. कंप्युटर क्षेत्रातील binary system मधुन हे चिन्ह आले आहे. यात 1 चा अर्थ आहे on आणि 0 चा अर्थ आहे बंद.

power-button-marathipizza
freepik.com

वर्तुळ म्हणजे शुन्य आणि त्याला भेदणारी रेषा म्हणजे एक असं पॉवर on/off चे चिन्ह सांगते.

जगप्रसिद्ध google हे नाव सुद्धा spelling type करताना झालेल्या चुकीमुळे पडले आहे. lary page ला खरेतर googol हे नाव ठेवायचे होते, गणीतीय भाषेत त्याचा अर्थ होते एकावर शंभर शुन्य परंतु त्याच्या मित्राने google स्पेलींग लिहिले आणि ते डोमेन उपलब्ध होते आणि the rest is history.

google-new-logo-marathipizza
businessinsider.in

आणखी रस असल्यास आणखी खुप सारी चिन्ह आहेत आणि गंमतीदार किंवा बराच इतिहास दडलेली माहिती त्यामागे आहे, जरूर शोध घ्या.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?