भारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये? उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. रोजच्या रोज दोन्ही देशांतील संबंध अजूनच बिघडत चालले आहेत. काश्मीरमध्ये उडणाऱ्या खटक्यांचे पडसाद आज दोन्ही देशांमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि आता या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची लक्षणे खूपच कमी दिसून येत आहेत. मिडीया आणि राजकीय परिस्थितीने आज भारत आणि पाकिस्तानला एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू बनवले आहे. पण एक असा काळ होता, जेव्हा काही वर्षांपूर्वी हेच दोन देश बंधुभावाने एकत्र नांदत होते. १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण एका देशाचे दोन तुकडे झाले. ज्याने एकत्र बंधुभावाने राहणाऱ्या लोकांना दोन देशांमध्ये विभाजित केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तयार करण्यात आलेल्या या सीमेला रेडक्लिफ लाईन नाव देण्यात आले.

India - Pakistan border.marathipizza
sillyconfusion

या सीमेचे हे नाव ब्रिटीश अॅडव्होकेट सिरीयस रेडक्लिफच्या नावावर पडले, ज्यांना भारताच्या जमिनीला दोन तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचे काम दिले गेले होते. हा तोच अधिकारी होता, ज्याला भारताची कोणतीच भौगोलिक माहिती नव्हती, तरीदेखील लॉर्ड माउंटबेटनच्या दबावामुळे दोन महिन्यांतच ही सीमा बनवावी लागली.  रेडक्लिफला स्वतः देखील हे माहित होते की, या विभाजनाचा भारत आणि पाकिस्तान या दोघांना देखील परिणाम भोगावा लागेल. पण नाईलाजाने ते असे करण्यास तयार झाले.

याच दबावाचा परिणाम असा झाला की, १५ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीच्या वेळी गुरुदासपुर आणि फिरोजपुर हे प्रदेश पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. स्वतःची ही चूक लक्षात आल्यानंतर लॉर्ड माउंटबेटनने आदेश दिले की, या दोन्ही प्रदेशांना परत भारतामध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला परत एक रेषा आखली गेली. त्यामुळे परत एकदा अंतर्गत कलह आणि दंगल सुरू झाली.


India - Pakistan border.marathipizza1
hindustantimes.com

११ ऑक्टोबरनंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये अटारी – वाघा बोर्डर अस्तित्वात आली. या बोर्डरला तयार करण्यामध्ये भारतीय सेनेचे ब्रिगेडियर महिंदर सिंह चोप्रा आणि पाकिस्तानचे ब्रिगेडियर नसीर अहमदचे महत्त्वाचे योगदान होते. नुकतीच रेडक्लिफ लाईनने आपली ७० वर्ष पूर्ण केली आहेत, तेव्हा त्या कार्यक्रमात ब्रिगेडियर चोप्रा यांचा मुलगा पुष्पिंदर चोप्रा याने हजेरी लावली होती. पुष्पिंदरने सांगितले की,

आठ ऑगस्टला त्यांच्या वडिलांना १२३ इंफेट्री ब्रिगेड सोबत येथे लक्ष ठेवण्याचे काम दिले गेले होते, त्याचबरोबर पाकिस्तानकडून त्यांचे ज्युनियर आणि पाक सैन्याचे ब्रिगेडियर नसीर अहमद आपल्या सीमेची देखरेख करत होते.

indo pak wagha marathipizza

पुष्पिंदर चोप्राने सांगितले की,

जेव्हा फाळणी झाली, तेव्हा येथे कोणतीच सीमा नव्हती. त्यामुळे हे समजत नव्हते की, कोणत्या बाजूला भारताची सीमा संपते आणि कुठून पाकिस्तानची सीमा सुरू होते. यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक ठेवण्यात आली. त्यानंतर चुन्याची रेष आखून सीमा तयार करण्यात आली. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानच्या बाजूला एक – एक ड्रम ठेवण्यात आला. ज्याला दोन्ही देशांच्या पोस्टच्या स्वरुपात वापरण्यात आले.

अश्या या भारत आणि पाकिस्तान सीमेमुळे खूप मोठमोठ्या घडामोडी घडल्या आणि दोन देशांतील एकत्रित असणारी माणसे मनाने देखील विभागली गेली.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *