AK47 बद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मानवी संस्कृतीच्या इतिहासाला सुरुवात होण्याआधी पासून मानवाला शस्त्रांची गरज भासलेली आहे. प्राण्यांची हाडं, दगड इथपासून सुरु झालेला आपला प्रवास त्झार बाँब पर्यंत येऊन ठेपला आहे. वैयक्तिक शस्त्रास्त्रांच्या निवडीत “स्वस्त, सहज उपलब्ध होणारे, हाताळण्यास सोपे, वजनाने हलके, दुरूस्तीची कटकट कमी असणारे आणि परिणामकारक” इ गुण असलेली शस्त्रं लढवय्यांना आवडली नाहीत तर आश्चर्यच. वरील सर्व कसोट्यांवर उतरणारे शस्त्र म्हणुन ak-47 तथा “ऍटोमॅट कलाश्निकोव” या रायफलचा उल्लेख करावा लागेल.

Ak-47-marathipizza
sofrep.com

मिखाईल कलाश्निकोव या रशियन माणसाने या रायफलचे डिझाईन बनवले आणि १९४८ साली अधिकृतरीत्या या रायफलचा समावेश रशियन सैन्यदलात झाला.

(AK-47 चा निर्माता) nytimes.com


या रायफल १०/२०/४०/७५ अशा विविध राउंड मॅगझीन प्रकारात उपलब्ध आहेत. (एक राउंड म्हणजे एक गोळी) हि रायफल वॉटरप्रुफ आहे. चिखल मातीचा देखील यावर परिणाम होत नाही. ही रायफल गटारात फेकून दिली आणि कित्येक वर्षानंतर वापरात आणली तरी ती व्यवस्थित काम करते अशी ख्याती तुम्ही सरफरोश चित्रपटात ऐकली आहेच. रशियन बनावटीची अस्सल कलाश्निकोव हातानेच बनवली जाते आणि या रायफलच्या निर्मिती मध्ये महिला कामगार जास्त आहेत कारण नाजुक हाताने करण्याचे कलाकुसरीचे हे काम आहे.

Ak-47-marathipizza02
gunsgunsandmoreguns.wordpress.com

साधारणपणे ३०० मीटर अंतरावरून लक्ष्य व्यवस्थित भेदण्याची क्षमता कलाश्निकोव मध्ये आहे. अत्यंत निष्णात शुटर मनुष्याच्या आकाराचे लक्ष्य ८०० मीटर वरुन देखिल कलाश्निकोवने भेदु शकतात.

या रायफलचे आयुष्य ६००० ते १५००० राउंड इथपर्यंत असून, कुठल्या मेकची ak47 रायफल आहे यावर अवलंबून आहे. बांगलादेशा पासुन अमेरिकेपर्यंत या रायफलच्या कॉपीचे उत्पादन होते. भारतात त्रीचन्नापल्ली येथे ak47 चे उत्पादन होते.

Ak-47-marathipizza03
abpnews.abplive.in

साधारण नागरिक, सैनिकांपासुन ते दहशतवाद्यांपर्यंत या रायफलचे ग्राहक आहेत. अफगाणीस्तानमध्ये यादवी काळात हजारभर रूपयात ही रायफल काळ्या बाजारात उपलब्ध होत असे. जगात आजही काही ठिकाणी कोंबडी किंवा धान्याच्या एखाद्या पोत्याच्या बदल्यात ak47 उपलब्ध होते.

जगात सर्वाधिक लोकप्रिय असणारे हे शस्त्र मोझांबीक देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर देखिल पहायला मिळते त्याचे कारण म्हणजे मोझांबीकच्या स्वातंत्र्यात ak47 चा सिंहाचा वाटा आहे.

Ak-47-marathipizza04
wikipedia.org

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार जगात उपलब्ध असलेल्या ५० कोटी शस्त्रांपैकी १० कोटी शस्त्रं ही कलाश्निकोव परिवारातीलच उत्पादनं आहेत आणि त्यातील साडेसात कोटी ak-47 आहेत.

Ak-47-marathipizza05
pinterest.com

संरक्षणासाठी ज्या शस्त्राचा वापर व्हायला हवा आज त्याचं शस्त्राचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर होतोय ही मात्र अतिशय खेदाची गोष्ट म्हणावी लागेल!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *