प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगातील सर्वोत्तम वायूसेनांपैकी एक वायुसेना म्हणून भारताच्या वायुसेनेकडे पाहिलं जातं. त्याला कारणं देखील तशीच आहेत. वायूसेनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की त्याचे दाखले आजही जगभर दिले जातात आणि सध्या वायूसेनेमध्ये रुजत असलेली आधुनिकता आणि प्रगतशीलता भारताच्या या धाडसी फौजेला अधिकच बळकट करत आहे.

चला तर आज जाणून घेऊया भारताच्या साहसी वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी!

 

indian-air-force-marathipizza00

स्रोत

भारतीय वायुसेना जगातील चौथी सगळ्यात मोठी वायुसेना आहे.


 

indian-air-force-marathipizza02

स्रोत

भारतीय वायूसेनेचे संपूर्ण भारतामध्ये ६० एयरबेस आहेत आणि त्यांची ७ कमांड्स मध्ये विभागणी करण्यात आली आहे. १६ एयर बेससह पश्चिम एयर कमांड भारताचा सगळ्यात मोठा एयर कमांड आहे. सगळ्यात छोटा सेन्ट्रल एयर कमांड आहे ज्यामध्ये केवळ ७ एयर बेस आहेत.

 

indian-air-force-marathipizza03

स्रोत

अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे परमुलुखात देखील भारतीय वायूसेनेचा एयरबेस आहे हा बेस तजाकिस्तानामधील फरखोर मध्ये आहे.

 

indian-air-force-marathipizza01

स्रोत

२२००० फुट उंचीवर वसलेले सियाचीन ग्लेशियरचे एयरफोर्स स्टेशन भारतीय वायूसेनेचे सर्वात उंचावर असलेले एयर स्टेशन आहे. येथे इतकी थंडी पडते की रक्त गोठून जातं.

 

indian-air-force-marathipizza04

स्रोत

भारतीय वायूसेना सध्या १३९ जॅग्वार आणि १०० मिग-२७ विमानांचा उपयोग करते.

 

indian-air-force-marathipizza05

स्रोत

१९३३ सालापासून भारतीय वायूसेनेचा लोगो आजवर ४ वेळा बदलण्यात आला आहे. १९४७-१९५० या काळात लोगो म्हणून अशोकचक्राचा वापर केला गेला.

 

indian-air-force-marathipizza06

स्रोत

१९४५ ते १९५० या काळात भारतीय वायूसेनेला रॉयल इंडियन एयर फोर्स या नावाने ओळखले जायचे. ‘रॉयल’ ही उपाधी राजा सहावा जॉर्ज याने दिली होती.

 

indian-air-force-marathipizza07

स्रोत

भारतीय वायुसेनेसाठी HF-24 Marut नामक पहिले लढाऊ विमान हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड तर्फे बनवण्यात आले होते. १९६१ ते १९८५ या काळात हे विमान सेवेमध्ये होते.

 

indian-air-force-marathipizza08

स्रोत

१९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये भारतीय वायूसेनेने अचूक नेम धरत २९ पाकिस्तानी टँक, ४० ए.पी.सी. आणि एक ट्रेन उडवली होती. पाकिस्तानी सेनेने हार मानण्यापूर्वी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या ९४ लढाऊ विमानांना नेस्तनाबूत करून टाकले.

 

indian-air-force-marathipizza09

स्रोत

भारतीय वायुसेनेच्या इतिहासामध्ये आजवर अनेक शूर सैनिक होऊन गेले. परंतु भारतीय सेनातर्फे देण्यात येणारा सर्वात प्रतिष्ठेचा ‘परम वीर चक्र’ पुरस्कार भारतीय वायूसेनेच्या केवळ एकाच वीराला मिळाला आहे. तो वीर म्हणजे निर्मल जीत सिंह होय. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी दाखवलेल्या अपर शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते.

 

indian-air-force-marathipizza10

स्रोत

१९६५ सालापर्यंत भारतीय वायुसेना पाकिस्तानी वायुसेनेच्या तुलनेत थोडीफार मागे होती. परंतु १९६५ च्या युद्धामध्ये भारतीय वायुसेनेच्या वीरांनी पाकिस्तानच्या “सबरे” नामक लढाऊ विमानांची चांगलीच जीर मोडली. तेव्हापासून भारतीय वायुसेनेला ‘सबरे के कातील’ अशी उपाधी देण्यात आली होती.

 

indian-air-force-marathipizza11

स्रोत

सध्या भारतीय वायुसेनेमध्ये जवळपास २२४ तुकड्या तैनात आहेत. सध्याच्या आकडेवारी वर नजर टाकता भारतीय वायूसेनेकडे १४७३ व्हायबीय बँड आहेत ज्यामध्ये ट्रेनर, मालवाहू आणि हेलिकॉप्टरचा देखील समावेश आहे.

 

indian-air-force-marathipizza12

स्रोत

भारतीय वायूसेनेची पहिली महिला मार्शल होण्याचा मान पद्मावती बंडोपाध्याय यांना मिळाला होता. त्या वायुसेना मेडिकल सर्व्हिसच्या डायरेक्ट जनरल होत्या.

 

indian-air-force-marathipizza13

स्रोत

भारतीय वायूसेनेचे पहिले कमांडर-इन-चीफ एयर मार्शल थॉमस वॉकर एमहिस्ट यांनी भारतीय वायूसेनेला स्वतंत्र सेवेचे स्वरूप दिले. जेणेकरून भारतीय वायूसेनेवर भारतीय सेनेचे नियंत्रण नसावे.

 

indian-air-force-marathipizza14

स्रोत

ऑगस्ट २०१३ रोजी भारतीय वायूसेनेने लडाखमधली सगळ्यात उंचावर असलेल्या (१६६१४ फुट) धावपट्टीवर यशस्वीरीत्या विमान उतरवून आपल्या नावे विश्वविक्रम नोंदविला होता.

 

indian-air-force-marathipizza15

स्रोत

भारतीय वायूसेनेच्या सेवेत असलेले Sukhoi Su-30 MKI हे आकाशातून जमिनीवर मारा करणारे प्राथमिक लढाऊ विमान आहे.

 

indian-air-force-marathipizza16

स्रोत

भारतीय वायुसेना जगातील एकमात्र वायूसेना आहे जी C-17 Globemaster III, C-130J Super Hercules आणि II-76 सारख्या भल्यामोठ्या मालवाहू एयरक्राफ्टचा वापर करते.

 

indian-air-force-marathipizza17

स्रोत

भारतीय वायूसेनेमार्फत हाती घेण्यात आलेले “ऑपरेशन राहत” जगातील आजवरचे सर्वात मोठे ऑपरेशन ठरले. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय वायूसेनेच्या वीरांनी १९,६०० लोकांना वाचवलं.

 

indian-air-force-marathipizza18

 

अशी आहे ही अतुल्य भारताची अतुल्य वायुसेना !!!

हे देखील तुम्ही वाचलच पाहिजे: भारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या ऐकताच उर अभिमानाने भरून येतो

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *