तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या अमेरिकेबाबतच्या ‘खऱ्या’ गोष्टी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
अमेरिका म्हणजे आजच्या घडीतील जागतिक महासत्ता होय. संरक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान प्रत्येकच बाबतीत हा देश जगातील सर्वच देशांपेक्षा सरस आहे. आज प्रत्येक क्षेत्रावर या देशाचे वर्चस्व आहे. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून अमेरिकन राष्ट्रपतींची ओळख आहे, यातच सारं काही आलं.
या अमेरिकेबद्दल तसं पाहता बहुतेक गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण मंडळी अश्याही काही गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्या कानी पडलेल्या नाहीत. यातील बहुतांश गोष्टी या रंजक आणि विस्मयकारक आहेत, चला तर जाणून घेऊयात काय आहेत त्या गोष्टी!
१) १९३० मध्ये आर्थिक मंदीमुळे हजारो अमेरिकन नागरिक सोव्हीएत संघात गेले होते.

२) १८६७ मध्ये अमेरिकाने रशियाकडून अलास्का प्रांत केवळ ७.२ मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता.

३) १९६२ मध्ये अमेरिकेने आकाशात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला होता. तो हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा १०० पटीने अधिक शक्तीशाली होती.

४) अमेरिकेत २० ते ३० च्या दशकात मद्यपानावर बंदी घातली होती. त्यावेळी विषारी औषधांमुळे १०,००० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

५) अमेरिकेत दररोज १०० एकर जमिनीच्या क्षेत्रफळा एवढे पिझ्झे खाल्ले जातात.

६) अमेरिकेत मुलांना जन्म देणाऱ्या जवळपास ४०% माता अविवाहीत आहेत.

७) अमेरिकेत मद्यपानकरून ड्रायव्हींग केल्याने दर तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

८) एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेचे नागरिक दरवर्षी ८ अब्ज रुपयांचे चिकन खातात.

९) अमेरिकेत कर्मचारी ४.४ वर्ष एका नोकरीत टिकून असतात.

१०) एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत रोज सुमारे ७ टक्के नागरिक आंघोळ करत नाहीत.

११) एका अंदाजानुसार अमेरिकेत धुम्रपानामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० नागरिकांचा मृत्यू होतो.

१२) अमेरिकन नागरिक टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी दररोज पाच सेन्ट्स खर्च करतात.

१३) अमेरिकेत २५ टक्के अल्पवयीन मुले पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात.

१४) एक अमेरिकन व्यक्ती केनिया मधील ३२ नागरिकांना जगण्यास पुरेल एवढ्या साधनसंपत्तीचा वापर करतो.

काय?…. वाचून बसला ना आश्चर्याचा धक्का!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.