' पाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा अभेद्य ठेवणारा सुपर-स्पाय – InMarathi

पाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा अभेद्य ठेवणारा सुपर-स्पाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण अनेक स्पाय एजंटच्या गोष्टी आजपर्यंत ऐकल्या असतील. आज आम्ही आपल्याला भारतीय गुप्तचर खात्यातील अशाच एका स्पाय एजंटची गोष्ट सांगणार आहोत. असा स्पाय – ज्याचा पुर्ण जीवनपट आपण वाचला किंवा पाहिला तर आपल्याला ते कोणत्यातरी हॉलीवूड पटातील हिरोपेक्षा कमी वाटणार नाहीत.

आपल्या आयुष्यातील तब्बल सात वर्षे शत्रूराष्ट्र पाकिस्तानात एक पाकिस्तानी मुस्लिम म्हणून व्यतीत करणं, न केवळ व्यतीत करणं, तर जे काही रोजचं जगणं आहे ते आपल्या मातृभूमीसाठी म्हणजेच भारतासाठीच जगणं या गोष्टीची केवळ कल्पनाच आपण करू शकतो.

आपण आजपर्यंत ब्लॅक टायगर किंवा ब्लॅक पँथरची अर्थात रविंद्र कौशिक यांची  गोष्ट ऐकली असेल. ज्या त्यागाने आणि समर्पणाने कौशिक यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांसाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं त्या कामाला तोड नाही.

ravindra-kaushik-story-marathipizza01

 

अशाच प्रकारचा एक गुप्तचर खात्याचा माणूस पाकिस्तानात जातो आणि भारताला हरेक उपयुक्त माहिती पुरवत राहतो.

तब्बल सात वर्ष देशासाठी काम करून हा माणूस भारतात परत येतो आणि भारतातल्या दक्षिणोत्तर- पुर्व पश्चिम अशा सर्व भागांतील विद्रोही आणि देशद्रोही कारवायांमध्ये लिप्त असणाऱ्या शक्तींना शह देतो.

ज्यांना शांतीकाळातील सर्वात महत्वाचा असा किर्ती चक्र पुरस्कारानंही सन्मानित केलं जातं. ही काही सामान्य गोष्ट नाही आणि ते असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे अजित ड़ोभाल.

 

ajit-doval-marathipizza03

 

खरंतर अजित डोभाल हे  मुळचे उत्तराखंडच्या गढवालचे. त्यांनी सुरूवातीला अजमेर मिलट्री शाळेतून शिक्षण पूर्ण करून, आगरा विद्यापीठातून स्नातोकत्तर अर्थशास्त्राची पदवी घेतली. नंतर १९६८ च्या केरळ कॅडरचे ते आयपीएस अधिकारी झाले.

चारच वर्षांत, म्हणजे १९७२ साली, ते आय.बी. या गुप्तचर खात्यात रूजू झाले. २००५ साली अजित डोभाल आयबीच्या निर्देशकपदावरून सेवानिवृत्त झाले.

३० मे २०१४ साली त्यांना पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमले गेले.

ऑपरेशन ब्लू स्टार तर आपल्याला माहिती असेलच. संपूर्ण पंजाब ज्यावेळेस खलिस्तान्यांच्या नंगानाचामुळे होरपळून निघत होता. तेव्हा अजित डोभाल नावाचा हा जेम्स बाँड खलिस्तानवाद्यांचा सगळ्यात विश्वासू पाकिस्तानी एजंट होता.

कल्पना करा, ज्या खलिस्तानवाद्यांनी स्वर्णमंदीर आणि संपूर्ण अमृतसरसकट अख्खा पंजाब वेठीस धरला होता, त्यांचा सगळ्यात विश्वासू माणूस म्हणजे डोभाल.

 

डोभाल यांना खलिस्तानवाद्यांची खडान् खडा माहिती होती. त्यांच्या रोजच्या रोज चालणाऱ्या, चर्चा, बैठका आणि वेगळ्या खलिस्तानसाठी चालणारी सगळी खलबतं अजित डोभाल यांच्या डोळ्यासमोर चालत असत.

तिथून इंत्यभूत सर्व माहिती सरकारला पुरवण्याचं काम अजित डोभाल यांनी केलं. पर्यायानं ब्लू स्टार ऑपरेशन जे सर्वांनी कुठे न कुठे ऐकलयं, वाचलंय ते यशस्वी झालं.ब्लू स्टारला यशस्वी करण्याची जेवढी भूमिका सैन्याची होती. त्यापेक्षा अधिक महत्वाची भूमिका ही डोभाल यांची राहीलीय.

 

ajit-doval-marathipizza00
youtube.com

१९६८ साली पुर्वोत्तरमधील लालडेंगा दहशतवादी समूहाचा आतंक आपण कुठे ना कुठे ऐकला -वाचला असेल, अशा क्रूरकर्म्या दहशतवादी संघटनेच्या तब्बल ६ कमांडरचं मनपरिवर्तन करून त्यांना सरकारच्या बाजूने वळवण्याचं काम देखील डोभाल यांचंच.

१९७१ ते १९९९ पर्यंत शत्रूराष्ट्रांकडून ५ वेळा इंडियन एअरलाईन्सच्या विमान अपहरणांचा डाव अजित डोभाल यांनी हानून पाडला

१९९९ साली कंधार विमान अपहरण प्रकरणात अजित डोभाल हे भारताकडून मुख्य वार्ताकार म्हणून आतंकवाद्यांशी चर्चा करायला पोहोचले.

जून २०१४ मध्ये आईएसआईएस च्या तावडीतून ४६ भारतीय नर्सेसना (परिचारिकांना) सोडवून भारतात परत आणण्यात अजित डोभाल यांनी महत्वाची भूमिका निभावलीय.

खरंतर अजित डोभाल यांचे यापेक्षाही अनेक कारनामे आहेत. काही आपल्याला ठाऊक आहेत तर काही अजून उजेडात यायचे आहेत. परंतू या माणसाची पात्रता आणि त्याची योग्य जागा जर कोणी ओळखली असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी.

देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात नो कॉम्प्रमाईज म्हणणारा असामान्य प्रतिभेचा धनी असलेला सरकारी अधिकारी अजित डोभाल यांनी जी या देशाची नेशन्स पॉवर संपूर्ण जगाला दाखवून दिलीय त्यामुळं भारतीयच काय तर आंतरराष्ट्रीय न्यूसन्स पॉवरसुध्दा आपल्याला टरकून आहेत.

 

pakistan-dobhal-inmarathi

 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा या माणसाला प्रचंड आदर आणि अभिमान, नाहीतर जेएनयूमधून पास होऊन अधिकारी होणाऱ्यांना भारतीय संस्कृती म्हणजे एकदम पिछाडलेली आणि दरिद्र अशा प्रकारची वाटू लागते.

डोभाल सारखे व्यक्ती शत्रूराष्ट्रात राहून देखील भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतात. स्वामी विवेकानंदांनी साऱ्या जगाला भारतीय संस्कृतीची ओळख पटवून दिली. त्याच धरतीवर डोभाल हे देखील भारतीय टॅलेंटला जगभरात ओळख मिळवून देण्याचं काम करतायत.

कदाचित त्यांच्या याच गुणांचा प्रभाव नरेंद्र मोदी यांच्यावर पडला. त्याचाच परिणाम म्हणून मोदींनी डोभाल यांचा समावेश आपल्या टीममध्ये करण्याचा निर्णय घेतला

पाकिस्तानच्या विरोधात केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल वा म्यानमारमधील उग्रवाद्यांचा केलेला कायमचा बंदोबस्त. नक्षलवाद्यांचं मोडलेलं कंबरडं असेल वा देशभरातील न्यूसन्स वॉल्यूजना शून्यावर आणून आंतरिक सुरक्षा आणि अखंडतेला असलेला धोका कमी करण्याचं काम असेल. वा – छोटा राजनची अटक आणि दाऊद इब्राहिमच्या मनाला धडकी भरवण्याचं काम असेल.

ही सर्व कामं अजित डोभाल ह्यांनी सहजपणे पेलली. हीच डोभालांच्या प्रतिभेची मोदी सरकारला मिळालेली पोचपावती आहे.

अजूनही अनेक मोहिमा ह्या पेपरवर येतायत त्याची वाच्यता किंवा त्याबद्दल काही लिहीणं बोलणं योग्य वाटणार नाही. जेंव्हा वेळ येईल तेंव्हाच या काळपुरूषाचा महिमा आपल्याला दिसेल.

 

Ajit-Doval-2 Inmarathi

त्यामुळं अजित डोभाल यांचं काम हे, निश्चितच या राष्ट्रासाठी प्रेरणादायी असं काम आहे. ज्या तरूणांना देशासाठी काम करण्याची इच्छा आहे. देशासाठी काहीतरी थ्रील आणि धाडसी काम करायचंय त्यांनी खरंतर अशा प्रकारचा मार्ग चोखाळायला हरकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?