आपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

Information Asymmetry म्हणजे थोडक्यात माहितीची असमानता. कुठल्याही व्यवहारात किमान दोन बाजू असाव्या लागतात आणि दोन्ही बाजूना त्या व्यवहाराच्या अनुषंगाने उपलब्ध असणारी माहिती ही जेव्हा असमान, भिन्न असते तेव्हा जन्म होतो Information Asymmetry चा.

अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर समजा ‘अ’ या व्यक्तीला त्याची गाडी विकायची आहे आणि ‘ब’ या व्यक्तीला ती विकत घ्यायची आहे. ‘अ’ ने ती गाडी स्वतः वापरलेली असल्यामुळे त्याला गाडीच्या बाबत बरीच जास्त माहिती असते जी तो पूर्णपणे ‘ब’ ला सांगत नाही. ‘ब’ हा कदाचित गाड्या विकणारा दलाल असू शकतो आणि त्याला जुन्या गाड्यांच्या किंमतीबाबत ‘अ’ पेक्षा खूप जास्त माहिती असते जी तो ‘अ’ ला देत नाही. अशा रीतीने एकमेकांपासून माहिती लपवत, वैयक्तिक स्वार्थ सांभाळत हा व्यवहार पार पडतो.

information-assymetry02-marathipizza

स्रोत

वरील व्यवहारात लपवलेल्या माहितीच्या स्वरूपानुसार ‘अ’ किंवा ‘ब’ किंवा अगदी दोघेही एकाच वेळी फसले जाऊ शकतात. ‘अ’ आणि ‘ब’ यांच्यामधल्या व्यवहारासारखे असंख्य व्यवहार Market मध्ये दिलेल्या क्षणी होत असतात. आणि जर अशी information asymmetry सर्वत्र राहिली तर त्याने market failure सुद्धा होऊ शकते. 2001 साली अर्थशास्त्राचे नोबेल ‘Information Asymmetry असणाऱ्या मार्केट्सचे विश्लेषण’ या विषयावर संशोधन करणाऱ्या 3 अर्थशास्त्रज्ञांना मिळाले.


माहितीची असमानता ही अपेक्षित नसली तरीही नं टाळता येणारी आहे. कारण त्याला व्यक्तींच्या, संस्थांच्या स्वार्थाचा मजबूत पाया आहे.

सरकार असो, नेते असोत, मीडिया असो, संस्थांची/कंपन्यांची कार्यकारी मंडळे असोत, ऑफिस मधले सहकारी असोत किंवा अगदी घरातील कुटुंबीय…प्रत्येक ठिकाणी जिथे माहिती लपवून स्वार्थ साधता येतो, तिथे Information Asymmetry ही पाहायला मिळणार यात संशय नाही.

कॉर्पोरेट कंपन्या तोट्यात असताना सुद्धा लाभांश (dividend) जाहीर करून मार्केट ला खोटे signaling करतात की “आमच्यात सगळे सुरळीत चालू आहे”.

समस्त सरकारे तर प्रत्येक माहिती नागरिकांपासून लपवण्यात कसलीही कसूर सोडत नाहीत म्हणून ‘माहितीचा अधिकार’ हा त्यांना गळ्याभोवतीचा फास वाटतो, whistle-blowers मारले जातात आणि विकिलिक्सच्या ज्युलियन सारख्यांना परागंदा व्हावे लागते.

ऑफिसमधले, कामाच्या ठिकाणचे उदाहरण घ्याल तर कंपनीच्या/संस्थेच्या हितपेक्षा वैयक्तिक स्वार्थ/ईर्षा मोठ्या असणारा प्रत्येक कर्मचारी काही माहिती लपवून ठेवत असतो, Information Asymmetry चे प्राणपणाने संरक्षण करत असतो. असे करण्यात स्वतःची अकार्यक्षमता झाकता येते, होणाऱ्या बदलांना थांबवता येते, स्वतःचे महत्व अबाधित ठेवता येते आणि प्रसंगी स्वतःचे भ्रष्टाचार, conflict of interest लपवता येतात. घरातल्या घरात सुद्धा स्वतःचे महत्व, उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठी व्यक्ती माहिती लपवून ठेवतात.

information-assymetry-marathipizza

स्रोत

एखाद्या ओसाड, जंगलातल्या जागी थोड्याशा दीर्घ कालावधीत कवडीमोल दराने काही संस्था, लोक जमीन शेतकरी लोकांकडून खरेदी करतात. काही वर्षांनी त्याच ठिकाणी SEZ, एखादा प्रकल्प, शैक्षणिक संस्था वगैरे उभारण्याची घोषणा केली जाते आणि नंतर कळते की काही काळ आधी ही जमीन खरेदी करणारे राजकीय नेत्यांचे हस्तक होते, ज्यांनी त्या भागात तो SEZ, त्या शैक्षणिक संस्था आणायचा घाट कित्येक वर्षे आधीच घातला होता, फक्त त्याची information लोकांपासून लपवून ठेवली होती. हजारांच्या भावात शेतकऱ्यांकडून घेतलेली जमीन लाखांच्या, कोटींच्या भावात सरकारला, शैक्षणिक संस्थेला विकली जाते, फक्त Information Asymmetry मुळे. आणि अगदी हेच करून या देशातले समस्त राजकारणी गब्बर झालेत.

अगदी याच आठ्वड्यातले उदाहरण घ्याल तर 500 आणि 1000 च्या नोटा बंद होतील ही information काही मर्यादित लोकांना (बहुतकरून राजकीय पक्षांना, काळा पैसा ठेवणाऱ्या उद्योगपतींना) आधीच होती आणि CNBC ने दाखवून दिले की गेल्या 3 महिन्यांत अचानक बँकेत पैसा जमा करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते.

ज्या अर्थी हा पैसा बँकांत जमा केला जात होता त्याअर्थी त्याच्याही कैकपटीने जास्त काळा पैसा अजूनही वेगवेगळ्या प्रकारे पांढरा करून झालाही असेल गेल्या 3 महिन्यांत. सामान्य लोक ATM समोर रांगा लावत असताना, जीवनावश्यक सेवांसाठी झगडत असताना, औषधोपचारांविना मरत असताना एकही काळा पैसा ठेवणारा उद्योगपती, राजकीय नेता हार्ट अटॅक येऊन मेला नाही याचे कारण CNBC ने दिलेल्या बातमीत आहे, Information Asymmetry मध्ये आहे.

मानवजातीच्या पहिल्या व्यवहारापासून information asymmetry अस्तित्वात आहे. आज Information Technology च्या युगात जेव्हा समस्त लोकांकडे माहितीची साधने उपलब्ध आहेत, तेव्हा सुद्धा ही माहितीची असमानता अस्तित्वात आहे.

उलट Information Technology च्या जमान्यात Information Asymmetry ठेवण्यात खूप जास्त फायदा आहे, कारण आज Information ही आजच्या जगात पैसा आणि सत्ता मिळवण्याची चावी आहे.

आणि ही माहितीरुपी चावी म्हणूनच काही मूठभर लोक त्यांच्या हातातून कधीही दुसरीकडे जाऊ देणार नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *