ब्रा : विनाकारण अश्लील समजल्या जाणाऱ्या ह्या महिलांच्या मैत्रिणीचा जन्म व इतर रंजक माहिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

स्त्रियांचे अंतर्वस्त्र म्हणजेच ‘ब्रा’… आता हे अंतर्वस्त्र आलं कुठून, म्हणजे ह्याचा शोध कसा लागला? तर ह्या ब्रा चा इतिहास हा अतिशय रंजक असा आहे. आपल्या देशात आजही ह्या शब्दाचा चारचौघात उच्चार करणे, किंवा उघड्यावर इतर कपड्यांसोबत वळवणे हे आपत्तीजनक आहे.

आजही ह्या शब्दामुळे कुठेतरी स्त्रिया सामाजिक स्तरावर मागे पडतात.

 

bra-history-inmarathi
swaddle-wkwcb6s.stackpathdns.com

‘ब्रा’कडे नेहेमीच एक सेक्शुअल वस्तू म्हणूनच बघितल्या गेलं आहे. ह्याला आणखी एक कारण म्हणजे आपले चित्रपट. चित्रपटात कधीही जर कुठला सेन्शुअल सीन दाखवायचा असला तर तेव्हा हिरोईनला ब्रामध्ये दाखवल्या जाते. ज्यामुळे आजही जर कुठल्या मुलीच्या ब्राचा बेल्ट जरी दिसला तरी ते वाईट समजल्या जातं. आणि ती देखील अवघडल्या सारखी राहते.

 

bra-history-inmarathi01
newsdeclare.com

काही दिवसाआधी दिल्लीच्या एका प्रसिद्ध शाळेने एक विचित्र फर्मान जारी केला होता. ज्यानुसार त्या शाळेतील नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना स्कीन रंगाची ब्रा आणि सिमीज घालण्याची सक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांची ब्रा दिसणार नाही ह्याची ताकीदही त्यांना देण्यात आली होती.

 

bra-history-inmarathi05
vintagedancer.com

मग आता ही एवढे प्रॉब्लेम्स निर्माण करणारी ही “ब्रा” नेमकी आली कुठून, कुणी शोध लावला हिचा, स्त्रिया कधीपासून तिला वापरू लागल्या?

ह्या घटनेनंतर ह्यावर अनेक चर्चा झाल्या. नुकत्याच छापून आलेल्या एका लेखात ह्यासंबंधी काही महत्वाची माहिती समोर आणण्यात आली आहे. ब्रा घालण्याच सुरवात कधीपासून झाली ह्याबद्दल अजूनही स्पष्ट काही माहिती नाही.

पण ब्राचा शोध हा १८६९ साली फ्रान्समध्ये लागला होता. जिथे हर्मिनी केडोल नावाच्या एका महिलेने एका जॅकेट सारख्या पोषाखाचे दोन तुकडे करून त्यापासून अंतर्वस्त्र तयार केले होते. ह्यानंतर ह्याच्या वरील भागाला ब्रा प्रमाणे घातल्या गेलं आणि विकल्या गेलं.

 

bra-history-inmarathi02
3.bp.blogspot.com

आधुनिक ब्राची सुरवात देखील फ्रान्स येथूनच झाली. लंडनच्या विज्ञान संग्रहालयात जी पुशअप ब्रा ठेवण्यात आली आहे ती १९ व्या शतकातील असल्याचं सांगितल्या जातं.

 

bra-history-inmarathi03
kengarex.com

अमेरिकेसोबतच इतर देशांमध्ये देखील ब्रा घालण्याची सुरवात ही १९०७ सालापासून झाली, जेव्हा एका फॅशन पत्रिका वोग मध्ये सर्वातआधी ब्रा घातलेल्या एका तरुणीला दाखविण्यात आले होते.

त्यानंतर १९६० दरम्यान महिलांनी ह्या ब्रा विरोधात आंदोलन करीत सांगितले की ब्रा महिलांना एका सेक्स ऑब्जेक्ट प्रमाणे प्रस्तुत करते. ह्या दरम्यान ब्रा घातल्याचे अनेक साईड इफेक्ट्स मुळे अनेक सामाजिक संस्थांनी महिलांना जागृत करण्याच काम देखील केलं.

 

bra-history-inmarathi04
chatelaine.com

ब्रा ही केवळ एक अंतर्वस्त्र आहे, आणि त्याकडे त्याप्रमाणेच बघायला हवं, कुठल्या सेक्स ऑब्जेक्ट प्रमाणे नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?