प्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

जगभरात असंख्य आदिवासी जाती -जमाती आहेत आणि परंपरेनुसार त्यांच्या काही अनोख्या प्रथा देखील आहेत. एकीकडे जग आधुनिक होत असताना या आदिवासी जमाती मात्र आपल्या परंपरांनाच कवटाळून बसल्या आहेत. आदिवासी लोक फारच भोळे भाबडे आणि देव भोळे! त्यामुळे त्यांच्या प्रथा देखील परमेश्वराभोवतीच गुंतलेल्या असतात. अनिष्ट रूढी, परंपरा पाळणे हा त्यांच्या मते परमेश्वराची भक्ती करण्याचा एकमेव मार्ग होय. याच भावनेतून अनेक आदिवासी जमातींमध्ये अंगावर काटा आणणाऱ्या प्रथा आज देखील अविरत सुरु आहेत. अशीच एक प्रथा इंडोनेशिया मधील एका आदिवासी जमाती मध्ये फार काळापासून पाळली जात आहे.

कुटुंबातील कोणा जवळच्या पुरुष व्यक्तीचा मृत्य झाल्यास या जमातीतील स्त्रीला आपल्या हाताची बोटे अर्पण करावी लागतात. या बलिदानातून ती स्त्री त्या व्यक्तीच्या मृत्यचे दुःख कधीच विसरत नाही असा या जमातीचा समज आहे. यातून त्या स्त्रीचे त्या व्यक्तीवर असलेले प्रेम देखील सिद्ध होते असे या जमातीचे म्हणणे!

dani-tribe-indonesia-marathiizza01

स्रोत

इंडोनेशिया मधील या जमातीचे नाव आहे दानी (Dani). ही जमाती प्रामुख्याने इंडोनेशियामधील New Guinea राज्याच्या पश्चिम भागात आढळते. या जमातीमधील स्त्रियांना जवळचा कोणी पुरुष नातलग मेल्यावर आपल्या हाताच्या बोटाचा पुढील भाग कापून त्याच्या नावाने अर्पण करावा लागतो. सध्या इंडोनेशियन सरकार ही प्रथा पूर्णपणे बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. आजही येथील म्हाताऱ्या स्त्रियांची हाताची बोटे कापलेली आढळून येतात. पण एखाद्या स्त्रीचा  मृत्यू झाल्यावर हाच प्रकार पुरुषांना मात्र लागू होत नाही.

dani-tribe-indonesia-marathiizza02

स्रोत

अमेरिकन समाजसेवी Richard Archbold यांनी १९३८ मध्ये आपल्या शोध मोहिमेच्या दरम्यान या जमातीचा शोध लावला.

dani-tribe-indonesia-marathiizza03

स्रोत

दानी जमातीचे लोक मुळातच लढाऊ ! शिकार करून स्वतः:चे आणि कबिल्यातील इतरांचे पोट भरणे हे एकमेव त्यांचे उद्दिष्ट ! दानी जमातीचे योद्धे नाकामध्ये जाडजुड रिंग्ज घालतात .

dani-tribe-indonesia-marathiizza04

स्रोत

या जमातीच्या लोकांबद्दल आपल्या आधुनिक जगात फारच आकर्षण आहे कारण त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली इतर आदिवासी जमातींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. दानी जमातीमधील पुरुष आपल्या लिंगाचे रक्षण करण्या साठी Koteka नावाची संरक्षक गोष्ट घालतात. सध्या फारच कमी आदिवासी जमातींमध्ये Koteka घातला जातो . त्यामुळे खास हा पुरातन Koteka नावाचा प्रकार पाहण्या साठी पर्यटक या जमाती ला भेट देतात.

dani-tribe-indonesia-marathiizza05

स्रोत

अश्या या आदिवासींची जमाती  आणि त्यांच्या प्रथा  !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?