जेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ एक महिना लोटला होता. इंदिरा गांधीचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या हयातीत पूर्व भारतातील कळीचा प्रश्न काही सोडवता आला नव्हता. हा प्रश्न वडिलांनंतर मुलीच्या हाती आला. इंदिरा गांधीना यावेळी पूर्व भारताबद्दल काय तो ठोस निर्णय घेणे भाग होते. हा प्रश्न होता पूर्व भारतामध्ये उठलेल्या बंडखोरीच्या वादळाचा…!

पूर्व भारताचा प्रदेश तसा अतिशय दुर्गम ! विविध आदिवासी जाती जमातींची ही भूमी ! भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्व भारतामध्ये स्वत:च्या वेगळ्या प्रदेशासाठी अनेक जमातींनी बंडाचं शस्त्र उगारल. त्यापैकी एक प्रदेश होता मिझोरम ! ऐझॉल या राज्याची राजधानी आहे. १९७२ पर्यंत हा प्रदेश आसामचाचं एक भाग होता. १९६१ मध्ये मिझोरमच्या मूळ मिझो समाजाने त्यांच्या वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी मिझो नॅशनल फ्रंट स्थापन केला. प्रथम शांततेने मागण्या करणाऱ्या या संघटनेने हळूहळू शस्त्रांचा मार्ग स्वीकारला आणि २८ फेब्रुवारी १९६६ मध्ये मिझो नॅशनल आर्मी या संघटनेच्या नावाने त्यांनी भारत सरकारविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं.

या बंडखोरीचे लोण काहीच अवधीत संपूर्ण पूर्व भारतात वेगाने पसरत गेलं.

mizo-national-front-vs-indian-government-marathipizza01

स्रोत

२ मार्च रोजी मिझो नॅशनल आर्मीने ऐझॉल शहराच्या दिशेने कूच केली. त्यांनी ऐझॉल शहरावर ताबा मिळवला. भारतीय सैन्याने मिझो नॅशनल आर्मी विरोधात कडवी झुंज दिली. पण त्यांचा बिमोड करण्यात ते अयशस्वी ठरले आणि मिझो नॅशनल आर्मीने भारतीय सैन्याला मिझोरम मधून हद्दपार केले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मिझोरम हे राज्य त्यांच्या ताब्यात असून ते भारतापासून स्वतंत्र आहे अशी घोषणा केली. बंडखोरीच्या या घटनेमुळे संतापलेल्या इंदिरा गांधी यांनी सैन्याला कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला.

५ मार्च १९६६ रोजी इंदिरा गांधी यांच्या परवानगीने भारतीय हवाईदलाने ऐझॉल शहरावर आकाशातून मशीनगनने हल्ला करण्यास सुरुवात केली. परंतु मिझो नॅशनल आर्मी हटत नसल्याचे पाहून इंदिरा गांधी यांच्याशी सल्लामसलत करून भारतीय हवाईदलाने अतिशय कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी हवाईदलाने ऐझॉल शहरावर आकाशातून बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. रिपब्लिक वेंगम हमइचचे वेंग, दावरपुई वेंग आणि चिंगा वेंग हे शहरातील सर्वात मोठे प्रदेश अक्षरश: बेचिराख झाले. स्थानिक घरातून पळून डोंगरात लपून राहिले. मिझो नॅशनल आर्मीचे सदस्य या अनपेक्षित हल्ल्यामुले भूमिगत झाले. अनेकांनी प्रथम ब्रह्मदेश आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तानामध्ये जाऊन आश्रय घेतला. सुमारे आठवडाभर भारतीय हवाईदलाने बॉम्ब हल्ल्याची कारवाई अविरत सुरु ठेवली.


mizo-national-front-vs-indian-government-marathipizza02

स्रोत

भारतीय इतिहासामध्ये ही गोष्ट प्रथमच घडली की भारतीय हवाई दलाने आपल्याच देशामध्ये आपल्या बांधवांवर बॉम्ब हल्ले करण्याची कारवाई केली.

या रक्तरंजित कारवाईचा परिणाम असा झाला की भारत सरकारला त्यांचे मिझोरम राज्य तर परत मिळाले, परंतु तेथील नागरिकांच्या मनात मात्र भारत सरकारविरोधात द्वेषाची भावना निर्माण झाली आणि मिझो नॅशनल आर्मीने केलेल्या बंडखोरीला अजूनच चालना मिळाली. पुढे सुमारे २० वर्ष हे बंड असेच सुरु राहिले. मिझोरमवर झालेला हा हवाई हल्ला आम्ही केलाच नाही असं भारतीय लष्कर १९८० सालापर्यंत सांगत राहिलं, पण अखेर हे सत्य संपूर्ण देशाला कळालं.

इंदिरा सरकार आपल्याच जनतेवर केलेल्या या अमानुष कारवाईवर थांबले नाही, तर त्यांनी १९६७ साली मिझोरममध्ये भारतीय लष्कराकरवी अजून एका भयंकर कारवाईची अंमलबजावणी केली. आसामच्या सिलाचरमधून दक्षिणेकडे जाणारा एकच रस्ता होता. या रस्त्याच्या भोवताली घनदाट जंगले आणि डोंगररांगा होत्या आणि त्यात वसली होती अनके छोटी छोटी गावे ! सरकारने ही सर्व गावे एकाच ठिकाणी आणण्याचा चंग बांधला. त्यानुसार त्यांनी या सर्व गावकऱ्यांना आपली गावे सोडून सरकारने उभारलेल्या नवीन गावांमध्ये (Protected and Progressive Villages-PPVs) राहण्याचा हुकुम सोडला.

ज्यांनी सरकारच्या या हुकुमाचे पालन केले ते सहीसलामत राहिले. ज्यांनी हा आदेश धुडकावला त्यांना लष्कराने मारून मुटकून राजी केले. सरकारने उभारलेली ही नवीन गावे म्हणजे तेथील स्थानिकांचे स्वातंत्र्य बंदिस्त करणारी जणू कोठडी होती. भारतीय लष्कराने गावकऱ्यांच्या मस्तकावर बंदूक ठेवून त्यांच्याकडून संमती पत्रावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या.

mizo-national-front-vs-indian-government-marathipizza03

स्रोत

सरकारने गावकऱ्यांच्या भल्यासाठी ही गावे उभारली असे जाहीर केले होते, परंतु मुळातचं तसे काहीही नव्हते. या गावकऱ्यांनी बंडखोरांना कोणतेही सहाय्य करू नये, तसेच पुन्हा या प्रदेशांमध्ये नवीन बंड उठवले जाऊ नये म्हणून सरकारने उभारलेली ही नजरकैद होती. भारतीय लष्कराने या गावकऱ्यांची मूळ गावे देखील नष्ट केली. त्यांच्या जमिनी, शेती, पिकांचा संपूर्ण नायनाट करण्यात आला. जेणेकरून भूमिगत असलेले मिझो नॅशनल आर्मीचे बंडखोर अन्नपाण्याविना तडफडून मरावेत.


या नवीन गावांमध्ये आल्यापासून गावकऱ्यांचे जीवन अधिकच हलाखीचे बनले. प्रत्येक गावकऱ्याला लष्करातर्फे दिलेला एक नंबर आणि शिक्का लावूनच फिरावे लागे. कोठेही बाहेर जाण्यापूर्वी किंवा बाहेरून आत येण्यापूर्वी त्यांची कसून चौकशी केली जात असे. पोटापुरते शिजवण्यासाठीचं अन्न मिळे. खाण्यासाठी मारामार, पैश्याचा अभाव यामुळे हळूहळू गावकऱ्यांमधील एकजूट संपुष्टात येऊ लागली. चोरी, लुटमार, व्यसनाधीनतेचे प्रमाण भयंकर वाढले. एकंदरच काय सरकारने उभारलेली ही नवीन गावे मिझोरमच्या नागरिकांसाठी मात्र एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती.

mizo-national-front-vs-indian-government-marathipizza04

स्रोत

गावकऱ्यांना नजरकैदेत ठेवून आपल्या विरोधातील संघटनांना संपुष्टात आणण्याची ही संकल्पना इंदिरा गांधी सरकारने ब्रिटिशांपासून घेतली होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी मलाय आणि केनियामध्ये अश्याचप्रकारच्या अमानुष पद्धतीचा अवलंब केला होता. परंतु ब्रिटीश हे त्यांच्या स्वकीयांवर अत्याचार करत नव्हते. येथे इंदिरा सरकारने ती सीमा देखील ओलांडली.

मिझोरममधील ७६४ गावांपैकी ५१६ गावांना केवळ ११० नवीन गावांमध्ये( Protected and Progressive Villages-PPVs) अक्षरश: घुसवण्यात आले. ऐझॉल शहराची जवळपास ९५% लोकसंख्या या सरकारी गावांमध्ये भरती करण्यात आली. १९७१ मध्ये सरकारने ही गावे हटवण्याचा हुकुम दिला. परंतु काही गावे मात्र अजून ८ वर्षे तशीच सुरु होती.  मिझ्रो नॅशनल आर्मीचं बंड अखेर १९८६ मध्ये संपुष्टात आलं आणि सोबतच मिझोरमच्या नागरिकांना त्याचं पूर्वीच स्वातंत्र्य परत मिळालं.

परंतु भारत सरकारबद्दलचा तो द्वेष आणि त्या कटू आठवणी मात्र आजही तेथील नागरिकांच्या मनात घर करून आहेत.

mizo-national-front-vs-indian-government-marathipizza05

स्रोत

वाईट एकाच गोष्टीचं आहे की तत्कालीन सरकारने या अमानुष कारवायांबद्दल तेथील जनतेची कधीच माफी मागितली नाही !


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
One thought on “जेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला!

  • June 19, 2017 at 7:36 pm
    Permalink

    ब्लॉग चा स्रोत शेवटी द्यावा (पुस्तकाचे नाव)

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?