अपंग असूनही त्याने कसे पूर्ण केले ‘डीजे’ होण्याचे स्वप्न – जाणून घ्या एक थक्क करणारी कहाणी!

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोणत्याही माणसाबरोबर एखादा अपघात झाला, तर त्याला त्या अपघातामधून शारीरिक आणि मानसिकरित्या बाहेर पडणे खूपच कठीण होते. आपल्याला अशी कितीतरी लोक आपल्या सभोवताली दिसतात, ज्यांच्याबरोबर एखादा मोठा अपघात झाला आणि त्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. पण काही त्या प्रसंगामधून बाहेर पडण्यासाठी खूप मेहनत घेण्यासाठी तयार असतात. जर आपण मनाने सशक्त असू, तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. याप्रमाणेच काहीसे भारतातील ह्या तरुणाने करून दाखवले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या होतकरू आणि झालेल्या प्रसंगाने न खचता नव्याने उभ्या राहणाऱ्या या तरुणाबद्दल..

Dj Varun Khullar.Inmarathi
hindustantimes.com

भारतातील पहिला आणि जगातील दुसरा अपंग डीजे २६ वर्षाचा वरुण खुल्लर हा डीजे आमिशच्या नावाने प्रसिद्ध आहे. वरूण त्या लोकांसाठी एक प्रेरणा आहे, ज्यांचे आयुष्य या अपंगत्वामुळे थांबले आहे. दिल्लीच्या इंजिनियर कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या म्युझिक प्रोड्युसर आणि डिस्क जॉकी वरुणने समाजाच्या बंधनांना न जुमानता आपल्या म्युझिक जगताला आपले सर्वस्व मानले आहे. वरूण हा जन्मापासूनच अपंग नव्हता, काही वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातामध्ये त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.

द बेटर इंडियाशी बोलताना वरूणने सांगितले की,

कुटुंबियांचा दबाव असूनही मी लहानपणापासूनच डीजे बनू इच्छित होतो. माझे कुटुंबीय सुरुवातीला माझ्या स्वप्नांना समजले नाही, पण मी त्यांना कोणताही दोष लावू इच्छित नाही. त्यांची इच्छा होती की, मी माझे शिक्षण पूर्ण करावे.

वरुणचे म्हणणे आहे की,

आपल्या समाजातील लोक नवीन प्रयोग करण्यास खूप घाबरतात आणि त्यामुळे ते कधीही कोणताही धोका पत्करत नाहीत.

पण वरुणने समाज्याच्या या नियमांची तमा न बाळगता, पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा विश्वास आहे की, माणसाने मनातून काही करण्याची इच्छा निर्माण केली, तर तो काहीही साध्य करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये मेहनत करण्याची हिंमत असली पाहिजे.

Dj Varun Khullar.Inmarathi1
thebetterindia.com

वरुणचे म्हणणे आहे की,

मला डीजे आणि म्युझिक प्रोडक्शनचे काम खूप आवडते आणि मला माहित आहे की, मला या कामामध्ये कधीच कंटाळा येणार नाही. हे माझे पॅशन आहे, जे मला आयुष्यभर फॉलो करायचे आहे.

वरुणने दिल्ली विद्यापीठामधून फॉरेन ट्रेड आणि इंटरनॅशनल प्रॅक्टिसमध्ये पदवी मिळवली आहे आणि आता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत आहे. याव्यतिरिक्त त्याने एमिटी विद्यापीठामधून मास कम्युनिकेशन आणि पत्रकारीतामध्ये मास्टर देखील केले आहे. २०१४ पर्यंत तो पूर्णपणे चांगले आयुष्य जगत होता. पण त्यानंतर मनालीमध्ये झालेल्या एका अपघातामध्ये त्यांचे पाय निकामी झाले आणि तेव्हापासून तो व्हीलचेअरवर आहे.

वरुणचा अपघात झाल्यानंतर तीन वर्ष वरुणला बेडवरचं राहावे लागले. त्यावेळी तो काहीही करू शकत नव्हता. पण त्याच्यामध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. दीड वर्षानंतर त्याने म्युझिकच्या लहान – लहान गोष्टी शिकायला सुरुवात केली. तो या काळामध्ये युट्युबवर व्हिडियो पाहत असे, त्याचबरोबर म्युझिक आर्टिस्टबद्दल वाचत असे. त्याने आपल्या म्युझिकवर खूप मनपूर्वक काम केले आहे, जे लवकरच लाँच होणार आहे. त्यांनी लंडनच्या पॉइंट ब्लॅक म्युझिक स्कूलमधून म्युझिकविषयी ऑनलाईन अभ्यास केला. त्यानंतर त्याने गुरगावची आयएलएम अकॅडमी जॉइन केली.

Dj Varun Khullar.Inmarathi2
mensxp.com

वरुणला हे सर्व साध्य करणे खूप कठीण होते, कारण त्याला कितीतरी वेळा रीजेक्शनला सामोरे जावे लागले. समोर येणाऱ्या संकटांना तोंड देत आणि मनातील संपूर्ण आत्मविश्वास एकवटून त्याने पुढे पाऊल टाकले. त्याचा अपघात झाल्यानंतर वरुण आयसीयूमध्ये भर्ती होता. जेव्हा तो आयसीयूमधून बाहेर आला, तेव्हा त्याला डॉक्टरांनी सांगितले कि, वरुण आपल्या पायावर कधीही उभा राहू शकत नाही. त्यातच त्याच्या वडिलांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यावेळी त्याच्या आईला खूपच चिंता वाटू लागली, पण त्याने आपल्या आईला मोठ्या विश्वासाने सांगितले कि, तो सर्व काही सांभाळून घेईल. त्याच्या मते, लोकांनी त्याला कधीही कमकुवत मानु नये, याची तो पूर्ण काळजी घेतो.

अश्या या धाडसी तरूणाकडे पाहून सर्वांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्याला आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारी योग्य ती मेहनत करण्याची तयारी दर्शवली पाहिजे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?