भीतीने थरकाप उडवणाऱ्या, भारतातील “आठ” सर्वात भयंकर सिरीयल किलर्सबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

माणसाची हत्या करणे हे एक महापातक आहे. परंतु जगात असेही लोक असतात ज्यांच्या डोक्यावर वेडेपणाचं भूत असतं.

ह्या लोकांचा वेडेपणा त्यांच्या डोक्यावर इतका चढलेला असतो की त्यांना ते काय करताय याचं भान नसतं. ते मानसिक दृष्ट्या अस्थिर व अशांत असतात आणि ह्यातूनच अनेक मोठ्या खुना सारख्या गुन्ह्यांना करण्याचं धाडस करतात.

मुळात हे बहुतांश वेळा ते एक थ्रिल म्हणून करत असतात.

 

murder-inmarathi

 

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटन मध्ये जॅक दि रिपर ह्या अश्याच प्रकारच्या माणसाने खूप साऱ्या स्त्रियांचा निर्घृण खून केला होता आणि शेवटपर्यंत तो हाती लागला नाही. त्याच्या भीतीने स्त्रियांनी घराच्या बाहेर निघणं बंद केलं होतं.

अशाप्रकारचे अनेक माथेफिरू सिरीयल किलर भारतात देखील होऊन गेले आहेत.

आज त्यांच्यापैकी बरेभारतातील ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्स च जण हे पोलिसांच्या तावडीत आहेत अथवा मृत्यू पावले आहेत. पण त्यांच्या गुन्ह्यांचा कथा आज ही जिवंत आहेत.

आज आपण बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्यांनी केलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्यांबद्दल पण जाणून घेणार आहोत.

१. रमण राघव

रमण राघव जो सिंधी दलवाई म्हणून देखील ओळखला जातो. ह्याने मुंबईच्या एका भागात खूप सारे मर्डर १९६० च्या दशकात केले होते.

ह्याचे बहुतांश लक्ष्य हे रस्त्याच्या कडेला राहणारे आणि झोपडीत राहणारे लोक होते. एका विशिष्ट तीक्ष्ण हत्याराने त्याने ह्या लोकांचे खून केले होते.

त्याच्या अटकेनंतर त्याने कुठलाही गुन्हा केला नसल्याचे म्हटले. पण नंतर काही कालावधी नंतर त्याने ४१ मर्डर केल्याची कबुली दिली होती.

 

Raman-Raghav-inmarathi1
businessofcinema.com

त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. परंतु मानसशास्त्रज्ञांच्या एका टीमने त्याची चाचणी केल्यावर तो स्किन्झोफ्रेनिया ह्या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे आढळले.

त्यामुळे त्याच्या शिक्षेत बदल करत ती जन्मठेपेची करण्यात आली. १९९५ साली ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

२. निथारीचे हत्यारे

नोएडाचा सुरींदर कोली आणि मोइंदर सिंघ पंधेर ह्या बिझनेसमन आणि त्याच्या साथीदाराला २००६ साली अटक करण्यात आली.

निथारी ह्या गावी अपहरण झालेल्या लहान मुलांचा मृतदेह कवट्यांच्या गुन्ह्यात होता आणि त्या गुन्हेगारांना तेथेच अटक करण्यात आले.

ही केस त्यावेळी प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनली होती.

ह्या ठिकाणी बलात्कार, मानवी मांस भक्षण, पेडोफिलिया, सोडोमी आणि मानवी तस्करी सारखे भीषण प्रकार घडले होते.

 

nitharikand-inmarathi1
thehindu.com

आज सुरींदर कोली हा ५ हत्यांसाठी गुन्हेगार म्हणून दोषी आढळला आहे आणि त्याला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे.

सोबतच ११ मुलांचा मर्डर करणारा पांधेर शिक्षेच्या प्रतिक्षेत आहे. कारण त्याचविरुद्ध अजून पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस यंत्रणा करते आहे .

३. ऑटो शंकर

१९८८ साली, सहा महिन्यांच्या कालावधीत चेन्नईच्या थिरुवमीयुर सेक्शन मधील ९ मुली अचानक बेपत्ता झाल्या.

तपासकर्त्यांना वाटलं की मुलींना वेश्या व्यवसायात त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ढकललं आहे. कारण त्यांना मुलाला हुंडा देणे शक्य नव्हते जी भारतातील लग्नासाठीची अत्यावश्यक परंपरा आहे.

परंतु त्यांच्या परिवाराकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या नकारामुळे, पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने हाती घेतलं.

त्याच वर्षीच्या डिसेंबर च्या  महिन्यात सुभालक्ष्मी नावाच्या एका शाळकरी मुलीने तक्रार केली की एका ऑटोचालकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा आणि पळवून नेण्याचा प्रयत्न एका लोकल वाईन शॉप समोर केला.

ह्यानंतर पोलिसांनी अंडरकव्हर पद्धतीने गस्त घालायला सुरुवात केली. त्यांनी वाईन शॉपमध्ये काम करायला सूरुवात केली.

त्यानंतर त्यांना ह्या सर्व गुन्ह्यांमागे शंकर नावाचा व्यक्ती असल्याचा सुगावा लागला. त्याला पकडण्यात आले.

 

Auto-Shankar-inmarathi1
naukrinama.com

शंकर मुलींना पळवून नेत असे, त्यांचा खून करून, अंत्यसंस्कार करून बंगालच्या उपसागरात त्यांच्या अस्थी विसर्जित करत असे.

त्याच्या अटकेनंतर त्याला ऑटो शंकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

४. चार्ल्स शोभराज

सैगोन, व्हिएतनाम मध्ये याचा जन्म झाला होता. त्याला द सर्पनट म्हणून जगभर ओळखलं जातं.

तो बोलायला खूप मृदू भाषी तसेच स्वभावाने मैत्रीपूर्ण असल्याने त्याला सहजरित्या १२-२४ पाश्चात्य पर्यटकांना जाळ्यात ओढण्यात यश आलं आणि त्यांचा नंतर याने खून केला.

त्याचा पहिला शिकार होता विताली हकीम. ज्याचा मृतदेह अर्धा जळलेल्या अवस्थेत पट्टयाच्या त्याच्या रिसॉर्टच्या शेजारी सापडला जिथे तो रहायला होता.

त्या नंतर शोभराजने त्याच्या डच विद्यार्थिनीला आणि होणाऱ्या वधूला कॉर्नलीया हेमकरला त्याने थायलंडला बोलावले ज्यांची त्याच्याशी भेट हॉंगकॉंगला झाली होती.

इतर अनेकांप्रमाणे त्यांचा देखील विष देऊन शोभराजने खून केला होता.

 

charles-sobhraj1-inmararhi
gqindia.com

विताली हकीमची गर्लफ्रेंड कार मान्ये काराऊने आपल्या बॉयफ्रेंडच्या तपासासाठी शहरात पाऊल ठेवलं. आपला गुन्हा पकडला जाईल ह्या भीतीने त्याने अजय चौधरी ह्या त्याच्या साथीदारासोबत एका डच जोडप्याची हत्या केली.

काराऊचं प्रेत संदिग्ध अवस्थेत नदीत सापडलं तर इतरांचं अर्ध जळलेल्या अवस्थेत सापडलं. त्यानंतर टेरेसा विल्टन ह्या स्त्रीचा त्याने खून केला होता व अशा अनेक खुनाच्या मालिकेला चालवलं होतं.

त्यानंतर त्याने बिकिनी किलर ही बिरुदावली मिळवली होती.

५. ठग बेहरम

हा व्यक्ती सिरीयल किलर्सच्या विश्वातील सर्वात भयंकर व्यक्ती होता.

१७९० ते १८४० हा काळ त्याने गाजवला होता. त्याला “ठगांचा राजा” देखील म्हटलं जातं होतं. त्याने १०-१५ नव्हे तर तब्बल ९३१ खून केले होते!!

१८ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि १९ व्या शतकाचा पूर्वार्ध ह्याने गाजवला होता.

ह्याची हत्या करण्याची पद्धत वेगळी होती. कमरबंदच्या साहाय्याने तो लोकांचा गळा आवळून खून करायचा आणि नंतर त्यांचा ऐवज घेऊन लंपास व्हायचा.

 

thugbehram-inmarathi1
boldsky.com

१८४० मध्ये बेहरमला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

६. सायनाईड मलिका

ही भारतातील पहिली महिला सिरीयल किलर आहे.

सायनाईड मलिका उर्फ के डी केम्पम्मा ही मंदिरात आलेल्या स्त्रियांना तिचं लक्ष करायची. ती एका पवित्र आध्यात्मिक स्त्रिच्या भूमिकेत ती मंदिर परिसरात वावरायची, ज्यामुळे तिला इतर श्रद्धाळू स्त्रियांशी मैत्री करणं सोपं जायचं.

एकदा का तिने महिलेचा विश्वास जिंकला की ती त्या महिलेला लांबच्या एका मंदिरावर बोलवायची. ती त्या महिलेलाअसलेल्या दाग दागिन्यांना  मागणी करायची.

त्यांना देवाच्या चरणी अर्पण करायला सांगायची. नंतर पवित्र जल म्हणून त्या महिलांना सायनाईड पाजून त्यांचा खून करायची व दागिने चोरून विकायची.

 

cyanide-mallika-inmarathi1
indiatoday.in

तिने ६ महिलांची हत्या केली होती. तिला २०१० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सूनवण्यात आली. परंतु २०१२ ला शिक्षा बदलून जन्मठेप करण्यात आली.

७. स्टोनमन किलर्स

ही अत्यंत किचकट व रंजक केस आहे जी दोन वेगवेगळ्या शहरात घडली. १९८५ साली मुंबईच्या सायन आणि किंग्ज सर्कल भागात सलग १२ लोकांच्या हत्या झाल्या.

ह्या खुन्याची पद्धत सोपी होती. रस्त्याच्या कडेला एकट्यात झोपलेल्या व्यक्तीला हेरून खुनी त्याचा खून डोक्यात मोठा दगड घालून करायचा.

त्या रस्त्याच्या कडेवर झोपणाऱ्या लोकांचे कोणी नातेवाईक नसल्याने त्या खुन्याची ओळख पटली नाही. १९८८ च्या मध्यापर्यंत हे खुनाचे सत्र आपोआप थांबले.

ह्या केसचा नंतर कधी उलगडा झाला नाही.

१९८९ साली कोलकाता शहरात देखील अगदी ह्याच पद्धतीने व प्लॅन करून डोक्यात दगड घालून लोकांचे खून करण्यात आले.

१२ लोकांच्या सहा महिन्यात झालेल्या सलग हत्यांनी व त्यांच्यातील समान धाग्याने लोक भयभीत झाले होते. ह्या दोन्ही गुन्ह्यांचा काही संबंध होता का ह्याचा आजवर पत्ता लागलेला नाही.

पण दोन्ही गुन्ह्यात पद्धत आणि खून होणाऱ्यांची संख्या एकच होती ज्यामुळे ते एका व्यक्तीने केले असल्याचा संशय बळावतो.

 

stonemankillar-inmarathi1
cracked.com

८. बियर मॅन

हे नाव एका जेरबंद करण्यात आलेल्या माथेफिरू खुन्याला देण्यात आलं होतं. ज्याने ऑक्टोबर २००६ आणि जानेवारी २००७ ह्या काळात ह्या खुन्याने मुंबईत धुमाकूळ घातला होता.

त्याची ओळख होती की तो ज्या व्यक्तीची हत्या करायचा त्या व्यक्तीच्या बाजूला बियर बॉटल सोडून जायचा.

जानेवारी २००८, रवींद्र कणतोळे नामक व्यक्तीला ह्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण फॉरेन्सिक पुराव्यात तो निर्दोष सिद्ध झाल्याने त्याची सुटका करण्यात आली. ह्या केसचं गूढ आज देखील कायम आहे.

अश्याप्रकारे अत्यंत भयंकर पद्धतीने व थंड डोक्याने खून करणाऱ्या ह्या भारतातील सिरीयल किलर्स बद्दल आपण जाणून घेतलं.

त्यांच्या पद्धती वेगळ्या आणि भयंकर होत्या ज्यांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?