भारतात खरे “चांगले दिवस” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आयएएस अधिकारी बनण्याचे खूप लोकांचे स्वप्न असते. त्यांचे ते राहणीमान, वजनदार व्यक्तिमत्त्व आणि त्यांना मिळणारी प्रतिष्ठा आपण खऱ्या आयुष्यामध्ये आणि चित्रपटामध्ये पाहिलेले असते. पण चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे कुणीही कधी झटपट आयएएस अधिकारी बनत नसतो, आयएएस अधिकारी बनण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, तसेच तेवढे आपण हुशार देखील असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे खूपच कमी लोक यामध्ये यशस्वी होतात. आपण जेवढे समजतो, तेवढे सोपे हे नक्कीच नसते. या पदाबरोबरच या अधिकाऱ्यांवर खूप जबाबदाऱ्या देखील येतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही आयएएस अधिकाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या असूनही समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत आणि त्यांच्या या बदलामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया, २०१७ च्या त्या अधिकाऱ्यांविषयी जे आपल्या लोकप्रियतेसाठी आणि ईमानदारीसाठी ओळखले गेले.

१. परिकिपंदला नरहरि


 

IAS Officers.Inmarathi
iimidr.ac.in

मध्यप्रदेश कॅडर २००१ बॅचचे आयएएस अधिकारी पी. नरहरि यांना नुकतेच अपंगांसाठी चांगले कार्य केल्याबद्दल NCPEDP-Mphasis Universal Design Awards २०१७ ने सन्मानित करण्यात आलेले आहे. ग्वालियरमध्ये नरहरिच्या कार्यकाळात शाळेची फी वाढवण्याच्या संबंधित प्रकरण समोर आले होते, पण त्यांच्या प्रयत्नामुळे ९२ शाळेच्या संचालकांनी फी न वाढवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी खूप आव्हानांचा सामना केला. यामध्ये बीआरटीएसचे विस्तारीकरण, मेट्रो प्रोजेक्ट, खान नदीच्या किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवणे यांसारखे मुद्दे होते.

२. रोनाल्ड रोज

 

IAS Officers.Inmarathi1
thebetterindia.com

आयएएस रोनाल्ड रोजने तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यामध्ये विकासाचे काही नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. गावामध्ये जलदगतीने सुरु होणारे शौचालय आणि शेतकऱ्यांचे बदलणारे जैविक मार्ग हे याचे पुरावे आहेत कि, रोनाल्ड रोजची मेहनत सफल होत आहे. रोनाल्डने जिल्ह्यामध्ये काही अद्भुत परिवर्तन केले आहेत, ज्याच्या आधारावर येथील विकास आपण स्पष्टपणे बघू शकतो.

३. पी.एस प्रद्युम्ना

 

IAS Officers.Inmarathi2
twimg.com

पले निद्रा प्रोग्रामच्या अंतर्गत एक लाख टॉयलेट बनवणारे प्रद्युम्न आपल्या वेगळ्या कामासाठी ओळखले जातात. यांची चांगल्या योजना आणि समावेशक पुढाकाराने आंध्रप्रदेश जिल्ह्याचा एक नवीन विकास झाला आहे. एवढेच नाहीतर या आयएएस अधिकाऱ्याने स्त्रियांची सुरक्षा लक्षात ठेवत, शैक्षणिक संस्थाने, बस स्टॉप अशा कितीतरी जागांवर निर्भया पेट्रोलिंग नावाचे लोकप्रिय प्रोग्राम देखील चालवले. तसेच, या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी देखील खूप कामे केली.


४. रोहिणी आर. भाजीभाकरे

 

IAS Officers.Inmarathi3
unanews.in

रोहिणी ही सालेम जिल्ह्याची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच नियुक्त झाली आहे. स्थानिक लोकांसाठी हे कोणत्याही सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हते, कारण सालेममध्ये १७० वर्षामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री जिल्हाधिकारी बनली आहे. जिल्हाधिकारी बनताच रोहिणीने या क्षेत्रामध्ये कितीतरी बदल घडवून आणले. अचानक ती रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करते. व्हाट्सअपच्या माध्यमाने सारखी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहते. शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यापर्यंत सर्व काही ती स्वतः ग्रामीण भागामध्ये जाऊन करते. याचबरोबर त्यांनी ऑफिसच्या आतमध्ये प्लास्टिक आणि पॉलीथिनच्या बॅगवर निर्बंध लावला आहे.

५. पोमा टुडू


 

IAS Officers.Inmarathi4
blogspot.com

ओडीसाच्या नुआपडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. पोमा टुडूच्या प्रयत्नांची जेवढी प्रशंसा केली जावे, तेवढी कमीच आहे. त्या दररोज जवळपास दोन तासांचा प्रवास करून लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जाते. अशाप्रकारचे समर्पण लोक सेवकांसाठी एक आदर्श आहे. दिल्लीच्या लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेजमधून पदवीधर करणारी पोमा २०१२ बॅच ओडीसा कॅडरची आयएएस अधिकारी आहे.
पोमाचे हेतू गावामधील लोकांना मुलभू सुविधा प्रदान करणे हा आहे. खास गोष्ट ही कि, त्यांनी आतापर्यंत कोणालाही आपला रोल मॉडेल बनवले नाही आहे. सांगितले जाते कि, या आदिवासी कुटुंबामधून कॉलेज आणि बँकेमध्ये नोकरी मिळवणारी पहिली स्त्री होती.

६. सुरेंद्र कुमार सोलंकी

 

IAS Officers.Inmarathi5
thebetterindia.com

अकरावे सिव्हील सेवा सर्विसेस दिवसावर आयोजित समारंभात डुंगरपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्रकुमार सोलंकीला पंतप्रधान एक्सिलेंस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार आदिवासी झोनमध्ये स्त्री इंजिनियर्सच्या माध्यमातून सोलर लॅम्प प्रोजेक्टचा नवीन उपक्रम प्रदान करण्यात आले होते.

समाजातील बदलावासाठी काम करणाऱ्या सोलंकी यांनी उदयपुरच्या शेल्टर होममधून छाया पर्गी नावाच्या एका मुलीला दत्तक घेतले होते, जिला तिच्या काकीच्या अत्याचारांमुळे घरातून पळायला भाग पाडले. या अधिकाऱ्याला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी त्या मुलीला दत्तक घेऊन त्या मुलीचे भविष्य सुधरवण्याचे वचन दिले.

७. पारसनाथ नायर

 

IAS Officers.Inmarathi6
thenewsminute.com

पारसनाथ नायर २००७ च्या केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहे, ज्याला सध्याच राज्यमंत्रीच्या सचिवाच्या रुपात नियुक्त करण्यात आले आहे. नायरने कोझिकोडचा जिल्हाधिकारी बनून लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी कितीतरी मुद्द्यांना परत उठवले होते आणि सार्वजनिक रुपात या पैलूंवर कौतुकास्पद काम देखील केले.

नायरने ऑपरेशन सुलेमानी, तेरे मेरे बीच मै आणि यो आपोपा यांसारख्या प्रकल्पांवर काम करून लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यशस्वी बनवून दाखवले. या अधिकाऱ्याच्या काम आणि मेहनतीचा परिणाम असा आहे कि, आज लोक त्याला सन्मानाने ‘कलेक्टर ब्रो’ नावाने ओळखतात.

असे हे आणि इतर काही आयएएस अधिकारी खूप प्रतिभावान आणि मेहनती आहेत. त्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी योग्यप्रकारे नावाजले देखील गेले आहे.

===


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?