आता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण पाण्याविना त्याचे जीवन व्यर्थ आहे. पाण्याचे महत्त्व माहीत असून देखील मनुष्य प्राण्याने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जगभरात ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते आहे. जगात दोन महायुद्ध झालेली आहेत आणि तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होणार असा तर्क देखील कित्येक जाणकारांनी बांधलेला आहे. सध्या पाण्यासाठी चाललेली चढाओढ पाहता त्यांचा तर्क नाकारून चालणार नाही. पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते का? यावर अनेक संशोधन झाले. त्याच संशोधन युगातील सुवर्णमध्य एका भारतीय वंशाच्या तरुणाने निर्माण केला आहे. या तरुणाने समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा जालीम उपाय शोधून काढला आहे.

पोर्टलँडच्या ओरेगॉन शहरात राहणाऱ्या चैतन्य कार्मचेडू या तरुणाने शाळेतील एक विज्ञान प्रयोग करता करता हा शोध लावला आहे.

chaitanya-karmachedu-marathipizza

स्रोत

आजवर अनेक संशोधकांनी या संदर्भात ठोस निष्कर्ष मिळवण्याचे प्रयत्न केले, पण सारेच जण अपयशी ठरले. मात्र चैतन्यच्या उपायाने समुद्राचे खारे पाणी पिण्याच्या पाण्यात रुपांतरीत करण्याची अद्भुत किमया साकार होऊ शकते.

Absorbent Polymer अर्थात शोषून घेणाऱ्या पदार्थावर काम करत असताना चैतन्यची ट्यूब पेटली. त्याच्या लक्षात आले की समुद्राच्या पाण्यात मीठ पूर्णपणे विरघळत नाही. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने पाण्यातून मीठ वेगळे करण्याच्या प्रक्रीयेसाठी रामबाण उपाय शोधून काढला. त्याची पद्धत इतर शास्त्रज्ञांपेक्षा थोडी वेगळी आहे. इतर शास्त्रज्ञ १० टक्के पाण्याला मीठमुक्त करण्यावर काम करत आहेत तर चैतन्य मात्र तब्बल ९० टक्के पाणी मीठमुक्त करण्यावर काम करतो आहे.

आपल्या या संशोधनामुळे जगातील पाण्याची समस्या दूर व्हावी ही एकच भावना चैतन्याच्या मनात आहे आणि या पद्धतीसाठी जास्त खर्च देखील येणार नसल्याने जगभर ही पद्धती राबवली जाऊ शकते असे त्याचे म्हणणे आहे.

chaitanya-karmachedu-marathipizza01

स्रोत

चैतन्यच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्थांनी स्वत:हून पुढे येऊन आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

चैतन्य त्याच्या या सेवाभावी संशोधनामध्ये यशस्वी होवो आणि जगाची पाण्याची समस्या दूर होवो हीच आशा!

चैतन्याची हि पद्धत नेमकी काम कशी करते ते तुम्ही येथे पाहू शकता

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?