' इज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…?! – InMarathi

इज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अभिजीत पानसे

चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.

अठ्ठेचाळीस तासाने, ज्याची सर्व क्रिकेटप्रेमी वाट बघत आहेत तो दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरू होतोय. खुद्द भारतीय संघाने ज्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची तयारी केली काही महिन्यांपूर्वी सुरू केली, त्याचा श्रीगणेशा बहात्तर तासाने ‘कसोटी’ सामन्याद्वारे होतोय.

सगळेजण या दौऱ्याबद्दल आपापले मतमतांतरे नोंदवत आहेत. भारताची बॅटींग आफ्रिकेत कशी होईल, भारताची बॉलिंग ठीक होईल का, की भारतीय टीमच्या बॅटिंगची ‘काशी’ होईल…?! २०१७ मधील भारतीय क्रिकेट टीमचं यश आफ्रिकेतसुद्धा कायम राहील का! प्रत्येक खेळाडूनुसार आखणी केली जात आहे.

पण या सगळ्यात भारतीय संघाची एक अत्यन्त महत्वाची बाजू दुर्लक्षित राहते आहे. ती म्हणजे “विकेट कीपर”! यष्टीरक्षक!

 

wriddhiman-saha-pti-inmarathi

महेंद्रसिंग धोनीने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हापासून भारतीय कसोटी टीममध्ये विकेट किपर रिद्धीमान साहा आहे. त्या दौऱ्यानंतर भारतीय संघ उपखंडाबाहेर मजबूत संघविरुद्ध कसोटी खेळायला, मोठा दौऱ्यासाठी गेला नाही. त्यामुळे विकेट किपर म्हणून रिद्धीमान साहाची अजून खरी ‘कसोटी’ परीक्षा झालीच नाहीये.

विकेट किपरमध्ये जे चातुर्य, यष्टीरक्षणाची कला असावी लागते ती रिद्धीमान साहा मध्ये संपूर्णपणे आहे. परंतु भारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.

 

wriddhiman saha InMarathi

एक काळ होता जेव्हा, नयन मोंगिया, साबा करीम, पार्थिव पटेल हे विकेट किपर भारताने बघितले आहेत. एक प्रकारे सहन केले आहेत. यांमध्ये नयन मोंगिया हा सर्वोत्तम विकेट किपर होता, पण तो स्वतः किंवा यापैकी कोणीही योग्य, सुदृढ, विश्वसनीय ‘फलंदाज’ नव्हते. एकीकडे ऑस्ट्रेलियाकडे ऍडम गिलख्रिस्ट , श्रीलंकेकडे संगकारा , झिम्बाब्वेकडे अँडी फ्लॉवरसारखे जबरदस्त विकेट किपर आणि तितकेच महान फलंदाजही होते. भारताची ही बाजू मात्र लंगडी होती.

परंतु पूढे महेंद्रसिंग धोनी युग सुरू झाले, आणि जबरदस्त प्रभाव टाकणारा विकेट किपर आणि फलंदाज भारताला मिळाला. संघाचा ‘बॅलन्स’ सुरेख जमला!

Mahendra singh dhoni.Inmarathi4

पण आता प्रथमच भारत उपखंडाबाहेर एका मोठ्या आणि अत्यंत महत्वाच्या आणि कठीण दौऱ्यावर जात आहे. हे २०१८ वर्षात भारतीय संघाला भारताबाहेर खेळायचं आहे त्यामुळे “विकेट किपर” ही बाजू परत एकदा भारताची काहीशी कमकुवत झाली आहे.

१०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेण्याच्या आधी अॅडीलेड येथे झालेल्या प्रथम कसोटी सामन्यात धोनी तंदुरुस्त नसल्याने धोनीच्या जागी रिद्धीमान साहा खेळला होता. पण अगदी हाती तोंडी आलेला घास याच राईट चॉईस बेबी साहाने एक वाईट फटका मारण्याच्या नादात बाद होऊन घालवला – आणि कॅप्टन कोहली आणि मुरली विजयची सर्व मेहनत वाया घालवली होती.

त्या सामन्यात विजयने ९९ धावा, तर प्रथमच कप्तानी करत असलेल्या कोहलीने चौथ्या इनिंगमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत मोठं शतक काढलं होतं. पण अगदी थोड्या धावांनी भारत हरला होता. तेव्हाच धोनीचे संघात महत्व आणि साहाची कमकुवत बाजू लक्षात आली होती. त्यानंतर बहुतेक कसोटी सामने भारत, भारतात किंवा उपखंडात खेळला आहे.

या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. आजवर अगदी १९९७ पासून प्रत्येक दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी कटू आठवण ठरली आहे.

एकेकाळी अॅलन डॉनल्ड, शॉन पोलॉक, मॅकमिलनने भारतीय संघाचे तोंडचे पाणी पळवायचे. तेव्हा नयन मोंगिया आणि सबा करीम विकेट किपर होते. त्यानंतर २००७ च्या दौऱ्यावर धोनी आणि पार्थिव पटेल, २०१०, २०१४ मधील दौऱ्यातही खुद्द महेंद्रसिंग धोनी कर्णधार आणि यष्टीरक्षक असूनही भारतीय संघाची हार झाली होती. दक्षिण आफ्रिकेत स्विंग आणि बाऊन्स असतो त्यामुळे भारतीय उपखंडात खेळण्याचा जास्त अनुभव असलेली टीमची तिथे अवस्था बिकट होते.

 

dhoni inmarathi

विकेट किपर हा अत्यंत महत्वाचा खेळाडू असतो. दिवसातील ५४० बॉल्सवरही त्याला सतत लक्ष केंद्रित करायचं असतं. एकही चूक महागात आणि खलनायक बनवणारी ठरू शकते. अश्यावेळी तो फलंदाज म्हणून कमकुवत असेल तर घासाठी ते बहुतेकवेळी वाईट ठरतं.

सद्यस्थिती बघता विराट कोहली रवी अश्विनला विकेट किपर साहाच्या आधी फलंदाजीला पाठवतो. यावरूनच साहाची बॅटींग अजून भक्कम नाही हे कळतं , अर्थात आर अश्विन एक चांगला फलंदाजही आहे हे ही यातून कळतं. त्यामुळे ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात, संपूर्ण दौऱ्यात साहाची कसोटी लागणार हे शंभर टक्के सत्य आहे.

“यही है राईट चॉईस बेबी साहा” हे त्याला दाखवून द्यावं लागणार आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?