ह्या महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र का होत नाही? समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग हा पाण्याने वेढलेला आहे, पृथ्वीवर ७०% पाणी उरलेला भाग हा जमीनीचा आहे. ह्या ७० टक्के भागात समुद्र, बर्फाचे डोंगर, नद्या-नाले इत्यादी सर्व येते.

जगात ५ महासागर आहेत, प्रशान्त महासागर , अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर, हिन्द महासागर, दक्षिण महासागर…या महासागरांना सीमा नाही. यांची सुरवात आणि शेवट माहिती करणे तसे कठीणच, कारण आपण चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहोत.

या समुद्रांत एवढी गुपितं लपलेले आहेत की ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. आजही अनेक वैज्ञानिक ह्या समुद्रातील त्या गुपितांचा शोध घेत आहेत. पण समुद्राच्या पोटात काय काय लपलंय हे अजूनही आपण पूर्णपणे जाणू शकलेलो नाही.

तुम्हाला माहित आहे का की, आतापर्यंत समुद्राच्या केवळ २० टक्के भागावर संशोधन झाले आहे.

यावरूनच यांचं अथांगपण लक्षात येतं. आज आम्ही तुम्हाला याच अथांग महासागराचे आणखी एक गुपित सांगणार आहोत.


 

Indian-ocean-and-pacific-ocean-inmarathi
adn.com

“पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो लगे उस जैसा”… १९७२ साली मनोज कुमार आणि जया बच्चन यांच्या शोर चित्रपटातील हे गाणे… या गाण्यात पाण्याचा जो संदर्भ दिला गेला आहे तो केवळ या अर्थाने की पाणी हे कशातही मिसळते. पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे दोन समुद्र येऊन मिळतात पण त्याचं पाणी एकमेकांत मिसळत नाही!

आपण नेहमी बघतो की जर कुठे दोन नदी/नाले येऊन मिळाले तर ते एकत्र येऊन तिसरा प्रवाह निर्माण करतात, ज्याला आपण तीन नद्यांचा संगम म्हणतो. तसेच आपल्याला हे देखील माहित आहे की, जगातील हे ५ महासागर सात खंडांना जोडतात.

यांपैकी दोन महासागर म्हणजेच हिंद महासागर आणि प्रशांत महासागर हे अलास्काच्या खाडीत येऊन मिळतात.

पण त्यांच्यातील पाणी मात्र एकमेकांत मिसळत नाही. तुम्ही अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून याचा व्हिडीओ देखील बघितला असेल. हे दोन महासागर जरी एकत्र आले तरी त्याचं पाणी हे वेगवेगळचं राहतं.

 

Indian-ocean-and-pacific-ocean-inmarathi03
nehandatv.com

या ठिकाणाचा आणि या दोन वेगवेगळ्या रंगाच्या पाण्याचे हे दृश्य पहिल्यांदा Kent Smith या छायाचित्रकाराने जुलै २०१० ला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे की असे का होत असेल? अलास्काच्या खाडीत या ठिकाणी या दोन महासागरांतील हे वेगळेपण स्पष्ट बघितले जाऊ शकते. दोन सागरांचे पाणी एकमेकांत न मिसळणे हे खरच आश्चर्यकारक आहे.

या दोन्ही महासागरांतील पाण्यावर अनेक वेळा संशोधन देखील करण्यात आले आहे.

ग्लेशियर मधून येणाऱ्या पाण्याचा रंग हा हलका निळा असतो आणि समुद्रातील पाण्याचा रंग गर्द निळा असतो. या दोन रंगाचं पाणी एकमेकांत मिसळत नाही याचे मुख्य कारण म्हणजे या दोघांमध्ये असलेले क्षारांचे प्रमाण. या दोन्ही पाण्यातील क्षार, घनता व तापमान वेगवेगळे आहे.

ग्लेशियर (बर्फ) मधून येणारे पाणी गोड असते. त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते, तर समुद्रातील पाणी हे खारे असते. या पाण्याचे घनत्व वेगवेगळे असल्यामुळे हे दोन्ही पाणी एकमेकात मिसळत नाही.

ज्याठिकाणी हे दोन महासागर येऊन मिळतात तेथे पाण्याच्या फेसाची एक भिंत तयार होते. वेगवेगळ्या घनतेमुळे यांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही. त्यामुळे दे दृश्य पाहताना असे दिसते की हे दोन महासागर एकत्र तर येतात पण एकमेकांत मिसळत नाहीत.

 

Indian-ocean-and-pacific-ocean-inmarathi02
adn.com

सोबतच असे देखील मानले जाते की, या अद्भुत गोष्टीचा संबंध पाण्याच्या वर्च्युअल स्ट्रेटिफिकेशनशी असतो.

याशिवाय असे देखील सांगितले जाते की या दोन महासागारांचा वेगवेगळा रंग असण्याचे एक कारण म्हणजे सूर्याची किरणे देखील असू शकते.

जेव्हा वेगवेगळ्या घनतेच्या पाण्यावर सूर्याची किरणे पडतात तेव्हा पाण्याच रंग बदलतो म्हणून कदाचित या पाण्याचा रंग वेगवेगळा असावा ज्यामुळे असे भासते की हे पाणी एकमेकांत मिसळत नाही.

अनेक लोक याचा संबंध धार्मिक कारणाशी जोडतात, याला देवाचा चमत्कार मानतात. परंतु हे सर्व धादांत खोटे आहे. हे पाणी आपल्या घनत्वामुळे एकमेकात मिसळत नाही. असेही नाही की हे पाणी एकमेकात कधीच मिसळत नाही. काही लोकं मानतात की हे पाणी कुठे ना कुठे जाऊन एकमेकांत नक्की मिसळत असेल.

समुद्र आपल्या पोटात अनेक रहस्य लपवून बसलेला आहे, त्यापैकीच हे एक. पण याचाही शोध नक्कीच लागणार आणि नेमक याचं पाणी कुठे जाऊन मिसळते हेही समोर येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *