मिडियाचे ‘डावे’ प्रेम आणि ‘उजवा’ द्वेष!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागच्या महिन्याच्या वृत्तपत्रांत, वृत्तवाहीन्यांवर आणी सोशल मिडीयांत दिल्लीचे रामजस महाविद्यालय, गुरमेहेर कौर आणी घटनाक्रम, प्राईम टाईम बातम्या, चर्चासत्र ते हेडलाईनमध्ये होते.

माझ्या वडिलांना पाकीस्तानने नाही तर युद्धाने मारलं

असं वक्तव्य करणारी गुरमेहेर कौर रातोरात कित्येकांसाठी blue eyed girl झाली !

gurmehar-kaur-marathipizza
topyaps.com

दिल्लीच्या रामजस महावीद्यालयात भारताचे तुकडे होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या आणी अंतरीम जमानतीवर बाहेर असणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या संभावीत भाषणावरून वाद झाला आणी पुढचा घटनाक्रम दिल्ली ते गल्ली पर्यंत अविरत-अहोरात्र पोहोचवला गेला.

माध्यमांनी निष्पक्ष असावे हे मुल्य २०१४ पर्यंतच लागू होते की काय अशी अवस्था असल्याने, या घटनेत उजव्या विचारधारेशी संलग्न असणाऱ्या अभावीप/ ABVP या विद्यार्थी संघटनेस दोषी ठरवले गेले. त्या संबंधीच्या बातम्या, रिपोर्ट्स, चर्चासत्र, मारहाण/ दगडफेक करतानाची छायाचीत्र, चित्रफीती अतिरंजीत करून प्रकाशीत केल्या गेल्या.

अगदी काश्मीर मांगे आझादी

अशा घोषणा तिथे दिल्याच गेल्या नव्हत्या, असे बिनदीक्कत राष्ट्रीय पातळीवरील वाहीन्यांवर दाखवले गेले.

ramjas-college-maratipizza
hindustantimes.com

माध्यमांच्या अतिप्रचंड माऱ्यापूढे दुसरी बाजूही पहावी याची संधीच हिरावून घेतली जावी, एवढ्या प्रमाणात या बातम्या ब्रॉडकास्ट झाल्या. हि लिंक पहा.

या प्रकरणात ABVP चे witch hunting अगदी व्यवस्थीत केलं गेलं.

ईकडे मुंबईत काही लोक ABVP विरोधाच्या मोहीमेचे ध्वजवाहक वगैरे बनले.

या संबंधित अधिक बातमी या लिंकवर पहा!

student-protest-marathipizza04
mid-day.com

या प्रकरणात अभावीप विरुद्ध स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया SFI आईसा AISA आणी ईतर काही संघटना होत्या. एका रात्रीत रामजस कॉलेज जागतीक पातळीवर (कु)प्रसिद्ध झालं. पोलीसांनी कारवाई केली. प्रकरण सध्या मागे पडलंय.

=============

चालू महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये अगदी या घटनेसारखी आणखी एक घटना झाली. इथेही स्टुडंट युनीयनने महावीद्यालयात तोडफोड केली, नासधूस केली, काचा फोडल्या गेल्या. TV फोडले गेले, गेट तोडली गेली, टेबल-खुर्च्या तोडल्या गेल्या, किंमती वस्तुंची नासधूस केली गेली.

 

student-protest-marathipizza

त्या कॉलेजची करोडोंची वित्तीय हानी झालीये. कायदा-सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न!

दुसरी घटना जिथे झाली ते राज्य दुसरं होतं..! सहाजिक राज्यात राज्यकर्ते वेगळे होते आणी सर्वात महत्त्वाचे २०१४ मधील राजकीय सत्ता बदला नंतरच्या ट्रेंड प्रमाणे, हल्लेखोर, गुन्हेगार कोण आहेत, कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहेत हे पाहून आपापल्या सोयीप्रमाणे वृत्तांकन करणं या अघोषीत नियमाला कदाचीत सुट न-होणारे गुन्हेगार या तोडफोडीस जबाबदार होते.

आपल्यापैकी १% लोकांनीही वेल्लापल्ली नेटसन कॉलेजच नाव ऐकलं असण्याची शक्यता नाही. यात आपली काहीही चुक नाही. दिल्लीच्या रामजस महावीद्यालयाचे नावही यापूर्वी कधी ऐकायला मिळाले नव्हते.

आपल्याला एखादी घटना,माहीती पोहोचवण्याच काम वृत्तपत्र, वृत्तवाहीन्या करतात. त्यामुळे त्यांनी जर काही गोष्टी लपवल्या तर सामान्य लोकांपर्यंत त्या सहज पोहोचत नाहीत

velapalli-netsan-college-marathipizza
deccanchronicle.com

हि व्हिडियो लिंक पहा.

चित्रफीतीत हल्लेखोर ज्या इमारतीवर हल्ला करून, तोडफोड करत आहेत, ती इमारत वेल्लापल्ली नेटसन कॉलेज आहे.

सोबतचे हे काही फोटोज पहा ( काहीच म्हणजे शब्दशः काहीच … कारण गुगलवरही ईतकेच उपलब्ध आहेत )

student-protest-marathipizza01

हे कॉलेज कम्युनीस्टशासीत केरळ राज्यात आहे आणी पोलीसांच्या समोर तोडफोड करणारे कार्यकर्ते SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणी DYFI डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

student-protest-marathipizza

आता तुमच्या-माझ्या सारख्या सामान्य वाचकांना वेल्लापल्ली नेटसन कॉलेजचे नाव, ही घटना का कळु नये ? या मुद्याकडे येऊ.

रामजस कॉलेजमध्ये हल्लेखोर संबोधले गेलेले लोक ABVP चे कार्यकर्ते होते आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला, इतरांना बोलूच दिलं जात नाहीये, हे फासीझम आहे…वगैरे वगैरे आरोप करणारे SFI आणी ईतर डाव्या संघटनांचे कार्यकर्ते होतेआणी दिल्ली पोलीस यंत्रणा केंद्रातील BJP सरकारच्या आधीन.

त्यामुळे ABVP आणी BJP दोन्ही आपल्या विचारधारेच्या विरोधी संघटनांना दोषी ठरवत त्याला सुट होईल अशा प्रकारचं चित्र रंगवलं गेलं, माध्यमांकडून.

abvp-protrst-marathipizza
m.indiatvnews.com

ABVP च पध्दतशीर witch hunting केलं गेलं. मग सामाजिक कार्यकर्त्यांनी, समानतेचे, विवेकवादाचे तथाकथीत पाईक असलेल्यांनी आपापल्या फेसबुकवर, ट्वीटरवर ABVP ला अतिरेकी घोषीत करत त्यांच्यावर बंदीची मागणी केली.

या विपरीत वेल्लापल्ली नेटसन कॉलेज घटनेत परिस्थिती अगदी उलटी होती. म्हणजे हल्लेखोर SFI/DYFI या डाव्या विचारांच्या संघटनांचे सदस्य होते आणी राज्यात कम्युनीस्ट म्हणजेच यांच्याच विचारधारेचे सरकार ! म्हणजे केरळच्या घटनेत कोणत्याही प्रकारे उजव्या विचारधारेवर टिका करता येणार नव्हती.

ABVP किंवा BJP दोषी नसल्याने ईथेच बातमीच मुल्य संपल.

त्यात आपला तो बाब्या…म्हणजे आपल्याच विचारधारेच्या लोकांनी केलेले गुन्हे, तोडफोड कशी दाखवायची??? ते ही राज्यात आपल्याच विचारधारेच सरकार असताना??? अस कुठं असत काय ??? निष्पक्ष पत्रकारीता, मुल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सर्व ईतर घटनांत पाहू… नाही का ??? दोन-तीन स्थानीक आणी एक-दोन इंग्रजी वृत्तपत्र सोडली तर कुठेही या घटनेची बातमी सोडा वाच्यताही झाली नाही.

 

SFI_MARCh-marathipizza
thehindu.com

घटनेचे ५/६ फोटो आणी ४/५ चित्रफीती एवढाच काय तो डेटा आहे माहीती जालावर. बरं चित्रफीत पाहतांना आपल्याला खाकी गणवेशात काही लोक दिसतील. हे इसम स्थानिक पोलीस आहेत. हल्लेखोरांना अटकाव करण्याचा, थांबवण्याचा, रोखण्याचा जिवापाड प्रयत्न करत आहेत हे लोक….आपल्याला नेमकं ते दिसत नाहीये !!! कायद्याचं राज्य, हल्लेखोरांवर, आरोपींवर वचक, धाक, राज्याची कायदा-सुव्यवस्था याचं जिवंत उदाहरण म्हणजे हि चित्रफीत आहे, असे म्हणणे वावगं ठरू नये.

बरं पोलीसांदेखत ही घटना झाली १० एप्रिलला आणी गुन्हेगारांना अटकेची बातमी आहे १८ तारखेची. म्हणजे सुरक्षा यंत्रणांच्या समोर गुन्हा घडुनही, अटकेसाठी आठवडा जावा लागला. काय हे राज्याच्या राज्यकर्त्यांच्या मनीषांच्या बाबतीत, कार्यपद्धतीच्या बाबतीत प्रश्न चिन्ह नाही???

रामजस कॉलेज मध्येही अशीच घटना झाली होती, आणी रातोरात हि घटना जागतीक पातळीवर गेली….का ???

कारण माध्यमांना अप्रिय असलेल्या विचारधारेच्या संघटना ABVP/BJP काही अंशी जबाबदार होत्या.

मात्र केरळातील वेल्लापल्ली नेटसन कॉलेजमधील घटना त्याच राज्यातील लोकांना माहीत असेल की नाही याची देखील शंका आहे.
कारण इथे माध्यमांना प्रिय असणाऱ्या डाव्या विचारधारेचे हल्लेखोर आणी त्यांच्याच विचारधारेच सरकार सत्तेत आहे. केरळच्या घटनेत SFI च्या ७ आणी DYFI च्या २ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

velapalli-netsan-college-marathipizza02

या संबंधित संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकता.

रामजस कॉलेज प्रकरणात, ABVPला अतिरेकी संघटना घोषीत करा म्हणत आपल्या फेसबुकच्या वॉल रंगवणारे आज कुठे आहेत ??? विरोध ठीक आहे, पण तो तथ्यागत असावा. हा दुटप्पीपणा लपुन राहीलेला नाही! कित्येकांचे समाजवादाचे, विवेकवादाचे, सेक्युलरवादाचे मुखवटे कधीच उतरलेत ! महाराष्ट्रातील वृत्तपत्रदेखील अगदी तंतोतंत अशीच वागत आहेत. आपल्या सोयीच्या विचारधारेची कुकृत्य लपवा आणी म्हणे विवेकवाद वगैरे !!! माध्यमांचा मारा इतका प्रचंड आहे कि एखाद्या घटनेची दुसरी बाजू पाहताही येत नाहीये.

हा आहे आजचा मिडीया…आणी त्याची कार्यप्रणाली !!!

माध्यमांचा प्रचारतंत्र म्हणून केलेला वापर, त्याची सुरुवात, कार्यपद्धती, परिणाम आणी विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी अतुल कहाते यांच्या अवश्य वाचनीय लेखांची एक मालिका लोकसत्तात येते मागचे काही आठवडे. आणी त्याचे उदाहरणं लोकसत्ता स्वतः ठरत आहे !!!

असो.

लेखाचा उद्देश ABVP किंवा BJP च्या चुकांना पाठीशी घालणे हे नसुन, माध्यमे सत्य लपवत स्वतःचा प्रोपोगंडा कसा राबवत आहेत, हे दर्शवणे आहे !

एखाद्या घटनेचे तपशील, दुसरी बाजू न-तपासता आपली मतं बनवणं म्हणजे माध्यमांच्या प्रोपोगंडाला बळी पडणं होऊ नये… म्हणून हा लेख प्रपंच !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?