भारतीय जेम्स बॉंड: अजित कुमार डोवल

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


जेम्स बॉंड…थरारपटांच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारे हॉलीवूड सिनेमातील एक काल्पनिक पात्र! ज्यांनी जेम्स बॉंड एकदा पहिला ते अक्षरश: त्याच्या प्रेमातच पडले.  महागड्या गाड्यांविषयी असलेलं त्याचं प्रेम, सुंदर स्त्रियांना सहज आकर्षित करणारी त्याची नजर, दिमाखदार स्टाईल, बोलण्याची हजरजबाबी पद्धत या साऱ्या गोष्टी मनाला अगदी भुरळ घालतात.

 

james bond inmarathi
movieweb.com

पण त्याच्या विषयी सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तो देशाच्या रक्षणासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार असतो…! भूमिगत राहून काम करणारा हा गुप्तहेर जीवाची बाजी लावून देशावर चालून येणाऱ्या संकटाला आल्या पावली परत पाठवतो.

जेम्स बॉंडविषयी बऱ्याच जणांचं मत आहे की हे पात्र एखाद्या खऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार असा व्यक्ती होऊन गेला आहे. असूही शकेल. आपण या वादात न पडलेलंच बरं. पण हा वाद पाहताना कधी कधी प्रश्न पडतो की भारतीय गुप्तहेर खात्यामध्ये देखील असाच एखादा जेम्स बॉंड असेल तर तो कोण असेल?

त्या माणसाच्या शोधार्थ आम्ही मोहीम उघडली आणि आमचा प्रवास येऊन थांबला अजित डोवल या नावावर!

आणि मुख्य म्हणजे भारतीय संरक्षण खात्यामध्ये देखील ते जेम्स बॉंड याच नावाने प्रसिद्ध आहेत…!

 

ajit-doval-marathipizza02

स्रोत

अजित डोवल यांच्या कारकिर्दीमधील सर्वात गौरवास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी तबल ७ वर्षे पाकीस्तानामध्ये राहून भारतासाठी हेरगिरी केली. जेम्स बॉंड प्रमाणे स्वत:च्या जीवावर खेळत कोणाच्याही नजरेत न येत ते ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडत होते.


पाकिस्तानमधून अंडरकव्हर एजंटची भूमिका संपल्यावर इस्लामाबादमधील भारतीय हाय कमिशन साठी त्यांनी ६ वर्षे काम केले.

ajit-doval-marathipizza01

स्रोत

कंधार मधील IC-814 या विमान अपहरण प्रकरणाची बऱ्याच जणांना माहिती असेल. या अपहरण नाट्यामध्ये अडकलेल्या सर्व प्रवाश्यांना सुखरूप त्यांच्या मायभूमीवर परत आणण्याचे श्रेय अजित कुमार डोवल यांनाच जाते. १९७१ ते १९९९ या काळात घडलेल्या अश्या १५ प्रकरणांना यशस्वीपणे हाताळत त्यांनी भारतीय संरक्षण खात्यामध्ये चांगलेच नाव कमावले होते.

१९८६ साली मिझोरम मध्ये फिल्ड एजंटची भूमिका त्यांना सोपवण्यात आली. तेथे त्यांनी भारत सरकारविरुद्ध उठाव करत असणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंट या गटाशी बोलणी केली आणि त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडले. २० वर्षांपासून धुमसत असलेली मिझो नॅशनल फ्रंटची असंतोषाची आग त्यांनी शांतीपूर्ण मार्गाने विझवली…!

जेम्स बॉंड आणि अजित डोवल यांचा कोणता गुण विसंगत असेल तर तो हाच! अजित डोवल सर्वप्रथम शांततामे मार्गाने प्रश्न सोडवण्यावर विश्वास ठेवतात. सरतेशेवटी त्याचा काहीच परिणाम झाला नाही तर मात्र जेम्स बॉंड प्रमाणे ते देखील देशहितासाठी कठोर पाऊले उचलायला मागे पुढे पाहत नाहीत…!

 

ajit-doval-marathipizza05

 

स्रोत


१९८० च्या आसपास पाकिस्तानी एजंट बनून ते खलिस्तानी गोटामध्ये शिरले आणि तेथून अतिशय महत्त्वपूर्ण हालचाली भारत सरकारला पोचवत होते.

असं म्हटलं जातं की एका रिक्षाचालकाचा वेश घेउन अजित डोवल खलिस्तानी गटामध्ये वावरत होते. त्यांच्या गुप्तहेरीमुळे ऑपरेशन ब्लॅक थंडर हाती घेत भारतीय लष्कराने वेगळ्या खलिस्तान साठी लढणाऱ्या फितुरांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

जून २०१४ मध्ये त्यांनी इराक देशातील तिकरीत या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय नर्सेसची एक गुप्त मोहीम आखून सुखरूप सुटका केली होती.

 

ajit-doval-marathipizza00

स्रोत

विशेष सेवेत पोलीस मेडल मिळवणारे अजित डोवल हे भारताचे सर्वात कमी वयाचे पोलीस अधिकारी आहेत.पोलीस खात्यामध्ये रुजू झाल्यावर केवळ ६ वर्षांमध्ये त्यांनी या पदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी यापूर्वी कोणाच्याही हातून घडलेली नाही.

त्यांची हीच अभिमानास्पद कारकीर्द पाहून पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

 

ajit-doval-marathipizza03

स्रोत

आता तुमच्या देखील लक्षात आलं असेल की भारतीय संरक्षण खात्यामध्ये त्यांना जेम्स बॉंड या नावाने का ओळखलं जातं !!!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?