भारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आताच भारताने निदाहास ट्राय सिरीज जिंकली. यामध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश हे तीन राष्ट्र एकमेकांच्या विरुद्ध ठाकली होती. श्रीलंकेला व्हर्चुअल सेमी – फायनलमध्ये हरवत बांग्लादेशने या ट्राय सिरीजमध्ये फायनल गाठली. या अंतिम सामन्यामध्ये बांग्लादेशच्या समोर भारताचे कडवे आव्हान होते. या अंतिम समना खूपच अटीतटीचा झाला, पण शेवटी दिनेश कार्तिकच्या एका शानदार खेळीने बांग्लादेशकडे झुकलेला विजय त्यांच्यापासून हिसकावून घेतला आणि भारताला विजय मिळवून दिला.

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi
ytimg.com

या अंतिम सामन्याच्या आधीच्या सामन्यात श्रीलंका आणि बांग्लादेश जेव्हा एकमेकांच्या समोर ठाकले होते, तेव्हा काही वाद झला निर्माण झाला होता आणि सामना जिंकल्यानंतर खूप मोठा आनंद साजरा केला होता. याच आनंदाच्या भरामध्ये त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन काचा फोडल्या. पण हे कितपत योग्य होते, हे त्यांनाही माहित आहे आणि आपल्याला देखील माहित आहे.

असो, पण आज आम्ही याच भारतीय ड्रेसिंग रुममधील काही सिक्रेट्स सांगणार आहोत, जे कदाचित तुम्ही कधीही ऐकले नसतील. प्रत्येकजण घरात आणि ऑफिसमध्ये वेगवेगळ्याप्रकारे वागतात. आपण जसे घर आणि ऑफिसमध्ये वेगवेगळे वागतो, तसे खेळाडू हे मैदानावर आणि ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे वागतात. ते मैदानामध्ये विरोधी संघाचे कट्टर विरोधक असले, तरी ड्रेसिंग रुममध्ये ते एकमेकांचे मित्र असतात.


रैनाची वैयक्तिक नाराजी

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi1
mid-day.com

महेंद्रसिंग धोनीपेक्षा रैना हा पाच वर्षांनी लहान आहे, जेव्हा रैनाला धोनी बरोबर बेड शेयर करायला सांगितले तेव्हा ते त्याला आवडले नाही. त्याच काळामध्ये जेव्हा तो धोनीच्या कॅप्टनशीप खाली खेळला होता, तेव्हा रैनाला अस्खलित इंग्रजी बोलणे जमत नव्हते आणि तसेच त्याला डायनिंग टेबलवर काटे चमचे देखील वापरणे जमत नव्हते. रैना हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता. तसेच, त्याला आपला बेड एका अशा माणसाशी शेअर करायचा होता, जो टीम इंडियाचा सदस्यच नाहीतर एक यशस्वी कर्णधार होता.

गांगुली आणि सचिन यांच्यामधील भांडण

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi2
ggpht.com

गांगुली आणि सचिन यांची भांडणे काही एकमेकांच्या विरोधात झाली नव्हती. त्यावेळी मॅच फिक्सिंगचे काळे ढग क्रिकेट जगतावर फिरत होते. ९० च्या दशकामध्ये क्रिकेटचे जगताला ही कीड मोठ्या प्रमाणात लागली होती आणि याचा काही प्रमाणात प्रभाव भविष्यावर देखील पडला. जर तुम्ही सचिनच्या जीवनावर निघालेली सचिन – अ बिलियन्स ड्रीम्स पाहिली असेल, तर तुम्हाला ते छायाचित्र नक्कीच आठवत असेल, ज्यामध्ये ते प्रॅक्टिस सेशन दरम्यान एकमेकांकडे जरा रागाने पाहत आहेत. ज्या छायाचित्रामुळे काही वाद निर्माण झाले होते आणि लोकांनी त्यावर आपापल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

धोनीने अचानकपणे घेतलेला निवृत्तीचा निर्णय

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi3
cricketcountry.com

धोनी हा अनिश्चिततेचा राजा आहे. तो कधी कोणता निर्णय घेईल, याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही.  २०१४ मध्ये जेव्हा भारताची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी मालिका सुरु होती, त्यावेळी धोनीने मध्येच आंतरराष्ट्रीय कसोटी फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या संघासाठीही हे अविश्वसनीय होते. रहाणे आणि रैना यांनी भावूक होऊन यावर प्रतिक्रिया ही दिली. धोनीचा निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारा होता.

सचिनचे चक दे इंडिया स्पीच

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi4
twitter.com

२००३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने खूप धावा केल्या होत्या, ज्या कोणताही भारतीय आजही विसरू शकत नाही. या स्पर्धेमध्ये त्याने भारताला कितीतरी सामने जिंकवण्यासाठी मोलाची मदत केली. त्याचबरोबर सचिनने आपल्या टीम मेंबर्सना या स्पर्धेच्या दरम्यान ड्रेसिंग रुममध्ये प्रेरणा देणारे स्पीच देखील दिले होते. या स्पर्धेमध्ये भारताने लागोपाठ आठ विजय मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

गांगुलीने युवराज बरोबर केलेला प्रॅन्क

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi5
assettype.com

युवराज सिंगचा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू गांगुली कर्णधार असताना झाला. २००० मध्ये झालेल्या आयसीसी नॉकआउट टूर्नामेंटमध्ये युवराजचा डेब्यू होणार होता. सामना खेळण्याचा एक दिवस आधी गांगुलीने युवराजला सांगितले की, तुला उद्या ओपनिंग साठी जायचे आहे. हे ऐकून युवराजला थोडी भीती वाटली, पण त्यावेळी त्याला हा म्हणण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, कारण हे कर्णधाराने सांगितले होते. त्या रात्री या ओपनिंगच्या विचारामुळे त्याला रात्रभर झोप आली नाही. पण दुसऱ्या दिवशी युवराजला दादाने सांगितले की, तो फक्त त्याची फिरकी घेत होता. त्याला काही ओपनिंगला जायची गरज नाही.

कपिल देव विरुद्ध दाऊद इब्राहीम

 

Indian cricket team dressing room secrets.Inmarathi6
thefearlessindian.in

१९८३ मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर बुकींची नजर भारतीय संघावर आणि त्यांच्या टीम मेम्बर्सवर पडली. दाऊद इब्राहीमला पहिल्यापासूनच क्रिकेटमध्ये रस होता. त्याला बहुतेक वेळा क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील सामना पाहताना बघितले गेले आहे. माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसकर असा दावा केला होता की, १९८६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान दाउद इब्राहीम हा भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता आणि त्यांनी खेळाडूंना जर तुम्ही पाकिस्तानला हरवलात, तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक कार देईन. पण हे ऐकून काही कपिल देवला आनंद वैगेरे झाला नाही आणि त्याने त्याला बाहेर जाण्यास सांगितले.

याबद्दल कपिल देवने खुलासा करताना सांगितले होते की, “हा असा मनुष्य नक्कीच आमच्या ड्रेसिंग रुममध्ये एखादी ऑफर घेऊन आला होता, पण ती कारची ऑफर दिली होती हे चुकीचे आहे.”

ह्या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी ड्रेसिंग रुममध्ये घडलेल्या आहेत आणि अजूनही कितीतरी गमती – जमती या ड्रेसिंग रुममध्ये चालूच असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *