ऑपरेशन मेघदूत: भारताने बर्फात खोदली होती पाकिस्तानची कबर, सियाचिनवर फडकवला तिरंगा !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१९४८ मध्ये भारतीय लष्करातील जवानांनी सियाचिनचा ताबा घेऊन केवळ पाकिस्तानचा सियाचीन काबीज करण्याचा डावच उधळून लावला नाही तर पाकिस्तानी सेनेच्या जवानांना सुद्धा यमसदनी धाडले. सियाचीन म्हणजे जंगली फुलांची जागा. कदाचित या नदीखोर्‍याच्या कमी उंचीच्या भागात आढळणार्‍या फुलांमुळे हे नाव पडले असावे.

InMarathi Android App

सियाचिन, हे जगातील सर्वाधिक उंचीचे युद्धक्षेत्र आहे. इथे तग धरणं ही खूप कठीण गोष्ट आहे. असे असूनसुद्धा भारतीय सैन्य इथे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कायम टिकून राहिले आहे.

त्यांना इथे बर्फाळ वातावरण आणि वादळांचा सामना करावा लागतो. सियाचीनमध्ये भारतीय सीमेच्या एकीकडे चीन आहे तर दुसरीकडे पाकिस्तान. १९८४ मध्ये सियाचीन ताब्यात घेण्यासाठी भारतीय जवानांना कित्येक संकटांचा सामना करावा लागला होता. पाकिस्‍तानने १७ एप्रिल १९८४ या दिवशी सियाचिनचा ताबा घेण्याचे ठरवले होते.

पण याची कुणकुण भारतीय अधिकाऱ्यांना लागली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला बुचकळ्यात टाकत सियाचीन काबीज करण्याची योजना आखली आणि जन्म झाला ‘ऑपरेशन मेघदूत’ चा.

 

siachin-inmarathi
tripoto.com

वायुसेनेची महत्त्वपूर्ण भूमिका :

या ऑपरेशनच्या दरम्यान भारतीय जवानांना इंदिरा कोल ते सिआ ला, बिलाफोंड ला, आणि गियांग ला यांवर ताबा घेऊन सियाचीन काबीज करायचे होते. वायुसेनेच्या हेलीकॉप्‍टर्सनेच जवानांना उंच प्रदेशांमध्ये पोहोचवले जाऊ शकत होते. ‘ऑपरेशन मेघदूत’ यशस्वी होण्यामध्ये भारतीय वायु सेनेच्या एमआय-17, एमआय 6, एमआय 8 आणि चिता हेलीकॉप्‍टर्सनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

ऑपरेशन मेघदूतची सुरुवात मार्च १९८४ मध्ये सियाचीन ग्लेशियरच्या पूर्वेकडे असलेल्या सैनिकी तळाकडे कूच करून झाली. कुमाऊ रेजिमेंटची एक बटालियन आणि लडाखच्या स्काउट्स यूनिटने हत्यारे आणि आवश्यक सामान घेऊन झोजिला पासमधून पुढे जात सियाचिनच्या दिशेने कूच केले.

जवळपास ६५०० मीटर उंचीवर भारतीय जवानांना जिथे शत्रूच्या सैन्याला सामोरे जायचे होते तिथे अत्यंत खराब वातावरण होते. येथील वातावरण क्षणार्धात बदलते. इथले तापमान कित्येक ठिकाणी -३० पर्यंत खाली जाते. त्यामुळे इथे श्वासोच्छ्वास करणं, चालणं आणि गप्पा मारणं किंवा बोलणं हे देखील कठीण काम होतं.

 

iaf-inmarathi
indiastrategic.in

उपकरणांची कमतरता :

भारतीय वायुसेनेसाठीसुद्धा ही गोष्ट पूर्ण करणं सोपी गोष्ट नव्हती. कारण वायुसेनेच्या पायलटना बराच वेळ बर्फाच्छादित प्रदेश पहावा लागल्याने ‘स्पेशल डिसओरिएंटेशन’ होऊ लागते. अशा परिस्थितीत इथे तैनात असलेल्या जवानांना हाय ब्‍लडप्रेशरबरोबरच विस्मरण होण्याची सुद्धा शक्यता असते. हे ऑपरेशन जेव्हा झाले तेव्हा जवानांकडे त्या परिस्थितीत वापरली जाणारी सगळी उपकरणेसुद्धा नव्हती.

त्याच काळात तत्कालीन सरकारने शस्त्रास्त्रे आणि उपकरणे घेण्यासाठी लेफ्टनंट जनरल पी.एन. हून यांना परदेशात पाठवले होते.

तेव्हाच भारताला हादरवून सोडणारी ही खबर मिळाली. ज्या कंपनीकडून भारताने जरुरी वस्तूंची, शस्त्रास्त्रांची मागणी केली होती, त्यांनी सांगितले की या गोष्टींची मागणी पाकिस्तानने भारताने त्या मागण्यापूर्वीच केली होती. ही मोहीम सुरू होण्याआधी भारतीय सेना आणि एयरफोर्सच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सियाचीनच्या स्थितीबद्दल बैठक झाली.

 

oneindia.com

बिलाफोंड ला वर पहिला एयरड्रॉप :

एअरड्रॉप म्हणजे छत्रीधारी सैनिक किंवा अन्न पदार्थ हवाई छत्रीच्या मदतीने खाली सोडण्याची कृती. १२ एप्रिल १९८४ ला जवानांसाठी आवश्यक कपडे आणि सामान एमआय १७ वरून पोहोचले होते. तत्‍कालीन कॅप्टन रिटायर्ड लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी त्या पहिल्या दलात होते जे दल बिलाफोंड ला वर एअरड्रॉप करण्यासाठी जाणार होते.

हे दल जवळजवळ चाळीस जणांचे होते. चीता हेलीकॉप्‍टरने जवानांना इथपर्यंत सोडण्यासाठी सतरा राउंड मारल्या आणि जवानांनी १३ एप्रिल ला सकाळी सात वाजता इथे तिरंगा फडकवला. इथे तीस जवान आले होते. मात्र एका सैनिकाला प्रकृती बिघडल्याने बेस कॅम्पला परत जावे लागले आणि एका जवानाचा मृत्यू झाला.

शत्रूच्या नजरेत येण्याचा धोका :

यानंतर भारतीय वायुसेनेच्या चीता आणि एम आय 8 या हेलीकॉप्‍टरनी लडाख स्‍काउटच्या जवानांच्या एका तुकडीला सिया ला पासून जवळजवळ पाच किलोमीटर दूर उतरवले.

१७ एप्रिलला मेजर ए एन बहुगुणा यांच्या नेतृत्त्वाखाली जवानांनी पाच किलोमीटरचा रस्‍ता चालत पार पाडून सिया ला वर तिरंगा फडकवला. या दरम्यान लेफ्टनंट कर्नल डीके खन्‍ना आणि त्यांच्याबरोबर असलेले जवान गियांग ला च्या दिशेने पुढे जात होते. पण इथे अगदी सहजपणे शत्रूच्या नजरेस पडण्याची भीती होती. सैन्याने इथे २३ एप्रिलपर्यंत जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल्स तैनात केली होती. लोलोफांड ला आणि सियाचिन ग्‍लेशियरवर सुद्धा हत्यारे मागवून ठेवली होती.

याशिवाय लेह एअरफील्‍डच्या सुरक्षेसाठी आवश्यक मशीनगन आणि मिसाईल्स सुद्धा तयार होती. थोएय एयरफील्‍डवर सुद्धा अशीच तयारी ठेवण्यात आली होती.

 

Siachen-inmarathi
morungexpress.com

भारताला गुप्तचर यंत्रणेकडून अशी सूचना मिळाली होती की पाकिस्‍तानने सियाचिनवर ताबा मिळविण्यासाठी बरजिल फोर्स बनवली होती. भारतीय सेनेला सियाचिनमधून बाहेर काढण्यासाठी पाकिस्‍तानने ‘ऑपरेशन अबाबील’ लॉन्‍च केले. या ऑपरेशनचा हेतू सियाला आणि बिलाफोंडला काबीज करणे हा होता. पाकिस्‍तानकडून पहिला हल्ला २३ जूनला सकाळी साधारण पाच वाजता केला गेला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत २६ पाकिस्तानी जवानांना ठार केले.

यानंतर जून आणि ऑगस्टमध्ये सुद्धा पाकिस्‍तानने सियाचीनवर हल्ला केला. मात्र त्यांना तेव्हाही पराभव पत्करावा लागला.

यात पाकिस्तान च्या ३० जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान गियांग ला च्या सर्वांत उंच शिखराचा सुद्धा भारतीय जवानांनी ताबा घेतला. अशा प्रकारे संपूर्ण सियाचीन भारताने काबीज केले. १९८७ मध्ये आणि १९८९ मध्ये सुद्धा पाकिस्‍तानने पुन्हा हल्ला केला होता. इथे असलेली बाना पोस्ट जगातील सर्वांत उंच युद्धक्षेत्राची सर्वांत उंच पोस्ट आहे जी समुद्रसपाटीपासून २२१४३ फूट (६७४९ मीटर) उंचीवर आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *