लष्कराला मिळणार modern शिरस्त्राण?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नवनिर्वाचित सरकार येऊन दोन वर्ष झाली – तरी अजूनही Indian Army साठी काही ठोस निर्णय सरकारकडून घेतले गेले नाहीत.
ह्याला अपवाद म्हणजे TATA ह्यांच्याकडून घेण्यात आलेले Bulletproof Jackets ज्यांना आर्मी पर्यंत पोहोचायला 2016 चा मार्च उजाडला. 140 कोटींच्या ह्या खरेदी मध्ये 50,000 Bulletproof Jackets घेण्यात आले होते.
Bullet-Proof MarathiPizza

आता एक अजून नवीन ठोस अश्या निर्णयाचा अपवाद बनवण्याची संधी सरकारकडे आली आहे. ती म्हणजे जवानांचं बेसिक प्रोटेक्शन – हेल्मेट्स ची खरेदी.

गेल्या दोन दशकांपासून भारतीय लष्करातून वजनाने हलक्या पण मजबूत अशा ballistic हेल्मेट ची मागणी होत होती. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासाठी सरकारकडून एक नवीन deal sign होण्याच्या मार्गावर आहे. नवीन, अधिक चांगल्या हेल्मेट ची.

आर्मीचे अधिकारी सांगतात – डोक्याला होणारी दुखापत ही सर्वात मोठी समस्या आमच्या समोर आहे. छोट्या चकमकी, धाड टाकतांना डोक्याला होणाऱ्या दुखापतींमुळे जवान दगावतात. त्यात जुने हेल्मेट्स हे वजनाने जड, मोठे आणि कमी मजबूत आहेत. किरकोळ फटका, दगड ह्यांपासून बचाव होतो. आम्हाला 9 मिलीमीटर गोळीपासून मीटर अंतरावर बचाव करणारे हेल्मेट हवे असून, त्याबाबत सरकार विचार करत आहे.

Army helmet 001MarathiPizza

 

जुने हेल्मेट्स गोलाकार पद्धतीचे असून ते फक्त डोक्याला संरक्षण देतात. नवीन हेल्मेट्स कान आणि मानेचं सुद्धा संरक्षण करतील. नवीन हेल्मेट्स वर Night Vision Goggles, GPS, अद्ययावत संपर्क सुविधा, इ सारखे Devices लावता येण्याची सोय असेल. Ballistic Material ने बनलेले हे हेल्मेट हलके असेल. 
अवजड असलेल्या हेल्मेट्स ला सोडून जवान काहीवेळा बुलेटप्रुफ पटका (वजन 2.5 किलो) नावाचा एक हेल्मेट वापरतात. फोटोत दाखवल्याप्रमाणे हा फक्त डोक्याच्या मोरील बाजू आणि मागील बाजू सुरक्षित ठेवू शकतो.
patakaa 001 MarathiPizza

भारतीय उत्पादक असलेल्या MKU शी 170 कोटींमध्ये हा व्यवहार होणार असून, ह्यात 1,58,279 हेल्मेट्स ची order देण्यात येणार आहे.

ह्या हेल्मेट मध्ये  13 mm चं सुरक्षाकवच असेल आणि कमांडर साठीच्या हेल्मेट मध्ये अद्ययावत संपर्क सुविधा असेल.

MarathiPizza-1-army-helmet

 

अत्यंत आवश्यक अश्या हेलिकॉप्टर आणि आणखी हवाई दलाच्या मागण्या कधी पूर्ण व्हायच्यात ते होतील पण ही हेल्मेट ची DEAL लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी.

ह्या नवीन हेल्मेट्स च्या निर्णयाने, जुन्या जड हेल्मेट मध्ये ‘काम चालवून’ घेणाऱ्या जवानांना नवी उभारी आणि प्रोत्साहन मिळणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 50 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?