मिशन शक्तीः काय आहे ही ॲण्टिसॅटेलाईट मिसाईल सिस्टम आणि याची आवश्यकता काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


लेखक : ऋतुराज पत्की 

===

“मिशन शक्ती”… मिसाईलने लोअर ऑर्बिटमधल्या सॅटेलाईटला डिस्ट्रोय़ करण्याचं Make in India तंत्रज्ञान यशस्वी झाल्याचा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकला आणि आपल्या तमाम शास्त्रज्ञांचा, Central Government of India च्या पॉलिसी मेकर्सचा अतिशय अभिमान वाटला.

माझ्या माहितीप्रमाणे केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे असलेलं हे तंत्रज्ञान आज भारताने स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलं आहे ही खरोखर अतिशय आनंदाची बाब आहे!

काय आहे ही ॲण्टिसॅटेलाईट मिसाईल सिस्टम आणि याची आवश्यकता काय?

आधुनिक विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनुषंगाने सॅटेलाईटचं महत्व खूप मोठं आहे. अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणाकडे पाहून त्यातले बदल ओळखून वेळीच डिझास्टर प्लॅनिंग करण्यासाठी सॅटेलाईट गेली काही वर्ष खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत.

 

live-satellites-marathipizza02
india.com

याबरोबरच माहितीचं आदान प्रदान, ज्या ठिकाणी communication systems चा सेटअप अवघड आहे अशा ठिकाणी सॅटेलाईट लिंकद्वारे communication channel म्हणूनही सॅटेलाईटचं महत्व, विशेषतः सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे!


इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा जसा विधायक वापर होऊ शकतो, तसाच त्याचा गैरवापरही होऊ शकतोच!

अनेक विधायक कामांबरोबरच कालौघात हे सॅटेलाईट लांब पल्ल्याच्या मिसाईल्सना गाईड करण्यासाठी, एखाद्या देशावर, अगदी देशातल्या एखाद्या लहानशा भागावरही चोरून नजर ठेवून मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करण्यासाठीही वापरात येऊ लागले.

अनेक देशांनी आपापले कम्युनिकेशन सॅटेलाईट अंतराळात धाडले आणि एकूणच यामुळे भारतासारख्या देशांना राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आव्हान देऊ लागला.

 


iran-nuclear-inmarathi
.vosizneias.com

मग असा एखादा स्पाय सॅटेलाईट जर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत असेल आणि ज्या देशाचा तो सॅटेलाईट आहे तो देश आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय डिप्लोमसीला झुगारून देत असेल तर आपण काय करायचं?

चर्चेतून प्रश्न सुटतच नसेल तर अगदी शेवटचा ऑप्शन म्हणजे त्या सॅटेलाईटवरच थेट सर्जिकल स्ट्राईक! इथे मी सर्जिकल हा शब्द अचूकतेचं परिमाण म्हणून वापरला.

पण हे काम सोपं नाही… त्यासाठी अशी गाईडेड मिसाईल सिस्टम निर्माण करण्याची आवश्यकता होती जी एखाद्या मिसाईलला वातावरणाच्या अनेक लेअर्स छेदून एखाद्या सॅटेलाईटच्या अंतराळातल्या सद्य पोझिशनवर जाऊन मारा करण्याची ताकद देईल.

 

asm-inmarathi
news18.com

पृथ्वीच्या फिरण्याची गती, त्या सॅटेलाईटच्या फिरण्याची गदी आणि त्या सॅटेलाईटच्या ऑर्बिटचं गणित अशी बरीच आकडेमोड आणि गाईडेड ट्रॅकिंग याचा अचूक मेळ साधत मिसाईलने आपलं टार्गेट कमीत कमी वेळात हिट करायचं आहे… आणि हेच काम करणारी संपूर्णतः भारतात विकसित झालेल्या प्रणालीचं आज यशस्वी टेस्टिंग झालंय.

चाचणी करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी आपलाच एक चालू सॅटेलाईट या प्रणालीचा वापर करून यशस्वीपणे पाडला.

सर्वांगिण प्रगतीच्या अनुषंगाने देशाची सुरक्षा हा खूप मोठा घटक ठरतो. भारत सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक मोठे टप्पे पार करत असतानाच अशी एक ॲण्टिसॅटेलाईट प्रणालीही भारताकडे यावी ही खरोखर एक मोठी गोष्ट आहे!

पुन्हा एकदा तमाम शास्त्रज्ञ, Central Government of India चे पॉलिसी मेकर्स यांचं मनापासून अभिनंदन!


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?