' “टिकटॉक” बद्दल चर्चा-विनोद होतात, पण या महत्वाच्या facts कुणीच सांगत नाही – InMarathi

“टिकटॉक” बद्दल चर्चा-विनोद होतात, पण या महत्वाच्या facts कुणीच सांगत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘सारा जमाना टिकटॉक का दिवाना’ अशीच ज्याची ओळख होऊ शकते असे हे टिकटॉक अॅप सतत काही ना काही गोष्टींमुळे चर्चेत असतं.

कधी अॅपच्या सेलिब्रिटीज मुळे तर कधी त्यावरील विचित्र व्हिडीओज मुळे तर  कधी मजेदार पात्रांमुळे!

काही दिवसांपूर्वी या अॅपवर घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे या अॅपवर सरकारने बंदी आणली होती, तेंव्हा त्याची खूप चर्चा झाली होती.

भारतातले टिकटॉकचे चाहते यामुळे हिरमुसले होते, मात्र त्यानंतर पुन्हा निष्कलंक होऊन आपल्या मनोरंजनास सज्ज झालेले आहे.

तर मंडळी टिकटॉक कदाचित सगळ्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झालेले अॅप नसेल, पण हे कोणाला माहिती नाही, असं नक्कीच होऊ शकत नाही!

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच या म्युझिकली किंवा टिकटॉक अॅप बद्दल कुतूहल वाटतं.

चित्रविचित्र हाव भाव करणारे उडानटप्पू  या अॅप मुळे प्रसिद्ध झाले आहेत.

ज्यांना खऱ्या आयुष्यात अभिनयाच्या संधी मिळाल्या नाहीत ते ह्या अॅपवर फेमस झाले आहेत, सध्यै तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही ा अॅपला पसंती दिली आहे.

किती मिम्स, किती विनोद ह्या अॅपबद्दल आपण वाचतो, पाहतो पण अशाही काही रंजक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या अॅपबद्दल माहितीच नाहीत.

कारण कदाचित अॅप वापरणाऱ्यांना देखील माहितीच नसाव्यात.

तर मग पाहुयात काय काय शॉकिंग फॅक्टस आज आपल्यासमोर आम्ही आणले आहेत.

१. टिक टॉक चायनीज आहे!

 

Tik Tok 1 inmarathi
South China Morning Post

 

ज्या चायनीज गोष्टींना आपण हद्दपार करायच्या गप्पा मारतो त्यात ह्याचाही समावेश व्हायला हवा.

कारण हे अॅप देखील  ‘मेड इन चायना’ आहे. याला चायनीज सोशल नेटवर्क अॅप म्हटले जाते.

खास व्हिडीओ बनवायला आणि त्याला लाईव्ह प्रसारित करायला बनवण्यात आले आहे. चायना मध्ये इतर सोशल साईट्सवर बंदी असल्या कारणाने टिकटॉक चा बाजार तेजीत आहे.

२. टिक टॉकला चीनमध्ये आहे वेगळं नाव!

 

Tik Tok 2 inmarathi
WeRSM

 

टिकटॉक म्हणजेच म्युझिकली हे म्युझिकली इंकॉर्पोरेटेड कंपनीने बनवले आहे. अॅलेक्स झू आणि लुयू यांग हे त्याचे खरे मालक. पण बाईटडान्स (आता टिकटॉक) ने ही म्युझिकली कंपनी टेक ओव्हर केली आहे.

टिकटॉक जरी जगभर टिकटॉक ह्या नावाने ओळखले जात असले तरी चायना मध्ये हे “डुयीईन” म्हणून सुद्धा ओळखले जाते.

३. टिकटॉकच्या शाखा सर्वत्र 

म्युझिकलीचे हेड क्वार्टर चायना मधील शांघाय येथे असून २०१४ पासून सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्निया इथेही त्यांचे ब्रँच ऑफिस आहे.

टिकटॉक आता फक्त चायनीज कंपनी राहिली नसून ती जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

 

Tik Tok 3 inmarathi
CNN.com

 

आता हे टिकटॉक बाईट डान्स कंपनीने विकत घेतलं असल्याने अमेरिकेत आता हेड क्वार्टर्स आहे आणि जगभरात अनेक ठिकाणी ह्याची ऑफिसेस आहेत.

लंडन, टोकियो, सेऊल, बीजिंग, सिंगापूर, जकार्ता आणि मुंबईत सुद्धा टिकटॉकची ऑफिसेस आहेत. 

४. टिकटॉक होतंय अपग्रेड!

 

Tik Tok 4 inmarathi
Variety

 

या अॅपद्वारे युझर्स १५ सेकंदांपासून ते १ मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ बनवू शकतात आणि हवा तो साऊंडट्रॅक निवडू शकतात.

त्याच बरोबर टाईम लॅप्स, फास्ट, नॉर्मल, स्लो मोशन आणि एपिक आशा प्रकारचे ऑप्शन सुद्धा ह्यात उपलब्ध आहेत.

५. टिक टॉक झालं मालामाल ..

भारतातील रिकाम टेकड्या टिकटॉक वापरकर्त्यांना कदाचित माहिती नसणार की टिकटॉकने त्यांच्या बळावर घसघशीत कमाई केली आहे.

 

Tik Tok 5 inmarathi
Brandsynario

 

६. भारतात तब्बल ४ कोटी  टिकटॉक वीर …  

भारतात रोज ४ कोटी  युझर्स हे अॅप वापरतात आणि असंख्य व्हिडीओज बनवतात. हे व्हिडीओ वैशिष्ट्यपूर्ण असतात.

 

Tik Tok 7 inmarathi
YouTube

 

जगभरातल्या इतर सोशल मिडिया साईटशी टिकटॉक संलग्न आहे. त्यामुळे टिकटॉक आकाउंट इतर सोशल मिडिया प्रोफाईलशी लिंक करणे सहज शक्य झालं आहे.

भारतात हे व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शेअर केले जातात.

 

७. टिकटॉकची वाढतेय लोकप्रियता!

 

Tik Tok 6 inmarathi
Mediakix

 

टिकटॉक युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेच्या आकडेवारीत टिकटॉक  अॅप, व्हाट्सअॅप नंतर दुसऱ्या नंबरच्या पंक्तीत जाऊन बसलं आहे.

 

८. महिलांचं लाडकं टिकटॉक

 

Tik Tok 8 inmarathi
FactorDaily

 

या अॅपचा वापर फुकट तर आहेच शिवाय याचा इंटरफेस देखील युझर फ्रेंडली ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

बाहुभाषिक लोकांच्या सोयीसाठी हे अॅप ३२ भाषांमध्ये उपलब्ध केले गेले आहे.

टिकटॉकची महिलांमध्ये क्रेझ असून, जवळ जवळ ७५% टक्के वापर हा महिलांकडूनच होत असल्याचे निरीक्षणात आले आहे.

 

९. टिकटॉकवर व्हा फेमस 

टिकटॉकमुळे प्रसिद्धी मिळवणं सहज शक्य झालं आहे.

यावरच्या ट्रेंड्सला व्यवस्थित फॉलो केल्यास आपण सर्वदूर पोहचू शकतो. ह्यावरील प्रसिद्ध युझर्ससोबत एकत्रित व्हिडिओ बनवणे सहज शक्य आहे.

याबरोबरच प्रसिद्ध माहिती, ट्रेंडिंग गाणी आणि ट्रेंडिंग हॅशटॅग्सचा  वापर करून देखील प्रसिद्ध होता येतं.

 

Tik Tok 9 inmarathi
rainCHECK

 

१०. टिकटॉकला नाही वयाचे बंधन.

मित्रांनो एक एकमेव अॅप असे आहे ज्याला वयाची १८ वर्षे पूर्ण असण्याची अट नाही.

१३ वर्षांचे मूल सुद्धा हे अॅप वापरण्यास पात्र आहे. फक्त आई वडिलांचे लक्ष असले म्हणजे झाले! 

 

Tik Tok 10 inmarathi
Quartz

 

तर मंडळी अशी आहे ह्या टिकटॉक अॅपची महती!

कसं आहे ना, ज्या शतकात आपण राहतो वावरतो, त्या शतकातील अॅप अन अॅपची माहिती असणे आवश्यक आहे ना..

नाहीतर आपल्याला गावंढळ समजले जाऊ शकतो, म्हणून हा माहिती प्रपंच केला आहे.

ज्यांना खरच आपली अभिनय कला, नृत्य कला आणि नकला दाखवायची खुमखुमी आहे त्यांच्यासाठी जणू हे टिकटॉक अॅप अवतरले आहे.

तुम्ही अजून डाऊनलोड केले नसेल तर करून घ्या आणि एक अनोख्या विश्वात रंगून जा !

असो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. टिकटॉकशी निगडित आणखी काही मजेदार किस्से माहिती असल्यास सांगायला विसरू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?