सर्व जीन्स चाहत्यांसाठी : जीन्स बद्दलचे काही इंटरेस्टिंग “जुगाड”
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
डेनिम/जीन्स… सध्याच्या जीवनशैलीतील कपड्यांमधील हा सर्वांचा आवडता प्रकार. डेनिम म्हणजे जीव की प्राण असं म्हणायला हरकत नाही. डेनिम ही आपल्या सर्वांच्या कपाटात सहज उपलब्ध असणाऱ्या कपड्यांपैकी एक. कारण आजच्या जीवनशैलीप्रमाणे ही वापरायला सर्वात कम्फर्टेबल आणि लवकर न खराब होणारी आहे.
पण अनेक वेळा असं होतं की आपल्याला डेनिम विषयी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
कधी आपल्याला आपल्या साईजची डेनिम मिळत नाही तर कधी त्यावर डाग लागल्याने ती निरुपयोगी होऊन जाते.

पण ती आपली आवडती डेनिम असते. कितीही खराब झाली तरी कोणालाच आपली डेनिम टाकून द्यायची इच्छा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही डेनिम हॅक्स घेऊन आलो आहोत, ज्याने तुमच्या डेनिमचे वय वाढेल आणि ती बऱ्याच काळापर्यंत खराब होण्यापासून वाचेल.
1. डेनिम मधून दुर्गंध येतो आहे? ही ट्रिक ट्राय करा…

डेनिम्स हा सध्या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आपण सर्वच जवळजवळ रोज डेनिमचा वापर करत असतो. अश्यावेळी आपल्या डेनिमला बहुतेकदा आपण धुवत नाही. ज्यामुळे कधी कधी आपली डेनिम स्मेली होऊन जाते, त्यातून वास यायला लागतो.
पण जर तुम्हाला तुमची डेनिम तरीही धुवायची नसेल, तर तुम्ही ती न धुता देखील त्यातून येणारा दुर्गंध नाहीसा करू शकता. त्यासाठी तुमच्या डेनिमला एका झिपलॉक बॅगमध्ये पॅक करा आणि त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून द्या.
यामुळे तुमच्या डेनिमचा कलर जाणार नाही, जो पाण्याने धुतल्याने जातो, तसेच त्यातील सर्व बॅक्टेरिया नष्ट होतील आणि तुमची डेनिम आधीप्रमाणे फ्रेश वाटेल.
2. डेनिमवर च्विंगम चिटकले तर काय करणार?

जर तुमच्या डेनिमवर कधी च्युईंग गम चिटकले तर तुम्ही काय कराल..? आवडती डेनिम टाकून देणार का? गरज नाही. कारण तुम्ही यातूनही तुमच्या डेनिमला वाचवू शकता! त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती केवळ एका बर्फाच्या तुकड्याची.
एक बर्फाचा तुकडा घ्या, तो तुमच्या डेनिमवर ज्या ठिकाणी चिंगम चिटकले आहे तेथे १०-१५ मिनिटे घासा. यामुळे ते गम कडक होईल आणि ते अतिशय इझिली तुमच्या डेनिमपासून वेगळे होईल.
3. डेनिमवर रेड वाईन पडली तर?

जर तुमच्या डेनिमवर रेड वाईन पडली तर, तुमची डेनिम खराब होईल. त्यावर ते वाईनचे डाग पडतील.. पण काळजी नको कारण तुम्ही यापासून देखील तुमच्या डेनिमला वाचवू शकता. रेड वाईनचा तो गडद रंग एकदा आपल्या डेनिमने पकडला की त्यातून त्याला वाचवणे तसे कठीणच… पण तरी आपण या सोप्या ट्रिकने त्याला वाचवू शकतो.
यासाठी तुम्ही व्हाईट वाईन वापरू शकता, व्हाईट वाईनमध्ये तुमची डेनिम भिजवून ठेवा. त्यामुळे रेड वाईनमधील anthocyanin ज्यामुळे त्याला लाल रंग मिळतो ते कमी होऊन तुमच्या डेनिम वर पडलेला डाग फिक्कट होईल.
जेव्हा त्या रेडवाईनचा लाल रंग फिक्कट होईल तेव्हा तुमची डेनिम लगेच डिटर्जंटने धुवून घ्या. पण लक्षात ठेवा की व्हाईट वाईन मध्ये भिजविल्यानंतर तुमच्या डेनिमला डिटर्जंटमध्ये फार काळ भिजवू नका, नाहीतर त्याने तुमच्या डेनिमवर ब्लीचचे डाग ते पडून त्याला नेहमीकरिता खराब करतील.
4. जुन्या डेनिमचा कंटाळा आलाय का?

जर तुम्ही तुमच्या जुन्या डेनिम पासून बोर झाला असाल, आणि तुम्हाला नवीन डेनिम घ्यायची नसेल तर तुम्ही तुमच्या जुन्या डेनिमलाच एक न्यू लुक देऊ शकता. बस त्यासाठी तुम्हाला सॅण्डपेपरची गरज आहे. सॅण्डपेपरने तुमच्या डेनिमवर आडव्या पद्धतीने घासा. यामुळे तुमच्या साधा डेनिम Distressed डेनिम सारखा दिसेल.
5. वजन वाढलंय..? तुमची डेनिम जीन्स तुम्हाला होत नाहीये? तर हे करून पहा

जर तुमचं थोडसं वजन वाढलं असेल आणि आता तुम्ही तुमच्या आवडत्या डेनिममध्ये फिट बसत नसाल तर काळजी करू नका. कारण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या डेनिमला लूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला हेअर ड्रायरची गरज आहे.
आधी हेअरड्रायरने तुमच्या डेनिमच्या कमरेचा भाग एअरड्राय करा. त्यांनंतर हातांनी त्याला ताणा. यामुळे तुमची डेनिम जरा लूज होईल.
6. जर डेनिम खरेदी करताना ट्राय करता येत नसेल तर काय कराल?

जर तुम्ही एखाद्या अश्या बाजारातून डेनिम विकत घेत आहात जिथे तुम्ही ती ट्राय करून बघू शकत नाही. तर यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. डेनिमची कंबर तुमच्या मानेभोवती गुंडाळून बघा जर ती कम्फर्टेबली तुमच्या मानेभोवती बसली तर ती तुमच्या कमरेतही नीट होईल.
7. डेनिमवर शाई पडली तर?

आपण नेहमी कामावर डेनिम घालणे पसंत करतो. पण कधी काम करताना आपल्या डेनिमवर शाई पडली तर? याचा विचारही नकोसा वाटतो. आपल्या आवडत्या डेनिमवर जर शाई पडली तर तो पूर्णपणे खराब होईल जाईल, निरुपयोगी होऊन जाईल…
पण आपण यातूनही आपल्या डेनिमला वाचवू शकता.
त्यासाठी एका बादलीत पाणी घेऊन तुमची डेनिम त्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि त्यात एक ग्लास दुध देखील घाला. नंतर शाईचा डाग असलेल्या भागावर हेअरस्प्रे लावा आणि रोजच्या डिटर्जंटने धुवून घ्या. यामुळे तुमच्या डेनिमवरील शाईचा डाग पूर्णपणे नाहीसा होईल.
याशिवाय जर आणखी काही डेनिम हॅक्स तुम्हाला माहित असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि ही माहिती तुमच्या सर्व डेनिम लव्हर्स मित्रांना नक्की कळवा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.