२७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पावसाळ्यात मनाला सर्वात जास्त भुरळ घालतो धबधबा! एखाद्या उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासारखे नेत्रसुख नाही, त्याचे तुषार अंगावर झेलताना येणारा रोमाचं, मनात धडकी भरवणारा पण सतत ऐकत रहावासा वाटणारा आवाज या गोष्टी तर आपल्याला त्याच्याकडे अजूनच आकर्षित करतात. म्हणूनच कि काय पावसाळा सुरु झाला रे झाला की सगळ्यांचीच पाऊले आपोपाच धबधब्यांकडे वळतात. महाराष्ट्रात असे असंख्य धबधबे आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नावारूपाला आले आहेत. दूर दूरहून पर्यटक त्यांचा जलप्रपात पाहण्यासाठी खास गर्दी करतात. पण आज आम्ही तुम्हाला जगातील एका अश्या खास धबधब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे.

या धबधब्याचची खासियत ही की तब्बल २७५ धबधब्यांपासून हा महाकाय धबधबा तयार होतो.

iguasu-falls-marathipizza01
airpano.com

या धबधब्याचे नाव आहे- इगुआजू फॉल्स! अर्जेंटीना आणि ब्राझीलच्या सीमेवरील हा थरारक व सुंदर धबधबा तब्बल २७५ छोट्या-छोट्या धबधब्यां पासून तयार झाला आहे.

iguasu-falls-marathipizza02
youtube.com

इगुआजू नावाच्या या धबधब्याचा शोध एका ब्रिटीश चमूने १५४२ मध्ये लावला होता. अर्जेंटीना व ब्राझीलच्या सफरीवर असलेले हे लोक रात्रीच्या वेळी या धबधब्याजवळ पोहोचले होते.सकाळी ते झोपेतून उठले तेव्हा तिथले दृश्य पाहून थक्कच झाले.

iguasu-falls-marathipizza03
01argentina.com

इगुआजू नदीवर बनलेला हा धबधबा पाच किलोमीटरपर्यंत पसरलेल्या २७५ धबधबे मिळून बनलेला आहे. या ठिकाणी अर्जेंटीना,ब्राझील व पॅराग्वे या देशांच्या सीमांचा संगम आहे. तिथला सर्वात उंच धबधबा ६४ मीटर व अन्य ३० ते ४० मीटर उंच आहेत.

iguasu-falls-marathipizza04
keywordsuggest.org

हे ठिकाण ब्राझील आणि अर्जेंटीना दोन्ही देशांनी राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित केले असून तिथे विविध प्रकारचे वन्यजीव आढळून येतात. या धबधब्यामुळेच इगुआजू नदी दोन भागांत विभागली जाते.

iguasu-falls-marathipizza05
keywordsking.com

या धबधब्याच्या जवळपास दोन विमानतळ आहेत पहिला कॅतारात्स डेल इगझू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुसरा म्हणजे फोझ दो इगचू आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे विमानतळ गुअझू पासून २५ किलोमीटर दूर आहे. ब्राझील शहरातून हा धबधबा पाहण्यासाठी हेलीकॉप्टर राइड्स पण उपलब्ध आहेत.

iguasu-falls-marathipizza06
city-discovery.com

असा हा धबधबा खूप विलोभनीय आणि मनमोहक आहे,जर जीवनात संधी मिळाल्यास नक्की या धबधब्याला भेट द्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?