' पृथ्वीला शनी ग्रहासारख्या कडा असत्या तर?आपलं जीवन किती वेगळं असलं असतं…! – InMarathi

पृथ्वीला शनी ग्रहासारख्या कडा असत्या तर?आपलं जीवन किती वेगळं असलं असतं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

पृथ्वीबाबतचे अनेक शोध शास्त्रज्ञांनी कैक वर्षांपूर्वी लावले आहेत. अजूनही दररोज याबाबतच्या नवीन गोष्टी आपल्या कानावर पडतच असतात. लहानपणी भूगोलाचा अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्याला एका ग्रहाचं फार आकर्षण वाटतं. तो ग्रह म्हणजे “शनी”.

या ग्रहाचं आकर्षण वाटण्याचं कारण म्हणजे या ग्रहाभोवती असलेली कडा. माणसाला ज्ञात असलेल्या ग्रहांपैकी फक्त शनी या ग्रहालाच कडा आहे. त्यामुळे या कडांबद्दल लोकांमध्ये खूप कुतूहल आहे. वैज्ञानिकांनी या कडांची निर्मिती कशी झाली याबाबतीत अनेक शोध लावले आहेत. पण, सामान्य माणसाला मात्र हा ग्रह या कड्यांमुळेच लक्षात राहतो.

अशाच कडा जर पृथ्वीभोवती असत्या तर? विचार करून गंमत वाटते ना? जाणून घेऊया, पृथ्वीला सुद्धा शनी ग्रहासारख्या कडा असत्या तर काय घडलं असतं ..!

 

earth-with-rings-inmarathi

 

हे ही वाचा :

===

 

पृथ्वीभोवती कडा असत्या तर पृथ्वी वेगळी दिसली असती ही तर साहजिकच गोष्ट आहे. पण, दिसण्यापेक्षा जास्त पृथ्वीच्या इतर गोष्टींमध्ये खूप फरक पडला असता. आता दिसणाऱ्या निळ्या आकाशात आपल्याला त्या कडासुद्धा दिसल्या असत्या.

या गोष्टीचा पृथ्वीच्या तापमानावर, पर्यावरणावर फरक पडला असता. त्यांचा नक्की परिणाम कोणतेच शास्त्रज्ञ नेमकेपणाने सांगू शकत नाहीत कारण, कडांचा परिणाम हा त्यांच्या आकृतींवर, त्यांच्या प्रकारावर अवलंबून असतो. याशिवाय त्या कडा कोणत्या घटकांनी तयार झाल्या आहेत यावरही त्यांचा परिणाम अवलंबून असतो.

काही शास्त्रज्ञांचं असं मत आहे की, हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीभोवती सुद्धा एक कडा होती. ही गोष्ट ऐकायला जरी विचित्र वाटत असली तरीही खरी आहे असं काही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अनेक शास्त्रज्ञ असं मानतात की, चंद्राच्या निर्मितीपूर्वी पृथ्वीभोवती ही कडा अस्तित्वात होती.

“थिआ” नावाच्या एका ग्रहाशी पृथ्वीची टक्कर झाली. अंतराळात हे दोन ग्रह एकमेकांना आपटल्यामुळे काही अवशेष अंतराळात फेकले गेले.

हेच अवशेष काही वर्षांनी पृथ्वीभोवती स्थिरावले आणि त्यामुळे पृथ्वीभोवती एक कडा तयार झाली. हीच कडा पुढे एकत्र येऊन त्यापासून चंद्र निर्माण झाला, असे वैज्ञानिक सांगतात.

शनीसारख्या कडा पृथ्वीभोवती सुद्धा असत्या तर ?

 

 

पृथ्वीभोवती शनीसारख्या कडा असत्या तर त्या शनीच्या कडांपेक्षा खूप वेगळ्या दिसल्या असत्या. शनी सूर्यापासून खूप लांब असल्याने शनीवरील तापमान थंड आहे. शनीभोवती असलेल्या कडा या बर्फ आणि धुलीकण यांनी मिळून तयार झालेल्या आहेत. त्यामुळे जशी कडा शनीभोवती आहे तशी पृथ्वीभोवती नसू शकते.

कारण, सूर्याच्या उष्णतेमुळे बर्फाचे कण क्षणार्धात नष्ट होतील. पृथ्वीभोवती जर कडा असती तर ती दगडांची असती. शनीच्या कडेइतकी दिसायला सुंदर नसली तरीही सूर्याच्या उष्णतेमुळे दगडांवर फार परिणाम झाला नसता.

 

जाणून घेऊया, ही कडा कशी दिसली असती ?

 

earth with rings 1 inmarathi

 

पृथ्वीवरून ही कडा अगदी निर्विवादपणे दिसली असती. ही कडा विषुववृत्ताला समांतर असती. पृथ्वीवर आपण कुठे आहोत त्यावरून ही कडा कशी दिसेल हे ठरले असते. जर एखादा मनुष्य विषुववृत्ताच्या जवळ असेल तर, त्याला आकाशात ही कडा स्वच्छपणे दिसली असती. क्षितिजात दिसणाऱ्या उभ्या रेषेप्रमाणे ही कडा दिसली असती.

 

earth with rings inmarathi 2

 

हे ही वाचा :

===

 

विषुववृत्तापासून जसजसे दूर जाऊ तशी ही कडा आकाशात विस्तारलेली दिसली असती.

 

वातावरणातील बदल

 

winter inmarathi

 

पृथ्वीभोवती असलेल्या कड्यामुळे वातावरणावर खूप मोठ्या प्रमाणात बदल घडला असता. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याची किरणे फारसे अडथळे न येत पोहोचतात. त्यामुळे पृथ्वीवर बऱ्यापैकी उष्णता टिकून राहते.

पण, जर पृथ्वीभोवती कडा असेल तर तापमान उष्ण न राहता जास्त थंड होईल. यामागचं कारण सुद्धा अतिशय साधं आहे. पृथ्वीभोवती असलेल्या कड्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीभोवती येताना अडचण निर्माण होईल. उत्तर ध्रुवावर उन्हाळा असताना या कडेची सावली दक्षिण ध्रुवावर पडेल. दक्षिण ध्रुवावर या वेळेस हिवाळा असल्याने तिथे गरजेची असणारी उष्णता मिळणार नाही. त्यामुळे थंडीत तापमान अजून कमी होईल.

त्यामुळे, पृथ्वीभोवती असणाऱ्या कडेने पृथ्वीचं बाह्यसौंदर्य जरी वाढलं तरीसुद्धा वातावरणावर तीव्र बदल होतील एवढं मात्र निश्चित!

 

प्रकाशमय रात्र

 

earth with rings inmarathi

 

रात्र म्हणजे अंधार हे समीकरण आपल्या डोक्यात ठरलेलं असतं. पण, जर पृथ्वीभोवती कडा असती तर या समीकरणात थोडासा बदल झाला असता. वाचून आश्चर्य वाटतंय ना? पण, आतापेक्षा रात्र थोडी प्रकाशमान झाली असती असं काही वैज्ञानिक सांगतात.

यामुळे अवकाश अभ्यासकांना मात्र थोडासा त्रास झाला असता कारण त्यांना तारे स्पष्ट दिसले नसते. चंद्र आणि पृथ्वीभोवतीची कडा यांनी एकत्रितपणे सूर्याची किरणं परावर्तित केल्यामुळे रात्री सुद्धा प्रकाश दिसला असता.

माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. त्यामुळे सतत अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याची त्याची इच्छा जागृत असते. वेदकालीन लोकांनी आकाशात बघून या जगाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पृथ्वीभोवती जर कडा असती तर, या कडेमागचं रहस्य जाणून घेणासाठी त्यांनी प्रयत्न केले असते.

मानसिकदृष्ट्या सुद्धा लोकांमध्ये खूप बदल घडले असते. संशोधनकार्यामध्ये लोक अधिक गुंतले असते. यामुळे आपण तांत्रिकदृष्ट्या आतापेक्षा खूप जास्त प्रगत असतो.  

आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाभोवती जर कडा असेल तर त्याच्यामागचं रहस्य शोधण्याच्या प्रयत्न लोकांनी केला असता. ही कडा लोकांसाठी प्रेरणा ठरली असती. पण, अंतराळवीरांसाठी किंवा अवकाशातील अभ्यासकांसाठी मात्र पृथ्वीभोवती कडा असणं हे एक आव्हान ठरलं असतं. कारण, पृथ्वीबाहेर सॅटेलाइट पाठवण्यासाठी ही कडा अडथळा होऊ शकली असती.

सॅटेलाइट्सना पुरेसे संरक्षण मिळण्यासाठी विविध उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली असती. त्यामुळे, पृथ्वीभोवती कडा असणे हे गंमतीचे वाटत असले तरी बऱ्याच नवीन आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागलं असतं.

===


इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?