व्यायाम नं करता वजन आटोक्यात ठेऊन शरीर सुपर फिट ठेवण्याच्या १० जबरदस्त आयडियाज!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या झिरो फिगर हा एक सतत चर्चेत असणारा विषय आहे. राहणीमान, बदलती जीवनपद्धती यामुळे एक प्रश्‍न सगळ्यांनाच भेडसावत आहे तो म्हणजे बेमालूम वाढलेली जाडी.

दहा माणसांत ४-५ माणसं तरी ओव्हरवेट असतात आणि मग सुरू होते चर्चा, ‘वजन कसं कमी करायचं?’

loss weight marathipizza

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा प्रश्‍न भेडसावत असतो. मग कुणी सांगतो व्यायाम कर, डाएट कर वगैरे…!

पण आपल्या रुटीनमध्ये आपल्याला तेही शक्य नसतं किंवा करायचा आळस असतो.

मग ‘कधी करू?, मला वेळ कुठे आहे?’ हे सोईस्कर उत्तर आपण चिकटवून आपला जास्तचा भार आपणच सांभाळत राहतो.

पण मंडळी, तुमची जाडी जर तुम्हाला कमी करायची असेल तर ती अशीच जादूने होणार नाही.

त्यासाठी काहीतरी उपाय हे करावेच लागतील. मग जर तुम्हाला व्यायामाचा कंटाळा आला असेल तर आमच्याकडे काही अफलातून आयडिया आहेत.

बघा त्या तरी जमतायत का…! अहो शेवटी काय हो ‘कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेषु कदाचन’…!

१. गेम्स!

badminton inmarathi
tosshub.com

अंहं तुम्ही समजताय तसा हा व्हिडिओ गेम नाही बरं. व्हिडिओ गेममुळे तुम्ही आणखी दुर्बळ होऊ शकाल, त्यापेक्षा तुम्ही बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल हे खेळ खेळू शकता किंवा अगदी नृत्यही करू शकता. यामुळे तुमच्या सर्वांगाला छान व्यायाम होईल. खेळ खेळल्याचा आनंद पण मिळेल.

एका सर्वेक्षणानुसार ट्रेडमिलवर चालण्यापेक्षा खेळ खेळताना जे लोक चालतात, धावतात त्यांचा व्यायाम ट्रेडमिलच्या चालण्यापेक्षा जास्त झालेला आढळतो.

खेळण्याने तुम्हाला जास्त ऊर्जाही मिळेल आणि स्वच्छ मोकळ्या वातावरणाचा आनंदही लुटता येईल.

२. शारिरीक हालचालींची कामं

car washnig inmarathi
masterfile.com

जर तुम्हाला एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील तर तुम्ही एक काम करू शकता.

तुमची कार धुवायला तुम्ही माणूस ठेवता त्याऐवजी जर तुम्ही तुमची कार स्वत:च धुतली तर चांगला व्यायामही होईल. आपण आपल्या गाडीची काळजी योग्य प्रकारे घेऊन ती अधिक काळजीने स्वच्छ करू.

व्यायामही होईल नी कामही होईल. घराची फरशी जर आपण पुसली तर त्यानेही चांगला व्यायाम होतो. घराजवळचं आवार साफसूफ करण्याने, कचरा काढण्याने शरीराची हालचाल होऊन छान व्यायाम होतो.

घर, कार सर्व स्वच्छ पण होतं, ते आपण स्वत: केल्याचं मानसिक समाधानही मिळतं आणि परत व्यायाम होऊन वजनही कमी होतं.

३. बागकाम

gardening inmarathi
thenational.ae

तुम्हाला जर बागेत काम करायची आवड असेल तर दुसरा व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याच बागेत आपण ३० मिनिटे काम केलं तर त्यामुळे चांगलाच फायदा होईल. खोदणे, वाकणे, पाणी घालणे, झाडं कट करणे यामुळे उठबस होते आणि छान हालचाल होते.

शिवाय झाडांच्या सहवासात राहिल्यामुळे आपणही ताजेतवाने होतो. जेव्हा आपण पाणी घातलेल्या किंवा कटींग केलेल्या झाडाला छान फळं किंवा फुलं येतात तो आनंद तर अवर्णनीयच असतो.

जर तुमच्याकडे स्वत:ची बाग नसेल तर सार्वजनिक बागेत जाऊन सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे सामाजिक कार्याला हातभार लावल्याचाही आनंद मिळेल.

४. नृत्य

dancing inmarathi
loudwallpapers.com

नृत्य ही एक कला आहे. सामूहिक किंवा अगदी एकट्यानेसुद्धा आपण नृत्य करू शकतो. फक्त एखादं गाणं लावलं की, आपण त्यावर आपल्याला जमेल तसं नृत्य करू शकतो.

त्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो तसेच नृत्यामुळे स्नायूंना हालचाल होते, हृदय आणि फुफ्फुसांना बळकटी मिळते.

नृत्यामुळे विचारांना देखील चालना मिळू शकते आणि यासाठी बाकी काही लागत नाही, फक्त एका गाण्याशिवाय. हसत-खेळत हे तुम्ही करू शकता. तन-मन फ्रेश होऊन जाईल.

५. चालणं

walking inmarathi
wp.com

जर तुम्हाला वेळच नाहीये, पण एक किंवा दोन माणसांबरोबर मिटींग आहे, तर त्या समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करा की, आपण चालतचालत बोलू. यामुळे तुमचं बोलणंही होईल आणि चालणंही.

बंद केबीनमध्ये बसून बोलण्यापेक्षा ही मिटींग जास्त परिणामकारक होईल, आणि सहकार्‍यालाही चालायला लावल्याचा आनंद मिळेल. त्यामुळे त्यालाही फायदा होईल.

चालणं हा खरंच कुठेही आणि कधीही करण्यासारखी प्रक्रिया आहे यामुळे आपल्याला तर वैयक्तिक फायदा होतोच, पण पर्यावरणालाही जरा मोकळा श्‍वास देण्यास आपण मदत करतो.

गाडी न घेता एखादे दिवशी मार्केटला जाऊन भाजी आणा. एखाद्या सहकार्‍याला निरोप द्यायला त्याच्या घरी चालत जा. पार्कमध्ये सहज चालत चक्कर टाका.

यामुळे चालणं होऊन शरीराला छान व्यायाम मिळेल आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही तर तुमची बचतच होईल.

६. मैदानी खेळ

sport park inmarathi
zja.nl

जर तुम्हाला एखाद्या टीमशी बांधून घ्यायला नको असेल आणि बाहेर राहायला आवडत असेल तर जवळ असलेल्या मैदानात किंवा बागेत जा. तिथे चालू असलेल्या खेळात उत्स्फूर्तपणे भाग घ्या.

फ्लाईंग डिश, दोरी उड्या, कॅच कॅच या सारख्या साध्या खेळामुळेही चांगला व्यायाम होऊ शकतो.

७. पोहणे

swimming inmarathi
marauders.ca

बाहेर जर तुम्हाला त्रास होत असेल तर इनडोअर गेम्ससुद्धा खेळू शकता. बास्केटबॉल, बॅडमिंटन हे इनडोअर गेम आहेत. पोहणे हा तर खूपच छान उपक्रम आहे. पोहण्यामुळेसुद्धा सर्व शरीराला व्यायाम होतो आणि चपळता येते.

८. धावणे, सायकल चालवणे

cyclingvrunning inmaratghi
puregym.com

जर आपण १० मिनिटं धावलो किंवा सायकल चालवली तर ते ५० मिनिटं जॉगिंग केल्याचा फायदा आपल्याला देतं.

२० सेकंदं मध्यंतर घेऊन जर आपण सायकल चालवणं किंवा धावणं यापैकी काहीही केलं तर आपल्याला त्याचा फारच फायदा होतो, फक्त बरेच दिवसांत जर यातलं काही केलं नसेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि सुरू करा.

९. मार्शल आर्टस्

indianmartialart inmarathi
martialarts737.files.wordpress.com

कराटे खेळण्याचे दुहेरी फायदे आहेत. यामुळे आपण आपला बचाव पण करू शकतो आणि एकाग्रताही वाढते. धावणे किंवा इतर खेळांपेक्षा कराटेमुळे आपला मेंदू सक्रिय राहतो.

फक्त कराटे आणि तायक्वोंदा शिकवणारा शिक्षक तितकाच तज्ज्ञ असला पाहिजे. म्हणजे आपल्या सुरक्षिततेची काळजी नाही. मुला-मुलींनी तर स्वसंरक्षणासाठी कराटे शिकणं खूपच गरजेचे आहे.

१०. क्रिकेट

cricket inmarathi
cloudfront.net

क्रिकेट हा खेळ आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीचा आहे. एखाद्या संघासाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी सुद्धा तुम्ही क्रिकेट खेळू शकता. आपण जर लक्ष देऊन हा खेळ खेळलो तर तारुण्य चिरकाल टिकून राहण्यास मदत होईल. यासाठी फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

आहेत ना अतिशय उत्तम उपाय? या उपायाने आपल्याला छानसा फायदा होऊन वजनही कंट्रोल होऊ शकतं. शरीर तंदुरुस्त, चपळ होईल प्लस आपण काम केल्याचा किंवा आनंदासाठी वेळ घालवल्याचं समाधानही मिळेल.

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जर तुम्ही यातले प्रकार करून पाहिले तर नक्कीच ‘स्वार्थ आणि परमार्थ’ दोन्ही साधू शकाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?