पेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पेट्रोल डिझेलच्या किमतींनी आता आजवरचा उच्चांक गाठला आहे. आज भारताच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलची किंमत ७८.६०  रुपये झाली आहे.

तसेच डिझेलची ही सारखीच परिस्थिती आहे. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामन्य नागरिक त्रस्त आहेत.

 

petrol-price-hike-inmarathi
india.com

आज मुंबईत पेट्रोलचा भाव ७८.६०  रुपये आहे. तर राजधानी दिल्लीत  ७१.१० रुपये आहे.


जर तुम्हाला या वाढत्या किंमती पासून होणारा त्रास सुसह्य करायचा असेल तर तुम्हाला खालील कृतींचा अवलंब करावा लागेल. या कृतींचा अवलंब केल्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो. अर्थातच तो जास्त नसला तरी समाधानकारक तरी आहे.

१) तेल वितरण कंपनीच्या ऑफर :

 

petrol-offers-inmarathi
businesstoday.in

जर तुम्ही रोज पेट्रोल डिझेल गाडीत टाकत असाल अथवा तुमच्या वाहनांमुळे इंधनाचा जास्त खप होत असेल तर तुम्ही तेलवितरण कंपनीच्या ऑफर्स वर लक्ष ठेवलं पाहिजे.


इंडियन ऑइल कंपनी अतिरिक्त रिवार्डसच्या नावाने लॉयल्टी प्रोग्राम चालवत आहे. यातून पेट्रोलियम फ्लिट ऑनर्स ला रिवार्ड दिला जाणार आहे. या ऑफर्स बद्दल अधिक माहिती घेऊन तुम्ही फायदा उचलू शकतात.

२ ) डेबिट आणि क्रेडिट कार्ड चा वापर :

 

petrol-on-vard-inmarathi
newindianexpress.com

डेबिट आणि क्रेडीट कार्ड चा वापर करून इंधनावर सवलत मिळवता येऊ शकते. फ्युएल सरचार्जच्या रुपात त्याला सूट दिली आहे. याव्यतिरिक्त अनेक बँकांमध्ये इंधन खरेदीसाठी स्पेशल कार्डस सादर करण्यात आले आहेत.


यांचा वापरावर डिस्काउंट देखील मिळत आहे. तब्बल ०.७५ पैश्याचा डिस्काउंट मिळणार आहे. पण यासाठी कॅशलेस व्यवहार करणे आवश्यक आहे.

३ ) मोबाइल वॉलेटचा वापर करू शकतो :

 

paytm_indian_oil-inmarathi
gadgets.ndtv.com

आपल्या माहितीसाठी मोबीक्विक मोबाईल वॉलेटच्या वापर केल्यावर पेट्रोल डिझेल वर 10% ची घसघशीत सूट तुम्ही मिळवू शकतात. ही सूट सुपर कॅशचा स्वरूपात मिळणार आहे.


यामध्ये कमीतकमी 50 रुपयाचा पेट्रोलची खरेदी अनिवार्य आहे. सुपर कॅश मधल्या 5% चा वापर इंधन खरेदी साठी करू शकतात. आपल्या माहितीसाठी मोबीक्विकच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ही ऑफर जून 2018 पर्यंत वैध आहे.

४ ) भीम अँप :

 

bhimapp-petrol-inmarathi
ntnews.com

भीम अँप प्रत्येक प्रत्येक महिन्याला ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देते. जास्तीतजास्त transaction साठी प्रोहोत्सहित करण्यासाठी ही योजना आहे. हे अँप डाउनलोड केल्यावर पहिल्यावेळच्या पेट्रोल खरेदीवर ५१ रुपये कॅशबॅक मिळणार आहे.


तर या काही क्लुप्त्या वापरून तुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on “पेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल

  • May 28, 2018 at 10:34 am
    Permalink

    Namaskar, I regularly read your blogs on FB and find them quite interesting. Currently there is lot of noise around the fuel prices. It would be interesting to read if you can provide some objective commentary/ analysis about these rising prices. Does the high tax structure really compensate for some development schemes which are advertised or is it just filling the government coffers? Does it help to reduce the fiscal deficit? How does it stand in comparison to UPA government? Appreciate if you can post on your FB account (Omkar Dabhadkar, Sourabh Ganpatye) which is more easily accessible and read by many.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?