' मी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…! – InMarathi

मी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नोटबंदी सपशेल फसलेला निर्णय आहे असं अनेक विरोधकांचं गेल्या नऊ महिन्यातील म्हणणं- दोन दिवसांपासून अधिक जोराने ऐकू येत आहे. त्या मागचं कारणही स्पष्ट आहे. सरकारने चलन-बदल किंवा नोट बंदीच्या निर्णयामागची ५ प्रमुख कारणं सांगितली होती. काळा पैसे “संपवणे”, भ्रष्टाचार कमी करणे, खोट्या नोटांची समस्या सोडवणे, कॅश-लेस (ज्याला नंतर चलाखीने लेस-कॅश मध्ये बदलण्यात आलं!) इकॉनॉमीकडे वाटचाल करणे आणि अडकलेल्या चलनामुळे वाढलेली महागाई आटोक्यात आणणे. नोट बंदीवर टीका करणाऱ्यांचा रोख सरळ सरळ असा आहे की “आज ह्या पाचही कारणांकडे बघितलं तर एकही हेतू सफल झालेला दिसत नाही. म्हणजेच, सरकारने स्वतः ठरवलेल्या निकषांवर हा नोट बंदीचा निर्णय सपशेल फसलेला दिसतो.” परंतु एक गट असाही आहे की जे अजूनही नोटाबंदीबद्दल आशावादी आहेत. अश्याच समविचारी गटामधील एक मराठी पिझ्झाचे वाचक अभिजित देशपांडे यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ लिहिलेला सदर लेख प्रकाशित करत आहोत.

===

लेखक : अभिजित देशपांडे

===

मी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो आणि याचा मी बीजेपी किंवा मोदीभक्त आहे असा जरा सुद्धा संबंध नाही. बिझनेस मॅनेजमेंट केलेलं असल्यामुळे थोडंफार अर्थशास्त्र आम्हाला शिकवलं गेलयं आणि त्याच बरोबर मॅनेजमेंटमध्ये डिसीजन मेकींग आणि त्याचं महत्त्व आणि परिणाम याचासुद्धा समावेश होता…

demonisation-marathipizzza01
intoday.in

आता मुळात कसं आहे की, काळा पैसा, समांतर इकाॅनाॅमी, बनावट चलन ह्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या होत्या आणि हे कुठलाही अर्थतज्ञ नक्कीच मान्य करेल पण यावरचे उपाय दुर्दैवाने कुठल्याही अर्थतज्ञाकडे नाहीयेत आणि इथेच अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जाॅन केनेथ गालब्रेथ याचं मत गाह्य ठरतं… तो म्हणतो,

अर्थशास्त्र हे मोठे गमतीचे प्रज्ञान आहे. या शास्त्राच्या अभ्यासकांना आर्थिक समस्या शोधून काढता येतात, पण त्यांची सोडवणूक सुचवता येत नाही. अर्थशास्त्राचा गंध नसलेल्या व्यक्ती आपल्या कल्पकतेच्या बळावर गहन भासणाऱ्या आर्थिक पेचप्रसंगातून आपल्या लोकांना बाहेर काढू शकतात. असे कधीकधी घडल्याचे दिसून येते.

हे मला तंतोतंत पटलं कारण सर्व तथाकथित अर्थतज्ञ नोटबंदीचा निर्णय कसा चूक होता ह्याचीच टिमकी वाजवतायत पण कोणीही हे सांगत नाहीये की काळा पैसा बाहेर काढण्याचा, समांतर अर्थव्यवस्थेला रोखण्यास दुसरा कुठला पर्याय योग्य आणि व्यावहारीक होता आणि तो कसा अंमलात आणायला हवा होता!!! अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे सुद्धा या निर्णयावर प्रतिकूल मत नोंदवतात परंतु त्याला पर्यायी उपाय मात्र सूचवत नाहीत….

demonisation-marathipizzza00
कुठल्याही धोरणात्मक निर्णयाचे दोन प्रकारचे परिणाम दिसून येतात एक – शाॅर्ट टर्म आणि दुसरे लाॅंग टर्म…

शाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….

पण मुळातच मोदी या व्यक्तीबद्दलचा द्वेष आणि आकस आपल्या सर्व बौद्धिक पातळ्यांवर भारी पडतो आणि कुठल्याही गोष्टींचा सारासार विचार न करता आपण अमुक एक गोष्ट चुकत कशी होती याच्या बद्दल बोलत राहतो… प्राप्त परिस्थितीत मोदींनी तो निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं, निकाल अनुकूल किंवा प्रतिकूल काहीही असू शकतो… आणि या प्रयत्नांसाठीच माझं नोटबंदीच्या निर्णयाला समर्थन आहे!!!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?