माणसाच्या आठवणी ‘खोट्या’ असू शकतात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या घटनेची स्मृती मेंदूत साठवली गेली असली तरी माणूस त्यात वेळोवेळी काही ‘मनाच्या’ गोष्टींची भर घालत असतो असे एका संशोधनात समोर आले आहे. घटना जितकी जुनी तितकी त्यात खोट्या माहितीची भर असते हे आता सिध्द झाले आहे.

लंडन विद्यापीठाच्या संशोधकांनी माणसे ख-या-खोट्याची कशी सरमिसळ करतात हे शोधून काढण्यासाठी नुकतेच एक संशोधन केले त्यात 70 टक्के जणांनी ख-या घटनांत खोट्या गोष्टी घुसवल्याचे समोर आले.

fake-memories-marathipizza00स्रोत

या संशोधनासाठी काही जणांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. या गटांना एक एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तीन दिवसांनंतर या सर्वांना एक एक करुन प्रयोगशाळेत बोलावण्यात आले. त्यांच्या स्मरणशक्तींची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत त्यांना त्या डॉक्युमेंटरीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ही उत्तरे ते किती आत्मविश्वासान देतात ते तपासले गेले.

त्यानंतर काही काळाने त्यांना पुन्हा प्रयोगशाळेत बोलावण्यात आले. तेथे या सर्वांच्या मेंदुतील घडामोडींचे स्कॅनिंग करण्यात आले. यावेळी त्यांना प्रश्न विचारताना सोबत उत्तरेही देण्यात आली. या उत्तरांत इतरांची नावे घेत खोटी उत्तरेही होती. बहुतेकांनी ही खोटी उत्तरेही खरी मानून आपल्या उत्तरांत त्या माहितीचा समावेश केला. अनेकांनी आधीच्या चाचणीत आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरातही ही खोटी पूरक माहिती सत्य म्हणून स्वीकारत बिनदिक्कत घुसडली. अशांचे प्रमाण 70 टक्के निघाले.

fake-memories-marathipizza01

स्रोत

आपल्यापैकी इतरांनी म्हटले आहे म्हणजे ते खरेच असणार आणि आपल्या नजरेतून ते सुटले असणार असे समजत या लोकांनी आपल्या स्मृतीतील ख-या माहितीत ही खोटी माहिती जमा करुन टाकली.

या सर्वांना खरी उत्तरे कोणती आणि खोटी कोणती हे सांगितल्यावर काही जणांनी माघार घेतली आणि पुन्हा आपल्या मूळ उत्तरावर ते आले. पण काही जणांनी मात्र तसेही करण्यास नकार देत खोटी माहितीही खरीच असल्याचे ठासून सांगितले.

fake-memories-marathipizza02

स्रोत

मेंदूत नेमके काय होते ?

हिप्पोकॅम्पस हा भाग दीर्घकाळ टिकणारी स्मृती तयार करण्याचे काम करतो तर अ‍ॅमीग्डाला हा भाग मेंदूचे भावनांचे केंद्र म्हणून काम करतो.

वैज्ञानिकांच्या मते अ‍ॅमीग्डाला हा भाग समूह संवादातून येणारी माहिती व माहितीवर प्रक्रिया करणारा आपल्या मेंदूतील भाग यात दुवा म्हणून काम करतो.

अ‍ॅमीग्डालाकडून शिक्कामोर्तब झाल्याशिवाय ती माहिती आपल्या मेंदूत साठवली जात नाही.

त्यामुळे बाहेरच्या काही गोष्टींचा दबाव असल्यास अ‍ॅमीग्डाला खोटी माहितीही खरी असल्याचे स्वीकारत तिच्यावर शिक्कामोर्तब करतो आणि हिप्पोकॅम्पसमध्ये ही माहिती साठवली जाते.

fake-memories-marathipizza03

स्रोत

म्हणजे आता आठवणींचा देखील भरोसा राहिला नाही !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?