प्रोटीन्स आणि व्हिटामिन्सचा समृध्द स्रोत, आहारातील अमृत : ताक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : निरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो

===

“ताक”म्हणजे भुतलावरील “अमृत” समजले जाते. पण ते का?? हे आज आपण पाहणार आहोत.

ताकातील पोषणमुल्ये:-

Carbohydrates-4.8 gm
Fat-0.9gm
Protein-3.3gm
Calcium-116 mg
Potassium-54 mg
Cholesterol-10mg
Magnessium-8%
Folate-4%
Zinc-8%
Ribloflavin-20%

 

buttermilk-inmarathi
stm.india.com

आधुनिक दृष्ट्या ताकाचे फायदे पाहु

१) ताकातील probiotics पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.

२) ताकातील prebiotics, zinc, vit C हे रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.

३) ताकातील calcium ची प्रचुर मात्रा bone mass maintain ठेवते. व osteoporosis ची शक्यता कमी करते.

४) सर्व प्रकारचे vitamins व minerals असल्याने त्वचा सतेज ठेवते.

५) pregnancy मध्ये protien, prebiotics यामुळे रोगप्रतिकारक्षमता कायम राहते. तसेच probiotics मुळे पचनशक्ती चांगली राहते. त्यामुळे pregnancy मध्ये महिलांनी ताक अवश्य घ्यावे.

६) पोटॅशिअम भरपुर असल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास ताक मदत करते.

७) Dehydrationझाल्यास, ऊन्हाळ्याच्या दिवसात, वजन कमी करताना शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखते.

८)शांत झोप लागत नसल्यास, झोपताना ताक अवश्य प्यावे.

“दिनान्ते पिबेत् दुग्धं,निशान्ते पिबेत् पय:।
भोजनान्ते च पिबेत् तक्रं, किं वैद्यस्य प्रयोजनम्।।“

 

butter-inmarathi
i1.wp.com

अर्थ-दिवसाच्या शेवटी दुध प्यावे. रात्रीच्या शेवटी पाणी प्यावे. जेवणाच्या शेवटी ताक प्यावे. मग वैद्य कशाला लागेल?
असे आयुर्वेदात ताकाचे महत्व सांगितले आहे. ताक हे अग्निदिपक,पाचक,ऊष्ण गुणांनी युक्त सांगितले असुन वात,पित्त, कफ दोषांचे शमन करणारे आहे.

१) शोफ (oedema-inflamation) या व्याधीत ऊपयुक्त सांगीतले आहे.

२) मुळव्याधीमध्ये जर दररोज तक्रसेवन केले तर मलप्रवृत्ती सुकर होवुन 50% त्रास कमी होतो.

३) “ग्रहणी” ही अशी व्याधी आहे ज्यात अन्नाचे नीट पचन होत नाही.पण रोज ताक पिल्यास हळुहळु पचनशक्ती सुधारते.
व रोग्यास स्वास्थ लाभते.

४) “मुत्रग्रह”(urinary retention) मध्ये ताकाचे सेवन केल्यास मुत्रनिर्मीतीस मदत करते. व या व्याधीत ऊपयुक्त ठरते.

५) “पण्डु”( Anemia)मध्ये ताक ऊपयुक्त ठरते.

६) तसेच “ऊदर”(ascietis) मध्ये ताक ऊपयुक्त सांगितले आहे.

७) प्लीहा (spleenomegaly) मध्ये ही ताक ऊपयुक्त सांगितले आहे असे सांगितले आहे.

ताकाची चव मधुर, आंबट असून अनुरस कषाय आहे. ते विपाक, मधुर व वीर्य उष्ण आहे. ते स्वयंपाचक असल्यामुळे दुसऱ्या अन्नास पचवणारे आहे. त्यामुळे ते जुलाब, कॉलरा, संग्रहणी, मुळव्याध, ग्यासमुळे पोट गच्च होणे, कावीळ, लघवीचे दोष, मुतखडा, उदर, गुद या विकारांत उत्तम पथ्यकर आहे. तसेच वारंवार तहान लागणे, उलट्या होणे, तोंडाला पाणी सुटणे या रोगातही उपयोगी असून रोग बरे करते.

 

youtube.com

ताक कफ व वातदोष, मेदोवृद्धी नाशक आहे. स्थूलता (जाडी) कमी करण्यास उपयोगी पडते. अति तूप वा लोणी व त्यांचे पदार्थ खाऊन त्याचे शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते ताकामुळे कमी होतात. गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक अग्निदीपक (भूक वाढवणारे व पचवणारे), बुद्धी वाढवणारे, त्रिदोषशामक असून ते मुळव्याध, गुल्म, अतिसार, प्लीहा व संग्रहणी या रोगांत हितकारी आहे. हे रोग बरे करते.

म्हशीच्या दुधापासून तयार केलेले ताक कफ निर्माण करणारे, सूज उत्पन्न करणारे आहे. शेळीच्या दुधापासून तयार केलेले ताक स्निग्ध, पचण्यास हलके, त्रिदोष नाशक असून गुल्म, मुळव्याध, ग्रहणी, सूज, पंडुरोग यांचा नाश करते.

ताकामुळे अनेक रोग बरे होतात हे आपण पहिले. परंतु त्यात अन्य औषधी द्रव्ये मिसळली असता ताकाची रोगनाशक शक्ती वाढते व एकच ताक अनेक रोगांचे नाशक ठरते.

दोषांनुसार “ताक कसे प्यावे ?” याचेही वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे.

*वात दोष-

ताक(आम्ल) + सेंधेलोण+सुंठ

*पित्त दोष—

ताक(मधुर)+खडीसाखर

*कफ दोष—

ताक( मधुर) +त्रिकटू(सुंठ+मिरी+ पिंपळी )+क्षार

अशा प्रकारे सहज ऊपलब्ध होणारे ताक किती गुणकारी आहे हे आपण पाहीले. व ताक रोज पिणे किती हीतकर आहे हे देखील पाहीले. तेव्हा ताकाचा समावेश नित्य आहारात अवश्य करावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “प्रोटीन्स आणि व्हिटामिन्सचा समृध्द स्रोत, आहारातील अमृत : ताक

  • January 9, 2019 at 2:25 pm
    Permalink

    pitta

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?