गॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही अचूक पद्धत तुम्हाला माहित असायलाच हवी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अजिबात साफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. गॅस बर्नर जरा जास्त प्रमाणातच काळा दिसू लागतो म्हणजे त्यावर काजळी निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून गॅस नीट काम करत नाही. तुमच्यापैकी भरपूर जणांनी हे देखील पाहिलं असेल की अश्या कित्येक दिवस साफ न केलेल्या गॅसवर एखादं भांड ठेवलं की त्या गॅसची काजळी भांड्यावर देखील जमा होते.

 

gas-wash-marathipizza

स्रोत

याचं कारण आहे- अनेकदा गॅसवर ठेवलेला पदार्थ उतू जाऊन गॅस बर्नरवर पडतो. आपण तो फडक्याने वरचेवर साफ करतो म्हणा, पण गॅस बर्नरमध्ये गेलेला तो पदार्थ आता तसाच चिकट होऊन राहतो. असं बऱ्याचदा होऊन देखील आपण गॅस बर्नर साफ केला नाही की गॅस बर्नरमध्ये कचरा जमा होऊन तो नीट काम करत नाही. तो गडद पिवळ्या रंगासारखा प्रज्वलित होतो किंवा काही वेळेला तो वाकडा-तिकडा कसाही पेटतो. मग अश्या वेळेस गरज निर्माण होते गॅस बर्नर स्वच्छ करण्याची! बहुतेक जण आपापल्या परीने नवनवीन शक्कल लढवत हा गॅस बर्नर स्वच्छ करतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसले की हा गॅस बर्नर स्वच्छ करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. चला तर आज ती पद्धत जाणून घेऊया!

gas-wash-marathipizza01

स्रोत

  • गॅस बर्नर स्वच्छ करताना तो अलगद शेगडीपासून वेगळा करावा. हे करण्यापुवी गॅस सिलेंडर बंद आहे याची खात्री करून घ्यावी.

 

  • बर्नरच्या वरचं झाकणं देखील हलक्या हाताने दूर सारावं.

 

  • त्यानंतर गरम पाणी करून त्यात थोडासा साबण टाकून त्या पाण्यामध्ये बर्नरचे भाग बुडवून ठेवावेत. थोडय़ा वेळाने बर्नरचे भाग पाण्याबाहेर काढावे आणि एखादी टोकदार वस्तू घेऊन त्या साहाय्याने बर्नरमधील घाण काढून टाकावी. पाण्यात यासाठी भिजवावे की त्यामुळे बर्नरवरील चिकटपणा लवकर निघून जातो.

 

  • अजून एक गोष्ट करावी ती म्हणजे एका भांडय़ात पाणी घेऊन त्यात सोडा टाकावा आणि त्यात बर्नरचे भाग बुडवून ठेवावेत. नंतर ते भाग चांगल्या, स्वच्छ पाण्यात स्वच्छ करून घ्यावेत.

 

  • बर्नरचे भाग पूर्णत: स्वच्छ करून झाले की मऊ कापडय़ाने ते पुसून घ्यावे.

 

gas-wash-marathipizza02

स्रोत

ही सगळी मेहनत जर वाचवायची असेल तर गॅस बर्नर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

यासाठी वेळोवेळी गॅस साफ करून घ्यावा म्हणजे त्यांमुळे गॅसवर कचरा जमा होत नाही किंवा चिकट थर जमा होत नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?