लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना…? तपासा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण सगळी मेहनत, अट्टहास करत असतो तो फिट राहण्यासाठी. आपण व्यायाम करतो, योगसाधना करतो. खूप पौष्टिक गोष्टी खातो, पण तरीही अनेकदा तब्येत बिनसतेच.

आपलं शरीर म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

आपल्या पचन-व्यवस्थेमधील महत्वाचं ‘ लिव्हर ’अन्नपचनास मदत करतं . त्यात तयार होणाऱ्या रसांमुळे अन्नाचं योग्य प्रकारे पचन होऊन अन्नातील पोषणमूल्ये शोषून घेतली जातात

नको असलेला भाग शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. तर आपणही जाणून घेऊयात आपलं लिव्हर बिघडण्यापूर्वी नेमके काय काय सिग्नल्स देतं ते.

 

१. त्वचा आणि डोळे :

 

liver damage inmarathi
david wolfe

 

लिव्हरमध्ये एखादा बिघाड असेल तर तुमची त्वचा आणि डोळे कावीळ झाल्यासारखे पिवळे दिसू लागतील. असे असल्यास योग्य ती काळजी घेऊन त्याकडे लक्ष द्यावे.

 

२. वजनात वाढ :

 

check weight InMarathi

 

तुमचं वजन अचानक वाढतंय? हे कदाचित लिव्हर सिरॉसिसचं लक्षण असू शकतं. ह्यामुळे तुमचं सुदृढ लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होऊ शकते.

 

३. वजनात घट :

 

underweight inmarathi
thehealthsite.com

 

जसं वाढीव वजन एक लक्षण आहे तसंच अचानक कमी होणारं वजनही धोक्याची घंटा देणारं आहे. लिव्हर सिरॉसिसचं हेही एक मोजमाप असू शकतं.

कदाचित हिपॅटिटीस सी ही उद्भवण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या लिव्हर वर त्याचा परिणाम होतो.

 

४. पंजा :

तुमचा तळहात अतिरिक्त लालसर होत असेल तर कदाचित फॅटी लिव्हरचा दोष म्हणता येईल. लिव्हर मध्ये फॅटी सेल्सच्या वाढीचा हा परिणाम आहे.

 

५. थकवा येणे :

 

tiredness inmarathi
everyday health

 

मेंदूतील नुरोट्रान्समिशिन मुळे फार काहीही न करताही सतत थकवा जाणवू शकतो. एकप्रकारचा फटीग असल्यागत आपण अनुभवू शकतो.

एक्सहोस्टेड असल्याची जाणीव होते.

 

६. युरीन :

 

urine inmarathi
liversupport

 

शरीरामधून युरीनवाटे बाहेर पडणाऱ्या द्रवाचाही रंग महत्वाचं काम करतो.

साधारण रंगापेक्षा अधिक गडदता दिसून अली तर नक्कीच लिव्हर च्या प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचं समजू शकतं.

 

७. भूक मंदावणे :

 

hungar loss inmarathi
healthline

 

लिव्हर मध्ये बिघाड असल्यास आपली भूकही मंदावणं संभव आहे. एकेकाळी पट्टीचा खाणारा माणूसही ह्या विकारामुळे भूक हरपून बसतो.

 

८. जखम :

 

skin infection 2 inmarathi

 

छोट्या छोट्या कारणांमुळे आपल्या शरीरावर पटकन जखमा होण्याचं प्रमाण बळावतं. इतकंच नव्हे तर त्याच्या खुणाही शरीरावर दिसून येतात.

रक्त साकळू लागल्यास त्याचेही चट्टे शरीरावर दिसू लागतात.

 

९. सुजणे :

 

feet swelling inmarathi

 

पायाला येणाऱ्या सुजेचीही दखल घेणं गरजेचं आहे. लिव्हरचं तंत्र बिघडल्यास पायाला सूज येऊन गुबगुबीतपणा येऊ शकतो.

 

१०. अंगदुखी :

 

body pain inmarathi
healthline

 

कधीकधी व्यायाम न करताही आपलं अंग दुखू लागतं आणि अंगाला खाजही येऊ शकते. हेसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही.

 

११. पोट भरणं :

कधीकधी थोडंसं खाल्लेलं असलं तरीही पोट डब्बं झाल्यागत वाटतं. हे पोटातल्या सुजेमुळे किंवा पाण्याचं प्रमाण वाढल्यास होऊ शकतं .

 

१२. झोप व इतर :

 

sleepless night inmarathi

 

झोपेच्या वेळा बदलणे अथवा निद्रानाश हेही धोक्याचं चिन्ह आहे. लिव्हर बिघडत असल्यास त्याचा परिणाम आपल्या स्मरणशक्ती तसेच आकलनावर देखील होऊ शकतो.

 

लिव्हर बिघडण्याची कारणंही आपण जाणून घेऊयात :

 

१. इन्फेकशन :

 

virus inmarathi
webmd

 

विविध व्हायरसांच्या प्रादुर्भावामुळे जळजळीसारख्या गोष्टी होऊन लिव्हरची कार्यक्षमता कमी होऊ लागते.

हे व्हायरस दूषित अन्न, रक्ताद्वारे पसरू शकतात. हिपॅटिटीस हा सर्वात जास्त परिणामकारक व्हायरस म्हणता येईल.

 

२. अनुवंशिकता :

वंशपरंपरेने जसे अधिकार प्राप्त होतात तसे रोगही उद्भवू शकतात. घरात कोणाला असा लिव्हर चा त्रास असल्यास पुढच्या पिढीने काळजी घेणं आवश्यक आहे.

 

निरोगी लिव्हरकरता काही टिप्स :

 

१. पाणी :

 

Young Woman Drinking Water by Sea

 

शरीराला पुरेसं पाणी दररोज पिणे. ह्यामुळे शरीरात साठलेली अनावश्यक द्रव्य बाहेर निघून जातात. तसेच इतरही अनेक फायदे होतात.

 

२. मद्यपान टाळणे:

 

man-drinking-inmarathi
indianexpress.com

 

शक्य होईल तितकं मद्यपानाचं प्रमाण कमी असावं. त्यामुळे लिव्हरवर होणारा वाईट परिणाम टळेल.

 

३. व्यायाम:

 

exercises Inmarathi
GoMama247

 

नियमित व्यायाम केल्यास फक्त लिव्हरच नव्हे तर संपूर्ण शरीर बळकट होईल.

 

४. कोल्ड ड्रींक्स :

 

cold-drinks-inmarathi
saigoneer.com

 

बाजारात मिळणाऱ्या कोल्डड्रींक्स मध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्ती असतं ज्यामुळे स्थूलपणा येऊ शकतो आणि म्हणूनच असे पदार्थ पिणं शक्यतो टाळलं पाहिजे.

 

५. पोषक आहार :

 

balanced diet inmarathi
firstcry parenting

 

वेळोवेळी योग्य तो आहार ग्रहण करणे, जेवणाच्या निश्चित वेळा पाळणे , सर्वसमावेशक पोषणयुक्त अन्न नियमित घेणे तसेच विविध फळं ,भाज्या, पालेभाज्या ,कडधान्य यांचं सेवनही सर्व आजारांना दूर पळवू शकतं. किंबहुना आपल्याजवळ फिरकूच देत नाही.

शेवटी म्हणतात ना….”precaution is better than cure “.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?